लेयटे आखाताची लढाई

लेयटे आखाताची लढाई (मराठी नामभेद: लेयटे गल्फची लढाई ; इंग्लिश: Battle of Leyte Gulf, बॅटल ऑफ लेयटे गल्फ) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि शाही जपानी आरमार यांच्यात फिलिपिन्सजवळील लेयटे आखातात लढली गेलेली आरमारी लढाई होती.

लेयटे आखाताची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
लुझॉनजवळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली यु.एस.एस. प्रिन्सटन ही विवानौका
लुझॉनजवळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली यु.एस.एस. प्रिन्सटन ही विवानौका
दिनांक २३-२६ ऑक्टोबर, इ.स. १९४४
स्थान लेयटे आखात, फिलिपाइन्स
परिणती दोस्त राष्ट्रांचा निर्णायक विजय
युद्धमान पक्ष
अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया जपान
सेनापती
विल्यम हाल्से जुनियर, थॉमस सी. किंकेड, क्लिफ्टन स्प्रेग, जेसी बी. ओल्डेनडॉर्फ, जॉन ऑगस्टीन कॉलिन्स ताकेओ कुरिता, शोजी निशिमुरा, कियोहिदे शिमा, जिसाबुरो ओझावा, युकियो सेकी
सैन्यबळ
विवानौका, ८ हलक्या विवानौका, १८ विवा संगतनौका, १२ बॅटलशिप, २४ क्रुझर, १४१ विनाशिका व विनाशिका संगतनौका, अनेक पाणबुड्या, गस्तनौका, रसदनौका, १,५०० विमाने १ विवानौका, ३ हलक्या विवानौका, ९ बॅटलशिप, १४ मोठ्या क्रुझर, ६ छोट्या क्रुझर, ३५+ विनाशिका, ३०० विमाने
बळी आणि नुकसान
अंदाजे ३,००० सैनिक व खलाशी, १ हलकी विवानौका, २ विवा संगतनौका, २ विनाशिका, १ विनाशिका संगतनौका, २००+ विमाने अंदाजे १०,४०० सैनिक व खलाशी, १ विवानौका, ३ छोट्या विवानौका, ३ बॅटलशिप, १० क्रुझर, ११ विनाशिका, अंदाजे ५०० विमाने

ही लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती आणि काही हिशोबाप्रमाणे ही जगाच्या इतिहासातीलच सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती.

ही लढाई चार टप्प्यांत चार ठिकाणी लढली गेली: सिबुयान समुद्राची लढाई, सुरिगाओ आखातची लढाई, समारची लढाई, केप एन्गान्योची लढाई.

यांशिवाय आसपासच्या प्रदेशात अनेक झटापटीही झाल्या.

युद्धाच्या सुरुवातीस जपानने आग्नेय आशियातील अनेक प्रदेश हस्तगत करून तेथील तेलसाठे व खनिज संपत्ती मिळवलेली होती. जपानचे बरेचसे युद्धतंत्र या सामग्रीवर आधारित होती. येथून जपानकडे जाणारी ही रसद तोडण्यासाठी दोस्त राष्ट्रांना फिलिपिन्स जिंकून तेथे तळ उभारणे गरजेचे होते. यासाठी अमेरिकेने २० ऑक्टोबर रोजी लेयटे बेटावर चढाई केली. हे पाहताच जपानी आरमाराने आपली शक्ती एकवटून प्रतिहल्ला केला. पण अमेरिकन आरमाराच्या तिसऱ्या आणि सातव्या तांड्याने हा प्रतिहल्ला उधळून लावला. ही लढाई संपताना जपानकडे असलेल्या विमानांची संख्या अमेरिकेच्या युद्धनौकांच्या संख्येपेक्षाही कमी झाली. येथून पुढे जपानला समुद्रात लढायला बळच उरले नाही. या लढाईत जपानी आरमाराचीही इतकी हानी झाली, की युद्धाच्या अंतापर्यंत ते यातून सावरलेच नाही .

