गेंडा: सस्तन प्राण्यांचे कुटुंब

गेंडा अथवा इंग्रजीत राईनोसिरोस हा प्राणी शाकाहारी भूचर आहे.

खुरधारी वर्गातील हा प्राणी असून, याचा गण अयुग्मखुरी आहे. खुरधारी म्हणजे पायांना खुर असलेले प्राणी, तर अयुग्मखुरी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पायाला विषम संख्येत खुर असतात ते प्राणी. अयुग्मखुरी गणात गेंडा हा खड्गाद्य कुळात मोडणारा एकमेव प्राणी आहे. या प्राण्याच्या पायाला तीन खुरे असतात. अयुग्मखुरी प्राण्यांना शिंगे नसतात. त्यानुसार गेंड्याचे शिंग हे खरे शिंग नसून तो एक केसांचा गुच्छ आहे, जो शिंगात रूपांतरीत झाला.

गेंडा
एओसीन - अलीकडील
काळा गेंडा
काळा गेंडा
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: अयुग्मखुरी
कुळ: खड्गाद्य
ग्रे, १८२१
गेंडा: सस्तन प्राण्यांचे कुटुंब
भारतीय एकशिंगी गेंडा

गेंड्यात सध्या पाच प्रकार असून आफ्रिका खंडात दोन प्रकारचे गेंडे आढळतात, एक काळा गेंडा आणि दुसरा पांढरा गेंडा. तर दक्षिण आशिया खंडात तीन प्रकारचे गेंडे आढळतात. भारत, नेपाळदक्षिण-पूर्व आशियाई देशात आढळतो.

आशिया खंडात या प्राण्याचा तीन मुख्य जाती आहेत जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा बेटावर आणि व्हियेतनाम देशात आढळतो, दुसरा म्हणजे सुमात्रीयान गेंडा, जो इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो, आणि तिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किवा एक शिंगी गेंडा, जो भारत आणि नेपाळ मध्ये आढळतो. जावन गेंडा ही जात एकेकाळी उत्तर-पूर्व भारतापर्यत आढळत असे. पण आज ते नष्ट झाले आहेत.

भारतीय गेंडा

भारतात काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे मिळतात. एक शिंगी गेड्यासाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगातील २/३ भारतीय गेंडे काझीरंगा येथे आढळतात. एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात आसाम, पश्चिम बंगालउत्तर प्रदेश मध्ये आढळतात, तर काही प्रमाणात नेपाळ मध्ये पण आढळतात. आफ्रिकन गेन्ड्यामध्ये दोन प्रकार आहेत, पंढरा गेंडा आणि काळा गेंडा.

Tags:

अयुग्मखुरीप्राणीभूचरशाकाहारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गंगाखेड विधानसभा मतदारसंघमूळ संख्याविधानसभादिंडोरी लोकसभा मतदारसंघसोनेजनहित याचिकाछावा (कादंबरी)गालफुगीसॅम पित्रोदामूळव्याधराशीतुळजापूरकुर्ला विधानसभा मतदारसंघलहुजी राघोजी साळवेउच्च रक्तदाबसंजय हरीभाऊ जाधवमातीअशोक चव्हाणआचारसंहितामाहिती अधिकारछत्रपती संभाजीनगर जिल्हाशनिवार वाडाधनगरराष्ट्रीय स्वयंसेवक संघमराठाछत्रपती संभाजीनगरराम गणेश गडकरीगोवरमुंबई उच्च न्यायालयमहात्मा फुलेविले पार्ले विधानसभा मतदारसंघनितंबविवाहमूलद्रव्यअश्वगंधापाऊसदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघव्यापार चक्रनामअमरावती लोकसभा मतदारसंघईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघबौद्ध धर्मबीड लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपंचायत समितीपंढरपूरप्रकल्प अहवालमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनगर्भाशयमहाराष्ट्राचे राज्यपालकोटक महिंद्रा बँकअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९प्रतापगडभारतीय रेल्वेशिवनेरीसप्तशृंगी देवीशिवसेनापोलीस महासंचालकशिरूर विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीदिल्ली कॅपिटल्स२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकावीळरविकिरण मंडळदिशासावता माळीअरिजीत सिंगआंबेडकर कुटुंबप्रेमानंद महाराजपरातअक्षय्य तृतीयानैसर्गिक पर्यावरणपश्चिम महाराष्ट्रहोमरुल चळवळतमाशामहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)स्नायू🡆 More