हिरोडोटस

हिरोडोटस हा एक ग्रीक इतिहासकार होता.

हिरोडोटस
बॉडरम या जन्मगावी असलेला हिरोडोटसचा पुतळा

परिचय

इ.स. पूर्व 484 मध्ये हेलीकारनेसस (सध्याचे बॉडरम, तुर्की) या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो अथेन्स शहरात राहत होता. हिरोडोटसने इजिप्त, थ्रेस, सिथीया, बॉबी, व लोनिया या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील राजकीय व सामाजिक बदल पाहिले व हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने ग्रीक-पर्शियन युद्धाचे वर्णन, तेथील भौगोलिक स्थळाचे वर्णन, घटनांचा क्रम व तारखा दिलेल्या आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात सारस राजापासून कॅम्बे राजा दराफस याच्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांची माहिती आहे. दुसऱ्या भागात झेरेक्सिस राजाची माहिती आहे तर तिस-या भागात ग्रीक आणि पर्शियन युद्धाचे वर्णन आहे. इ.स. पूर्व ४३० मध्ये हिरोडोटसचे इटलीतील ग्रीक वसाहत ब्युरो येथे निधन झाले.

इतिहास लेखनाला दिशा

हिरोडोटसने इतिहास शास्त्र स्वरूपात मांडण्याची प्रथा सुरू केली. त्याने इतिहासाला नीतिशास्त्राचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. इतिहासाचा कोणत्याही धर्माशी कोणत्याही देवाशी संबंध नसून त्याचा संबंध मानवाशी आहे हे दाखवून दिले. त्याने पुढील काळातील इतिहास संशोधकांसाठी ऐतिहासिक घटना मानवी जीवनाशी संबंधित असाव्यात असा निकष लावून दिला. ऐतिहासिक साधनांवर इतिहासाचे लेखन करावयाचे असते हे त्याने दाखवून दिले.

Tags:

ग्रीक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसाखरखिलाफत आंदोलनव्यवस्थापनधर्मो रक्षति रक्षितःप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनारविकांत तुपकरकळसूबाई शिखरहोमी भाभाशुभेच्छारतन टाटापु.ल. देशपांडेगोदावरी नदीजैवविविधतामण्यारऔद्योगिक क्रांतीपवनदीप राजनमहाराष्ट्र पोलीसहिंदू लग्नम्हणीसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदछत्रपती संभाजीनगर जिल्हानक्षलवादकोळी समाजजागतिक पुस्तक दिवसगहूजिजाबाई शहाजी भोसलेवाघगेटवे ऑफ इंडियाकोरेगावची लढाईलाल किल्लाआळंदीसचिन तेंडुलकरदीपक सखाराम कुलकर्णीविशेषणअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमबुलढाणा जिल्हाअल्लाउद्दीन खिलजीकुंभ राससंयुक्त राष्ट्रेशिक्षकशेतकरीविष्णुसहस्रनामखो-खोविरामचिन्हेदर्यापूर विधानसभा मतदारसंघहृदयपानिपतची तिसरी लढाईबलुतं (पुस्तक)बुलढाणा विधानसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीअक्षय्य तृतीयाअलिप्ततावादी चळवळहनुमानकर्नाटकधनगररोहित शर्मालोकसभा सदस्यमराठी भाषामानसशास्त्रमहाबळेश्वरढोलकीभोपाळ वायुदुर्घटनाउदयनराजे भोसलेजिल्हाधिकारीजिंतूर विधानसभा मतदारसंघतुणतुणेघनकचराविनयभंगदिशातलाठीविधानसभापरभणी विधानसभा मतदारसंघफुटबॉलमहाराष्ट्र विधान परिषदकरदारिद्र्यरेषा🡆 More