मिसूरी सेंट लुईस

सेंट लुईस (इंग्लिश: Saint Louis) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (कॅन्सस सिटीखालोखाल) व सर्वात मोठे महानगर आहे.

हे शहर मिसूरीच्या पूर्व भागात इलिनॉय राज्याच्या सीमेवर व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. ३.१९ लाख शहरी व २८.४५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले सेंट लुईस अमेरिकेमधील ५८वे मोठे शहर व १६वे मोठे महानगर आहे.

सेंट लुईस
Saint Louis
अमेरिकामधील शहर

मिसूरी सेंट लुईस

मिसूरी सेंट लुईस
ध्वज
सेंट लुईस is located in मिसूरी
सेंट लुईस
सेंट लुईस
सेंट लुईसचे मिसूरीमधील स्थान
सेंट लुईस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सेंट लुईस
सेंट लुईस
सेंट लुईसचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°37′38″N 90°11′52″W / 38.62722°N 90.19778°W / 38.62722; -90.19778

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिसूरी
स्थापना वर्ष इ.स. १७६४
क्षेत्रफळ १७१.३ चौ. किमी (६६.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४६६ फूट (१४२ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,१९,२९४
  - घनता १,९९१ /चौ. किमी (५,१६० /चौ. मैल)
  - महानगर २८,४५,२९८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
stlouis-mo.gov

इ.स. १७६४ साली मिसिसिपी नदीवरील एक बंदर म्हणून स्थापन केलेले सेंट लुईस १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेमधील चौथ्या क्रमांकाचे शहर होते. अमेरिकन यादवी युद्धानंतर येथील लोकसंख्या झपाट्याने वाढली. इ.स. १९०४ साली सेंट लुईसमध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. इ.स. १९५० नंतर येथील लोकसंख्या घसरणीला लागली.

सध्या अमेरिकेच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रमुख शहर असलेल्या सेंट लुईसची अर्थव्यवस्था सेवा, उत्पादन व पर्यटनावर अवलंबून आहे. अमेरिकेमधील अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. गेटवे आर्च ही सेंट लुईसची सर्वात प्रसिद्ध खुण आहे.

इतिहास

सेंट लुईस शहराची स्थापना पियेर लेक्लेद व रेने ऑगस्ते चूतू ह्या फ्रेंच शोधकांनी इ.स. १७६४ साली केली. स्थापनेपासून सेंट लुईस मिसिसिपी नदीच्या काठावरील स्थानामुळे मध्य अमेरिकेमधील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र होते.

भूगोल

सेंट लुईस शहर मिसिसिपी नदीच्या पश्चिम काठावर उंचसखल भागात १७१.३ किमी क्षेत्रफळावर वसले आहे. मिसिसिपी व मिसूरी नद्यांच्या खोऱ्यातील हा भाग अत्यंत सुपीक असून येथील माल इतरत्र वाहून नेण्यासाठी सेंट लुईस बंदराचा मोठ्या प्रमाणावर होत असे.

हवामान

सेंट लुईसमधील हवामान तीव्र आहे. आर्क्टिक वाऱ्यांमुळे येथील हिवाळे शीत व रूक्ष तर मेक्सिकोच्या आखाती वाऱ्यांमुळे उन्हाळे उष्ण व दमट असतात.

सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 77
(25)
85
(29)
92
(33)
93
(34)
98
(37)
105
(41)
115
(46)
110
(43)
104
(40)
94
(34)
86
(30)
76
(24)
115
(46)
सरासरी कमाल °फॅ (°से) 37.9
(3.3)
44.3
(6.8)
55.4
(13)
66.7
(19.3)
76.5
(24.7)
85.3
(29.6)
89.8
(32.1)
87.9
(31.1)
80.1
(26.7)
68.3
(20.2)
53.8
(12.1)
42.0
(5.6)
65.67
(18.71)
सरासरी किमान °फॅ (°से) 21.2
(−6)
26.5
(−3.1)
36.2
(2.3)
46.5
(8.1)
56.6
(13.7)
65.9
(18.8)
70.6
(21.4)
68.6
(20.3)
60.3
(15.7)
48.2
(9)
36.7
(2.6)
25.8
(−3.4)
46.93
(8.28)
विक्रमी किमान °फॅ (°से) −22
(−30)
−18
(−27.8)
−5
(−20.6)
20
(−6.7)
31
(−0.6)
43
(6)
51
(11)
47
(8)
32
(0)
21
(−6.1)
1
(−17.2)
−16
(−26.7)
−22
(−30)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 2.14
(54.4)
2.28
(57.9)
3.60
(91.4)
3.69
(93.7)
4.11
(104.4)
3.76
(95.5)
3.90
(99.1)
2.98
(75.7)
2.96
(75.2)
2.76
(70.1)
3.71
(94.2)
2.86
(72.6)
38.75
(984.2)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 7.2
(18.3)
4.7
(11.9)
3.2
(8.1)
.8
(2)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
1.5
(3.8)
4.8
(12.2)
22.2
(56.3)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 9.4 8.2 11.1 11.4 11.3 9.6 8.3 8.1 7.5 8.5 10.1 9.4 112.9
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 5.2 3.4 2.3 .4 0 0 0 0 0 0 .9 3.5 15.7
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 161.2 161.0 198.4 222.0 266.6 291.0 310.0 269.7 237.0 207.7 141.0 130.2 २,५९५.८
स्रोत: Average Temperature, Precipitation, and Snowfall , Sunshine Hours