या लढाईत जपानी वैमानिकांनी सर्वप्रथम कामिकाझे हल्ले चढवले.

पार्श्वभूमी

ऑगस्ट १९४२ ते १९४४ च्या सुरुवातीपर्यंत अमेरिकन आरमाराने प्रशांत महासागरातून शाही जपानी आरमाराचे अनेक तळ उद्ध्वस्त करून उत्तर आणि पूर्वेकडे ढकलेले होते. १९४४ च्या मध्यास अमेरिकेच्या पाचव्या तांड्याने मेरियाना द्वीपसमूह काबीज केला. येथे उभारलेल्या तळावरून जपानची मुख्य भूमी त्यांच्या बोईंग बी-२९ सुपरफोर्ट्रेस प्रकारच्या विमानांच्या पल्ल्यात आली. जपानने चढवलेला प्रतिहल्ला अमेरिकन आरमाराने फिलिपाईन समुद्राच्या लढाईत अडवला व तेथे जपानी आरमाराच्या विमानांचा फडशा पाडला. यात तीन जपानी विवानौका आणि ६००पेक्षा अधिक विमाने गमावल्यावर जपानी आरमाराकडे लढाऊ विमाने व ते चालविण्यास सक्षम वैमानिकांची मोठी चणचण निर्माण झाली.

पालावान पॅसेजमधील पाणबुड्यांची टेहळणी

सिबुयान समुद्राची लढाई

सुरिगाओ आखाताची लढाई

समारची लढाई

केप एन्गान्योची लढाई

संदर्भ आणि नोंदी

Tags:

लेयटे आखाताची लढाई पार्श्वभूमीलेयटे आखाताची लढाई पालावान पॅसेजमधील पाणबुड्यांची टेहळणीलेयटे आखाताची लढाई सिबुयान समुद्राची लढाईलेयटे आखाताची लढाई सुरिगाओ आखाताची लढाईलेयटे आखाताची लढाई समारची लढाईलेयटे आखाताची लढाई केप एन्गान्योची लढाईलेयटे आखाताची लढाई संदर्भ आणि नोंदीलेयटे आखाताची लढाईइंग्लिश भाषादुसरे महायुद्धदोस्त राष्ट्रेफिलिपिन्सशाही जपानी आरमार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सेंद्रिय शेतीपरमहंस सभागुरुत्वाकर्षणमुक्ताबाईव्यापार चक्रसप्त चिरंजीवसम्राट अशोकदत्तात्रेयहरिहरेश्व‍ररावणवर्णनात्मक भाषाशास्त्रबलुतेदारबावीस प्रतिज्ञामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीगृह विभाग, महाराष्ट्र शासनभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसाईबाबाराष्ट्रीय महामार्गभारतीय अंतराळ संशोधन संस्थालोकसंख्यासमाजशास्त्रराजरत्न आंबेडकरचंद्रपूरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमूलभूत हक्कपरकीय चलन विनिमय कायदामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनअजिंठा लेणीसंभाजी भोसलेकालभैरवाष्टकगणपतीपुळेकर्करोगशनि शिंगणापूरगाडगे महाराजअहमदनगर जिल्हामराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतचाफावेरूळ लेणीपांढर्‍या रक्त पेशीमुलाखतज्योतिबाअशोक सराफगोत्रव्हॉलीबॉलकार्ल मार्क्ससंत तुकारामवि.स. खांडेकरगुळवेलनदीए.पी.जे. अब्दुल कलामगणपतीविरामचिन्हेसंगणकाचा इतिहासमोहन गोखलेमहाराष्ट्र दिनसूरज एंगडेबाळाजी बाजीराव पेशवेध्वनिप्रदूषणतुळजाभवानी मंदिरॲडॉल्फ हिटलरमृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमहाराष्ट्र शासनसिंधुदुर्गपिंपरी चिंचवडमहेंद्रसिंह धोनीकेदार शिंदेमुंबई रोखे बाजारभारतमराठाॲलन रिकमनमानवी भूगोलजीवनसत्त्वकोरफडपरशुरामसंत बाळूमामा🡆 More