तुरुंग

अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात.

तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणाऱ्या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात.

अन्य शब्द

तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, जेल, प्रिझन असे अनेक शब्द आहेत.

महाराष्ट्र राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग, ३१ जिल्हा तुरुंग, १३ खुले तुरुंग, १७२ उपतुरुंग आणि एक खुली वसाहत आहे.

महाराष्ट्रील मध्यवर्ती तुरुंग असलेली शहरे

  • अमरावती
  • औरंगाबाद (हर्सूल)
  • कोल्हापूर (कोळंबा)
  • ठाणे
  • तळोजा (खारघर, नवी मुंबई)
  • नागपूर
  • नाशिक रोड
  • पुणे (येरवडा)
  • मुंबई (आर्थर रोड)


पहिल्या वर्गाचे जिल्हा तुरुंग

  • अकोला
  • कल्याण
  • चंद्रपूर
  • धुळे
  • नाशिक (बालतुरुंग)
  • बुलढाणा
  • भंडारा
  • यवतमाळ
  • रत्‍नागिरी
  • वर्धा

दुसऱ्या वर्गाचे जिल्हा तुरुंग

अलिबाग, अहमदनगर, उस्मानाबाद, जळगाव, नांदेड, परभणी बीड, बुलढाणा, भायखळा, येरवडा (महिला तुरुंग), विसापूर, सांगली, सातारा, सावंतवाडी, सोलापूर.

तिसऱ्या वर्गाचे जिल्हा तुरुंग

  • जे.जे. हॉस्पिटल (भायखळा-मुंबई)
  • कोल्हापूर जिल्हा तुरुंग

पहिल्या वर्गाचे खुले तुरुंग

  • पैठणचा खुला तुरुंग
  • येरवडा-पुणे येथील खुला तुरुंग

दुसऱ्या वर्गाचे खुले तुरुंग

  • औरंगाबाद खुला तुरुंग

कैद्यांसाठी खुली वसाहत

  • आटपाडी (सांगली जिल्हा)

उपतुरुंग

हा अतिशय छोटा तुरुंग असून यात कैद्यांची संख्याही अत्यल्प असते. या तुतुंगाची व्यवस्था तुरुंग-खाते बघत नाही, तर महसूल खात्याकडे याची देखभाल असते. तालुक्याचा मामलेदार या तुरुंगावरचा अधिकारी असतो. हे तुरुंग बहुधा तालुक्याच्या मुख्यालयाच्या गावी असतात.

पॅरोल आणि फर्लो

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल (संचित रजा) आणि फर्लो (अभिवचन रजा) नावाच्या सुट्ट्यांवर तुरुंगाबाहेर जायला मिळते. यातील फर्लो रजा मिळणे हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. थोड्याथोड्या दिवसांनी कैद्याला आपल्या कुटुंबात रहावयास मिळावे आणि त्याचे सामाजिक संबंध स्थापित रहावे म्हणून ही रजा असते. फर्लो (Furlough) मिळण्यासाठी कैद्याला कोणतेही कारण द्यावे लागत नाही. फर्लोचा कालावधी ही शिक्षेतले सूट समजली जाते.

कैद्याचे जवळचे नातेवाईक आजारी असतील, किंवा घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असेल तर कैदी संचित रजेसाठी अर्ज करू शकतो. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यावर, कैद्याचे तुरुंगातले वर्तन पाहून आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवूनच ही रजा दिली जाते. कारागृहाचा अधिकारी १४ दिवसांची संचित रजा देऊ शकतो, तर संबंधित विभागीय आयुक्त ३० दिवसांपर्यंत संचित रजा देऊ शकतात. यात वाढही होऊ शकते.

संजय दत्तला मे २०१३मध्ये कैदेची शिक्षा झाली. मे २०१५ पर्यंत त्याला पाच महिने रजा (पॅरोल व फर्लो) मिळाली होती. त्यानंतर पुन्हा मुलीच्या नाकाच्या शस्त्रक्रियेचे कारण दाखवून त्याला ऑगस्ट २०१५ मध्ये पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांची संचित रजा मंजूर केली.

Tags:

तुरुंग अन्य शब्दतुरुंग महाराष्ट्रील मध्यवर्ती असलेली शहरेतुरुंग पहिल्या वर्गाचे जिल्हा तुरुंग दुसऱ्या वर्गाचे जिल्हा तुरुंग तिसऱ्या वर्गाचे जिल्हा तुरुंग पहिल्या वर्गाचे खुले तुरुंग दुसऱ्या वर्गाचे खुले तुरुंग कैद्यांसाठी खुली वसाहततुरुंग उपतुरुंग पॅरोल आणि फर्लोतुरुंग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बुद्धिबळईमेलकेंद्रशासित प्रदेशराम मंदिर (अयोध्या)महाराष्ट्र पोलीससूर्यकुमार यादवकवठएकांकिकामाती प्रदूषणनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघदहशतवाददूधलोकशाहीसनरायझर्स हैदराबाद २०२२ संघअर्थशास्त्रमहाराष्ट्र गीतपुरंदरचा तहग्रंथालयरवींद्रनाथ टागोररामटेक विधानसभा मतदारसंघघोणसअनंत गीतेचंद्रउद्धव ठाकरेसातारा जिल्हामुखपृष्ठवेरूळ लेणीतुळजाभवानी मंदिरतापमानकथकछत्रपतीराज्यसभागणेश दामोदर सावरकरकांजिण्याशाहू महाराजराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)हृदयउच्च रक्तदाबहिरडालगोऱ्यामहाराष्ट्र विधानसभागडचिरोली जिल्हागोविंद विनायक करंदीकरनिसर्गअजिंठा लेणीमहाराष्ट्राची हास्यजत्रागुजरातनिवडणूकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळचंद्रशेखर आझादचंद्रशेखर वेंकट रामनकुंभ रासटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपपईमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभारतीय लष्करठाणे लोकसभा मतदारसंघशिरूर लोकसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेगुढीपाडवापोक्सो कायदाआम्ही जातो अमुच्या गावासिंधुदुर्गकबड्डीसायबर गुन्हानवग्रह स्तोत्रवल्लभभाई पटेलभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसायना नेहवालनांदुरकीन्यायसिन्नर विधानसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ🡆 More