तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे.
" | तुळस |
---|
" | शास्त्रीय वर्गीकरण |
|
इतर नावे |
|
आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. फुलामध्ये संगुधी तेल असते . फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते.
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच.तुळस या वनस्पतीला कुटूंबातील सदस्य मानतात व म्हणून तिचे लग्नकरतात अनेकजण,विशेषतः हिंदू नित्य-नेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो.
गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात. कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत.
“ | दुर्वा कषाया मधुराश्च शीता । पित्ततृषारोचक वान्तिहज्यः। तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत। | ” |
म्हणजे दुर्वा या तुरट-गोड तर तुळस ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी (अशी असते).
दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालत असल्याने दुसरी चालत नाही.
This article uses material from the Wikipedia मराठी article तुळस, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.