वल्लभभाई पटेल

वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ आॕक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते.

संक्षिप्त सूची
वल्लभभाई पटेल
सरदार वल्लभभाई पटेल
पूर्ण नाव वल्लभभाई पटेल
जीवनकाळ ऑक्टोबर ३१, १८७५
(नडियाद, खेडा जिल्हा, गुजरात)
ते
डिसेंबर १५, १९५०
आई-वडील लाडबा व झवेरभाई
पत्‍नी झवेरबा
शिक्षण बॅरिस्टर
धर्म हिंदू
कार्यषेत्र राजकारण
गौरव 'भारताचे लोहपुरुष', 'सरदार'

वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाबदिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

जन्म व कौटुंबिक जीवन

वल्लभभाई पटेल 
गांधी यांच्यासमवेत पटेल

वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. ते१८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरुवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.

अन्य

जुनी सांगवी (पुणे) येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन भरवते. हीच संस्था गावोगावी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन भरवते. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी आठवे एकात्मता संमेलन होणार आहे.

पटेलांसंबंधी पुस्तके

  • पोलादी राष्ट्रपुरुष (अरुण करमरकर) : या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘चेतना पुरस्कार’ प्रदान झाला. (मे २०१७).
  • महामानव सरदार पटेल (अनुवादित, अनुवादक - सुषमा शाळिग्राम; मूळ गुजराथी, लेखक - दिनकर जोषी)
  • लोहपुरुष (सुहास फडके)
  • लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (मूळ इंग्रजी - लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक - विलास गिते.)
  • सरदार पटेल (मूळ इंग्रजी लेखक - आर.एन,पी. सिंग; मराठी अनुवाद - जयश्री टेंगसे)

पुरस्कार

  • वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.
  • २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते.

संदर्भ

Tags:

वल्लभभाई पटेल जन्म व कौटुंबिक जीवनवल्लभभाई पटेल अन्यवल्लभभाई पटेल पटेलांसंबंधी पुस्तकेवल्लभभाई पटेल पुरस्कारवल्लभभाई पटेल संदर्भवल्लभभाई पटेल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जय श्री रामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेउच्च रक्तदाबसावित्रीबाई फुलेसंस्‍कृत भाषानांदेड जिल्हाशिवाजी महाराजआंबाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीलोकमतप्राण्यांचे आवाजहोनाजी बाळानक्षलवादकृष्णकुटुंबमहाराष्ट्र विधानसभातेजस ठाकरेगोंदवलेकर महाराजआनंद शिंदेनवरी मिळे हिटलरलामहाराष्ट्रातील आरक्षणसामाजिक माध्यमेउदयनराजे भोसलेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघक्रिकेटचे नियमपारंपारिक ऊर्जाआंबेडकर जयंतीराजकारणसविता आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाविष्णुसहस्रनामययाति (कादंबरी)सावता माळीजास्वंदशुद्धलेखनाचे नियमसंयुक्त महाराष्ट्र चळवळशेतीसूत्रसंचालनभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीजालना जिल्हानागरी सेवाभारताचा ध्वजभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसाईबाबाबाजरीविठ्ठल रामजी शिंदेनाझी पक्षअशोक चव्हाणचिपको आंदोलनपृथ्वीचे वातावरणन्यूझ१८ लोकमतचंद्रअण्णा भाऊ साठेअर्थशास्त्रकल्याण लोकसभा मतदारसंघमहेंद्र सिंह धोनीनियोजनकीर्तनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकुटुंबनियोजनभारताच्या पंतप्रधानांची यादीआळंदीभारताचे सर्वोच्च न्यायालयनवनीत राणापारू (मालिका)हिंगोली लोकसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठभूकंपनातीराम सातपुतेसोनेनवग्रह स्तोत्रभारतीय जनता पक्षप्रार्थना समाजनाशिक लोकसभा मतदारसंघभाषालंकारमहाराष्ट्र विधान परिषद🡆 More