ॲश वेनसडे

ॲश वेनसडे म्हणजे राखेचा बुधवार होय.

या दिवसाने ख्रिस्ती उपवासकाळाची (४० दिवसांचा उपवास ) सुरुवात होते. (या उपवासाला इंग्रजीत लेन्ट असे म्हणतात) . हा ख्रिस्ती लोकांच्या उपवासाचा पहिला दिवस असतो. हा ईस्टर सणाच्या ४६ दिवस पुढे असतो (४० दिवस उपवासामध्ये येणारे सर्व रविवार वजा केले जातात.) ईस्टर सणाचा दिवस बदलत असल्याने उपवास काळाची सुरुवातही बदलत असते. याचे कारण असे कि ईस्टरचा दिवस यहुदी लोकांच्या पासोव्हर (पास्क्का) सणावर ठरवला जातो. पासोव्हर सणानंतर येणाऱ्या पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टरचा दिवस ठरऊन त्याआधीचे चाळीस दिवस (येणारे सर्व रविवार वजा करून) उपवासाचे दिवस ठरतात. त्यामुळे राखेचा बुधवार हाही बदलता असतो. हा दिवस साधारण ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान येत असतो. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केली जाते. व भाविकांच्या कपाळावर राख लावली जाते. राख ही पश्चाताप व प्रायश्चित याचे प्रतिक आहे. राख लावताना धर्मगुरू म्हणतात, " हे मानवा तू माती आहेस व शेवटी मातीला मिळशील हे लक्षात ठेव. म्हणून पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा "

ॲश वेनसडे
माथ्यावर राखाचे क्रॉस (ॲश वेनसडे)

नवा करारा नुसार येशू ख्रिस्ताने ४० दिवस उपवास केला. या उपवासा दरम्यान सैतानाने येशूला मोहात पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ख्रिस्ताने या मोहावर विजय मिळविला. या घटनेची स्मृती म्हणून हा उपवास तसेच ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान व त्याचे पुनरुत्थान याची स्मृती म्हणून गुड फ्रायडे व ईस्टर साजरा केला जातो.

ॲश वेनसडे दिवशी सुवार्ता वाचन

मत्तय ६:१-६,१६-२१

  • १ स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
  • २ “जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहिरपणे अशी कामे करतात. कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
  • ३ म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये.
  • ४ दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.
  • ५ “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
  • ६ पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.
  • १६ “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
  • १७ तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा.
  • १८ यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.
  • १९ “येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नतील.
  • २० म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.
  • २१ जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्यदुवे

ॲश वेनसडे 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

ॲश वेनसडे दिवशी सुवार्ता वाचनॲश वेनसडे हे सुद्धा पहाॲश वेनसडे संदर्भॲश वेनसडे बाह्यदुवेॲश वेनसडेईस्टरख्रिस्तीलेन्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्थ (भाषा)कुटुंबसरपंचसाईबाबातणावभारत सरकार कायदा १९१९हातकणंगले लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र पोलीसकुपोषणसाडेतीन शुभ मुहूर्तवर्धा लोकसभा मतदारसंघविशेषणसंस्‍कृत भाषामीन रासमुघल साम्राज्यसंगीत नाटकमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपरभणी लोकसभा मतदारसंघअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षअमरावती लोकसभा मतदारसंघचंद्रतिथीसावित्रीबाई फुलेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसातारा जिल्हाबैलगाडा शर्यतविद्या माळवदेसविता आंबेडकरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेजत विधानसभा मतदारसंघसाम्राज्यवादयूट्यूबरेणुकामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारतीय रेल्वेआकाशवाणीकार्ल मार्क्सआणीबाणी (भारत)महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेरावेर लोकसभा मतदारसंघपुणेसंयुक्त राष्ट्रेअमरावती जिल्हादक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाराणाजगजितसिंह पाटीलशिर्डी लोकसभा मतदारसंघप्रकल्प अहवालमहाराष्ट्राचे राज्यपालमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीहातकणंगले विधानसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाक्रियापदपानिपतची दुसरी लढाईविजय कोंडकेकावळाभारतीय जनता पक्षपंढरपूरउंटराज्यव्यवहार कोशदेवेंद्र फडणवीसपाणीजळगाव जिल्हाखंडोबाम्हणीसुभाषचंद्र बोसन्यूझ१८ लोकमतयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठपानिपतची पहिली लढाईआनंद शिंदेभारतातील सण व उत्सवमटकानामप्रतापगडसंगणक विज्ञान🡆 More