लेडी गागा

स्टेफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा (इंग्रजी: Stefani Joanne Angelina Germanotta), ऊर्फ लेडी गागा (इंग्रजी: Lady Gaga) (२८ मार्च, इ.स.

१९८६ - हयात) ही एक अमेरिकन पॉप गायिका व संगीतकार आहे.

लेडी गागा
लेडी गागा
लेडी गागा
आयुष्य
जन्म २८ मार्च, १९८६ (1986-03-28) (वय: ३८)
जन्म स्थान न्यू यॉर्क, Flag of the United States अमेरिका
संगीत साधना
गायन प्रकार पॉप
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायक, गीतकार, मॉडेल
कारकिर्दीचा काळ इ.स. २००६ - चालू

जीवन

मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या स्टीफनीने १७ व्या वर्षीच पारंपरिक शिक्षणापासून फारकत घेतली. न्यू यॉर्कमध्ये कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन संगीत नाटकांमध्ये काही काळ घालविला. तेथेच एक रॉक बँड स्थापन करून जेमतेम १०-२० श्रोत्यांसमोर आपल्या गाण्यातली उमेदवारी केली.

या काळात तिने रॉकस्टार बनण्याचा निर्धार केला. खर्चासाठी एक वर्ष पुरतील इतके पैसे वडिलांकडून घेऊन ती अतिशय बजेट भाड्याच्या खोल्यांमधून काटकसरीने राहिली[ संदर्भ हवा ]. रॉकस्टार बनण्यासाठी सौंदर्य, कमनीय देह इत्यादी वैशिष्ट्ये नसली, तरीही आत्मविश्वास, शब्दसंपदा आणि खणखणीत आवाज यांची तिच्याकडे कमतरता नव्हती. सुरुवातीला नाणावलेल्या पॉपस्टारांसाठी गाणी लिहिता लिहिता तिला आपल्या आवाजातले गाणे श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली. यू ट्यूब, सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर जगणाऱ्या पिढीने लेडी गागाची खासियत कानोकानी पोहोचविली.

तिच्या गाण्यावर इ.स. १९८०-९० च्या दशकातील इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव आहे. शब्द हे खास शस्त्र बनून, सरधोपट नसलेल्या शैलीतून येणारे असल्याने लेडी गागाने मायकेल जॅक्सन, मॅडोना या दिग्गज कलाकारांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच कमावून दाखविली. ग्रॅमीसोबत सर्व संगीत सन्मान पटकावणाऱ्या, प्रभावशाली व्यक्तींमधील अग्रस्थान गाठणाऱ्या गागाकडे या शतकातील सर्वांत बुद्धिमान गायिका म्हणून पाहता येईल[ संदर्भ हवा ].

Tags:

इंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीनिवास रामानुजनस्ट्रॉबेरीशिवनेरीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारतीय निवडणूक आयोगचाफाहृदयफुटबॉलसावता माळीभारतातील जातिव्यवस्थाभारत राष्ट्रीय क्रिकेट संघनरेंद्र मोदीप्राण्यांचे आवाजगिटारभारूडसोनचाफानांदेड लोकसभा मतदारसंघलता मंगेशकरमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गअळीवसिंधुताई सपकाळतुळजापूरधूलिवंदनक्लिओपात्राइंडोनेशियाभारताचे सर्वोच्च न्यायालयसेंद्रिय शेतीमहागणपती (रांजणगाव)रंगपंचमीबिबट्याटरबूजअण्णा भाऊ साठेवातावरणहिंदू धर्मकुत्राजागतिक व्यापार संघटनाक्रिकेटचा इतिहासदिशाहरितगृहभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळछत्रपती संभाजीनगरखाशाबा जाधवनवरी मिळे हिटलरलासौर ऊर्जाउंबरपारिजातकएकांकिकानिवडणूकगुड फ्रायडेलोकमतलगोऱ्याजिल्हा परिषदहिरडाज्वालामुखीभारतीय संसदज्वारीनदीमराठी व्याकरणसविनय कायदेभंग चळवळनाटकमुंबई इंडियन्सऊसभारत छोडो आंदोलनघोडावेरूळ लेणीआचारसंहितासंभाजी राजांची राजमुद्रासातारा लोकसभा मतदारसंघविज्ञानअनंत गीतेबलुतेदारआणीबाणी (भारत)कथकबहिणाबाई चौधरीतरससात बाराचा उतारा🡆 More