यकृत

यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो.

किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते.

शरीरशास्त्र :

यकृत 
पचनसंस्थेतील उदरपोकळीतील अन्य अवयवांसह यकृताचे स्थान

प्रौढ अशा मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. हे मानवाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे अवयव उदराच्या वरच्या बाजुस बरगड्यांच्या खाली स्थित असते. यकृताला दोन भाग असतात.

  1. उजवा भाग (Right lobe)- हा डाव्या भागापेक्षा मोठा असतो.
  2. डावा भाग (left lobe)

रक्तप्रवाह :

स्प्लेनिक रक्तवाहिनी ही मेसेन्ट्रीक रक्तवाहिनीशी जोडलेली असते. पोर्ट्ल व्हेन द्वारे आतड्यांकडील रक्त यकृताकडे आणले जाते व त्यावर यकृतातील पेशी काम करतात व आवश्यक घटक साठवले जातात.

कार्ये

यकृत 
पचनसंस्थेतील यकृत व पित्ताशय
  • शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते.
  • तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.
  • शरीरातील सुमारे 7% लोह यकृतात साठवलेले असते.
  • यकृता मध्ये सहा महिने पुरेल एवढा 'अ' जीवनसत्त्वचा साठा असतो
  • आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.
  • निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिनची निर्मीती करणे.
  • तसेच पित्त रस तयार करून त्या द्वारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे.
  • आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.

आजार

यकृत 
शस्त्रक्रियेदरम्याण यकृताची कर्करोगाची गाठ

शरीरातील अनावश्‍यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थांचा यकृतावर ताण येऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.

  1. सिरॉसिस म्हणजेच यकृत -हास. हा यकृताचा एक गंभीर आजार असून यात यकृताचे कार्य सुरळीत पार पाडणाऱ्या महत्त्वाच्या पेशींची हानी होते. हानी झालेल्या पेशींची जागा सामान्य पेशी घेतात आणि यकृतात होणाऱ्या रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करून त्यांचे कार्य रोखून धरतात. हळूहळू यकृताची सामान्य कामकाज करण्याची क्षमता कमी होते. यालाच यकृताचे कार्य बंद पडणे किंवा ‘लिव्हर फेल्युअर’ असे म्हणतात.
  2. सांसर्गिक हेपेटाइटिस- व्हायरल सांसर्गिक हेपेटाइटिसचे काही प्रकार आहेत.यात विषाणू बाधा होते.
    • व्हायरल हेपेटाइटिस- अ
    • व्हायरल हेपेटाइटिस- ब
    • व्हायरल हेपेटाइटिस- क
    • व्हायरल हेपेटाइटिस- इ
  3. यकृताचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे.
  4. अमिबामुळे होणारा यकृतातील गंड

प्रतिबंध

  • कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकलेले खाद्य-पेय पदार्थ टाळणे, रासायनिक द्रव्यांनी युक्‍त औषधे, उत्पादने टाळणे.
  • प्यायचे पाणी 20 मिनिटांसाठी उकळून घ्यावे. केवळ फिल्टर केलेले पाणी उकळवलेल्या पाण्याप्रमाणे सुरक्षित नसते. शक्‍यतो कोमट पाणी प्यावे. उघड्यावरचे, स्वच्छतेची व ताजेपणाची व प्रतीची खात्री नसलेले अन्न खाणे टाळावे.
  • मद्यप्राशन करणे टाळावे.

Tags:

यकृत शरीरशास्त्र :यकृत रक्तप्रवाह :यकृत कार्येयकृत आजारयकृत प्रतिबंधयकृत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हरितक्रांतीराज्य निवडणूक आयोगअकोला जिल्हाशिवमुंजस्थानिक स्वराज्य संस्थामृत्युंजय (कादंबरी)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदातेजस ठाकरेताराबाईहवामानज्ञानेश्वरक्रिकेटपोलीस पाटीलमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाविठ्ठल रामजी शिंदेश्रीपाद वल्लभकोकणअण्णा भाऊ साठेलोकमतवर्धमान महावीरभोपळानांदेड जिल्हाअध्यक्षडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लपसायदानमहालक्ष्मीपृथ्वीवर्धा विधानसभा मतदारसंघहिंगोली लोकसभा मतदारसंघजगातील देशांच्या राजधान्यांची यादीस्वरउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघनदीवडपानिपतची दुसरी लढाईतुकडोजी महाराजमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्र लोकसेवा आयोगश्रीनिवास रामानुजननंदुरबार लोकसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेमुंबईनागपूरसोनेमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी२०२४ लोकसभा निवडणुकागगनगिरी महाराजभाऊराव पाटीलभारतीय रिपब्लिकन पक्षजळगाव जिल्हालोणार सरोवरइतर मागास वर्गजैन धर्मतोरणाविष्णुमराठी भाषासंग्रहालयसमुपदेशनयवतमाळ विधानसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमहात्मा फुलेनाशिकपवनदीप राजननक्षत्रसौंदर्यालक्ष्मीभारताची जनगणना २०११शुभं करोतिनाशिक लोकसभा मतदारसंघशाश्वत विकासधोंडो केशव कर्वेकुर्ला विधानसभा मतदारसंघमिया खलिफाविधान परिषदजागतिक लोकसंख्यासिंहगड🡆 More