तापी नदी

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे.

ही पश्चिमवाहिनी नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्रगुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग, खानदेश, व गुजरातमधील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदीची मुख्य उपनदी ही पूर्णा नदी आहे.

तापी नदी
तापी
तापी नदी
सुरत जवळील तापी नदी
इतर नावे ताप्ती
उगम मुलताईजवळ
मुख अरबी समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात
लांबी ७२४ किमी (४५० मैल)
उगम स्थान उंची ७४९ मी (२,४५७ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६५,१४५
उपनद्या पूर्णा, गिरणा नदी, वाघूर
धरणे उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण

उगम

तापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव "मूळतापी" आहे.

मुख

६७० कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी नदी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.

उपनद्या

पूर्णा

पूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे तसेच हिला संपूर्णा असेही म्हणतात. ही नदी तापी नदीला समांतर पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा नदीआस नदीउतावळी नदीउमा नदीकाटेपूर्णा नदी,गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदीनळगंगा नदीनिपाणी नदीनिर्गुणा नदीपेंढी नदीबोर्डी नदीभावखुरी नदीमन नदीमास नदीमोर्णा नदीवाण नदी, विश्वगंगा नदीशहानूर नदीज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी अमरावतीअकोलाबुलढाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.

अनेर नदी

अनेर नदी
पाणलोट क्षेत्रामधील प्रदेश- बडवानी जिल्हा, मध्य प्रदेश, जळगाव जिल्हामहाराष्ट्र

अनेर नदी ही मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांतील सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या ठिकाणी उगम पावते. जळगाव जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावातून वाहणारी अनेर नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमारेषा आहे. पुढे ही नदी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. तापीला उजवीकडून मिळणारी ही तापीची सर्वात मोठी उपनदी आहे. नैर्ऋत्य दिशेला ९४ कि.मी. वाहून, अनेर नदी जळगाव जिल्ह्यातील पिळोदा या गावाजवळ तापीला मिळते. अनेर नदीच्या काठावर तोंदे, अजंदे, होळ, नांथे, मोहिदा, वेळोदे, पिळोदा ही गावे आहेत. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले अनेर धरण हे मातीचे धरण याच नदीवर आहे. अनेर नदीचे खोरे १७०२ चौरस किलोमीटर आकारमानाचे आहे.

गिरणा

गिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील 'दळवट' या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते. मांजरा नदीची उपनदी आहे. उजव्या बाजूने मांजरा नदीला मिळते. वाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून ईशान्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला तितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अंमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते.

गिरणा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इ. पिके होतात.

गिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरणयोजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे.

वाघूर

वाघूर नदी  ही  तापी नदीची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणीमध्ये झाला आहे. ही नदी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांमधून वाहते. भुसावळ तालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा तापीशी संगम झाला आहे.

इतर उपनद्या

पूर्णा नदी शिवा नदी गोमाई नदी पेंढी नदी
अरुणावती नदी वाकी नदी अनेर नदी खंडू नदी
मोसम नदी बुराई नदी उमा नदी गाडगा नदी
गिरणा नदी आस नदी वाण नदी चंद्रभागा नदी
निर्गुण नदी गांधारी नदी मोरणा नदी भुलेश्वरी नदी
शाहनूर नदी भावखुरी नदी काटेपूर्ण नदी आरणा नदी
मास नदी उतवळी नदी विश्वामैत्री नदी सिपना नदी
नळगंगा नदी निपाणी नदी विश्वगंगा नदी कापरा नदी
गिमा नदी तितुर नदी वाघुर नदी तिगरी नदी
पांझरा नदी वाघूर नदी कान नदी सुरखी नदी
बुरशी नदी गंजल नदी आंभोरा नदी नेसू नदी

पौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते.
या नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे 'तापी' असे नामकरण केले गेले.

हेही वाचा

  • तापी नदी, थायलंड

Tags:

तापी नदी उगमतापी नदी मुखतापी नदी उपनद्यातापी नदी हेही वाचातापी नदीखानदेशगुजरातपूर्णाबेतुल जिल्हाभारतमध्य प्रदेशमहाराष्ट्रविदर्भसुरत जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भरती व ओहोटीबुद्धिबळकादंबरीलहुजी राघोजी साळवेसैराटअर्थ (भाषा)शब्द सिद्धीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभाषालंकारहनुमानधनंजय मुंडेपोलीस महासंचालकभोपाळ वायुदुर्घटनाविश्वजीत कदमउंबरनरसोबाची वाडीरमाबाई आंबेडकरवंजारीमराठी व्याकरणबारामती लोकसभा मतदारसंघडाळिंबअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपु.ल. देशपांडेपश्चिम महाराष्ट्रमातीतापमानसूर्यमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागरावेर लोकसभा मतदारसंघबीड लोकसभा मतदारसंघनक्षलवादमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीजोडाक्षरे२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाघोरपडकुत्राबँकसंजय हरीभाऊ जाधवनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघजायकवाडी धरणपृथ्वीभारतीय रेल्वेआईस्क्रीममहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकोल्हापूरप्रणिती शिंदेनक्षत्रधाराशिव जिल्हाभारतीय स्टेट बँकबाबा आमटेराजकीय पक्षभारतीय आडनावेहोमी भाभाहृदयइंग्लंडगूगलसमाजशास्त्रपद्मसिंह बाजीराव पाटीलभारतीय रिपब्लिकन पक्षपानिपतची पहिली लढाईसंस्कृतीशीत युद्धकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणतोरणामहाराष्ट्राचा इतिहाससकाळ (वृत्तपत्र)कबड्डीहिमालयसेंद्रिय शेतीभारतीय संस्कृतीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनदीपक सखाराम कुलकर्णीवाघ🡆 More