बियर

बियर (इंग्लिश: Beer ; जर्मन: Bier ;) हे जगातील सर्वांत जुने व सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य आहे.

गहू, सातू, मका, तांदूळ इत्यादी धान्यांपासून बनवलेल्या स्टार्चावर ब्रू करण्याची व किण्वन प्रक्रिया करून बियरीची निर्मिती केली जाते. बहुतेक बियरींमध्ये नैसर्गिक परिरक्षक म्हणून हॉप वनस्पतीची फुलेही टाकतात. हॉपांच्या फुलांमुळे बियरीला कडवटपणा मिळतो. इ.स. पूर्व ९००० पासून जगात बियर बनवली गेली असल्याचे पुरावे आढळतात. बियरीला अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये विशेष स्थान आहे (उदा. जर्मनीमधील बियर उत्सव). बियरीचे उत्पादन व विक्री हा जगातील एक मोठा उद्योग आहे व अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या उद्योगात आहेत.

बियर
गव्हापासून बनवण्यात येणारी जर्मन बियर

बियरीची तीव्रता घनफळातील अल्कोहोल (लघुरूप: घन-अल्को ; इंग्लिश: Alcohol by volume, abv ;) या मानकात व्यक्त करतात. बहुतांश बियरींची तीव्रता ४% ते ६% दरम्यान असते. मात्र काही बियरींची तीव्रता १% पेक्षा कमी, तर क्वचित काही बियरींची तीव्रता २०%हून अधिक असू शकते.

प्रकार

बियरचे खालील मुख्य प्रकार आहेत.

  • पेल एल
  • माइल्ड एल
  • स्टाउट
  • गव्हली बियर (गव्हापासून तयार केलेली)
  • लागर
  • पिल्सनर

यातील अनेक प्रकारांत प्रत्येकी लाइट किंवा डायेट हा कमी मेद असलेला प्रकारही असतो. २०१७ सालच्या डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात बीअरच्या बाटलीची किंमती ह्या २० ते २५ रुपयांनी वाढल्या. महाराष्ट्र राज्यात दरमहा सरासरी बीअरच्या दोन कोटी चार लाख बाटल्यांची विक्री होते.

संदर्भ

बियर 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

इंग्लिश भाषागहूजर्मन भाषाजर्मनीतांदूळमकामद्यसातू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रेममहिलांसाठीचे कायदेराजरत्न आंबेडकरचिपको आंदोलनजगातील देशांची यादीत्रिरत्न वंदनाअभंगमराठी भाषा दिन२०२४ लोकसभा निवडणुकाजॉन स्टुअर्ट मिलसंस्‍कृत भाषामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)जपानहृदययशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठरत्‍नागिरी जिल्हाशब्द सिद्धीकुत्राखो-खोमुलाखतशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीगोपाळ गणेश आगरकरवंजारीराज्य निवडणूक आयोगमांगधनगरकाळूबाईचंद्रगुप्त मौर्यह्या गोजिरवाण्या घरातभारताचे संविधानकोटक महिंद्रा बँकमानसशास्त्रशुभेच्छाहळदआमदारतुतारीसंभाजी भोसलेबिरजू महाराजबौद्ध धर्मजिंतूर विधानसभा मतदारसंघकबड्डीद्रौपदी मुर्मूडाळिंबनरेंद्र मोदीनक्षत्रमांजरहनुमानविधानसभामहाराष्ट्र शासनतिसरे इंग्रज-मराठा युद्धवसंतराव नाईकताम्हणजागतिक तापमानवाढवसाहतवादधनु राससम्राट हर्षवर्धनजायकवाडी धरणगर्भाशयनगदी पिकेवर्धमान महावीरतुळजाभवानी मंदिरअकोला जिल्हापश्चिम महाराष्ट्रश्रीनिवास रामानुजनमौर्य साम्राज्यमाळीभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीजिजाबाई शहाजी भोसलेसमाजशास्त्रवर्धा विधानसभा मतदारसंघपृथ्वीचे वातावरणओवाजय श्री रामवित्त आयोगशाश्वत विकास ध्येयेशेवगाराज्यसभाभारताची अर्थव्यवस्था🡆 More