Extremes

जनसांख्यिकी

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणाऱ्या सेंट लुईसची लोकसंख्या १९५० साली सर्वाधिक होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान सेंट लुईसची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ३,१९,२९४ लोकसंख्या असलेल्या सेंट लुईसमधील ४९.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८१० १,६००
इ.स. १८२०
इ.स. १८३० ४,९७७
इ.स. १८४० १६,४६९ +२३०%
इ.स. १८५० ७७,८६० +३७२%
इ.स. १८६० १,६०,७७३ +१०६%
इ.स. १८७० ३,१०,८६४ +९३%
इ.स. १८८० ३,५०,५१८ +१२%
इ.स. १८९० ४,५१,७७० +२८%
इ.स. १९०० ५,७५,२३८ +२७%
इ.स. १९१० ६,८७,०२९ +१९%
इ.स. १९२० ७,७२,८९७ +१२%
इ.स. १९३० ८,२१,९६० +६%
इ.स. १९४० ८,१६,०४८ −०%
इ.स. १९५० ८,५६,७९६ +५%
इ.स. १९६० ७,५०,०२६ −१२%
इ.स. १९७० ६,२२,२३६ −१७%
इ.स. १९८० ४,५२,८०१ −२७%
इ.स. १९९० ३,९६,६८५ −१२%
इ.स. २००० ३,४८,१८९ −१२%
इ.स. २०१० ३,१९,२९४ −८%

वाहतूक

महामार्ग

सेंट लुईस आय-७० आणि आय-५५ या दोन मोठ्या आंतरराज्य महामार्गांच्या तिठ्यावर आहे. याशिवाय आय-४४ आणि आय-६४ हे दोन आंतरराज्य महामार्ग या शहरातून जातात.

रेल्वे

सेंट लुईस रेल्वेमार्गे सान अँटोनियो, शिकागो आणि कॅन्सस सिटी मार्गे देशातील इतर शहरांशी जोडलेले आहे.

विमानसेवा

लँबर्ट सेंट लुईस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मोठा विमानतळ असून इतर तीन लहान विमानतळ या शहरास विमानसेवा पुरवतात.

शिक्षण

खेळ

खालील तीन व्यावसायिक संघ सेंट लुईसमध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान
सेंट लुईस कार्डिनल्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल बुश स्टेडियम
सेंट लुईस रॅम्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एडवर्ड जोन्स डोम
सेंट लुईस ब्लूज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्कॉटट्रेड सेंटर

२०१७ हंगामापासून हा संघ लॉस एंजेलसला स्थलांतरित झाला.

शहर रचना

सेंट लुईसचे विस्तृत चित्र
ईस्ट सेंट लुईसमधून टिपलेले चित्र.

जुळी शहरे

जगामधील खालील १५ शहरे सेंट लुईसची जुळी शहरे आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

मिसूरी सेंट लुईस 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

मिसूरी सेंट लुईस इतिहासमिसूरी सेंट लुईस भूगोलमिसूरी सेंट लुईस जनसांख्यिकीमिसूरी सेंट लुईस वाहतूकमिसूरी सेंट लुईस शिक्षणमिसूरी सेंट लुईस खेळमिसूरी सेंट लुईस शहर रचनामिसूरी सेंट लुईस जुळी शहरेमिसूरी सेंट लुईस संदर्भमिसूरी सेंट लुईस बाह्य दुवेमिसूरी सेंट लुईसअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाइलिनॉयकॅन्सस सिटी, मिसूरीमिसिसिपी नदीमिसूरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णसंत तुकाराममहाराष्ट्र दिनजालियनवाला बाग हत्याकांडवर्तुळएकनाथ खडसेसिंधुदुर्गरोजगार हमी योजनामहाराष्ट्रातील पर्यटनतरसप्रणिती शिंदेओवाबुद्धिबळमानवी हक्कसमाजशास्त्रहातकणंगले विधानसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरसविता आंबेडकरनाशिक लोकसभा मतदारसंघभगवानबाबाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसुतकगोदावरी नदीधनंजय मुंडेपहिले महायुद्धमुंबईभाषालंकारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमासिक पाळीभारतातील मूलभूत हक्ककोकणधुळे लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरीकुपोषणनिसर्गशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनभारतीय रिझर्व बँकगोपाळ कृष्ण गोखलेभारतातील जिल्ह्यांची यादीविधान परिषदअर्थ (भाषा)इतर मागास वर्गभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारतीय निवडणूक आयोगभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीपुरस्कारसंयुक्त राष्ट्रेचिमणीतुळजाभवानी मंदिरउंबरश्रीया पिळगांवकरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठजवाहरलाल नेहरूनरेंद्र मोदीफिरोज गांधीछत्रपती संभाजीनगर जिल्हामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीक्रांतिकारकस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाबारामती लोकसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकुत्रासावता माळीयकृतजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)कामगार चळवळचोखामेळाचोळ साम्राज्यछगन भुजबळमिया खलिफामुलाखतनियतकालिकसंवादगुणसूत्रमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीराहुल गांधी🡆 More