टेलर स्विफ्ट

टेलर ॲलिसन स्विफ्ट (१३ डिसेंबर १९८९) ही एक अमेरिकन गायक-गीतकार आहे.

तिचे गीतलेखन, कलात्मकता आणि उद्योजकतेचा संगीत उद्योग आणि लोकप्रिय संस्कृतीवर प्रभाव पडला आहे. टेलर स्विफ्टचे जीवन हा नेहमी बातम्यांचा विषय असतो.

टेलर स्विफ्ट
टेलर स्विफ्ट
अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समधील छायाचित्र (२०१९)
पार्श्वभूमी ची माहिती
जन्म १३ डिसेंबर, १९८९ (1989-12-13) (वय: ३४)
निवास नॅशविल, टेनेसी, अमेरिका
शैली
  • पॉप संगीत
  • कंट्री संगीत
  • लोकसंगीत
  • रॉक संगीत
  • पर्यायी संगीत
व्यवसाय गायिका, अभिनेत्री
वाद्ययंत्र
  • गायन
  • गिटार
  • बॅन्जो
  • पियानो
  • युकुलेल
सक्रिय वर्ष २००४ – सध्या

स्विफ्टने वयाच्या १४ व्या वर्षी व्यावसायिक गीतलेखन सुरू केले. २००५ मध्ये तिने बिग मशीन रेकॉर्डसोबत करार केला. या लेबलखाली तिने सहा स्टुडिओ अल्बम प्रदर्शित केले, यापैकी टेलर स्विफ्ट (२००६) हा पहिला अल्बम होता. फियरलेस (२००८) अल्बममध्ये तिने कंट्री पॉप प्रकारात गायन केले, या अल्बमच्या " लव्ह स्टोरी " आणि " यू बेलॉन्ग विथ मी" या गीतांनी तिला मुख्य प्रवाहात प्रसिद्धी मिळवून दिली. स्पीक नाऊ (२०१०) मध्ये रॉक संगीताचा प्रभाव होता, तर इलेक्ट्रॉनिक संगीत असलेल्या रेड (२०१२) अल्बमचे गाणे "वुई आर नेव्हर गेटिंग बॅक टुगेदर" हे टेलर स्विफ्टचे पहिले बिलबोर्ड हॉट १०० क्रमांक १ गाणे ठरले. तिने १९८९ (२०१४) या सिंथ-पॉप अल्बममधून आपली आतापर्यंतची कंट्री संगीत प्रतिमा सोडली. या अल्बमची " शेक इट ऑफ ", " ब्लँक स्पेस " आणि " बॅड ब्लड " या गाण्यांनी विविध याद्यांमध्ये शीर्ष स्थान पटकावले. नंतर हिप-हॉप प्रकारचा रेप्युटेशन (२०१७) अल्बम प्रदर्शित झाला, ज्यामध्ये क्रमांक एकचे " लूक व्हॉट यू मेड मी डू " गीत आहे. ‌

टेलर स्विफ्टने २०१८ मध्ये रिपब्लिक रेकॉर्डशी करार केला. तिने इक्लेक्टिक पॉप अल्बम लव्हर (२०१९) आणि आत्मचरित्रात्मक माहितीपट मिस अमेरिकाना (२०२०) प्रदर्शित केला. २०२० मधील अल्बम फोकलोर आणि एव्हरमोरवर मध्ये इंडी लोकसंगीत आणि पर्यायी रॉकसंगीत शैली स्वीकारली तर मिडनाइट्स (२०२२) मध्ये पॉप शैलीत गायन केले. पुढे तिने बिग मशीनसह वादानंतर टेलरची आवृत्ती नावाने चार पुन्हा रेकॉर्ड केलेले अल्बम प्रदर्शित केले. या अल्बम्सने " क्रूर समर ", " कार्डिगन ", " विलो ", " अँटी-हिरो ", " ऑल टू वेल ", आणि " इज इट ओव्हर नाऊ? " ही पहिल्या क्रमांकाची गाणी तयार केली. द इरास टूर हा तिचा २०२३-२०२४ कॉन्सर्ट टूर कार्यक्रम हा आतापर्यंतचा जगातील सर्वाधिक कमाई करणारा कॉन्सर्ट कार्यक्रम आहे. टेलरने संगीत व्हिडिओ आणि ऑल टू वेल: द शॉर्ट फिल्म (२०२१) सारखे चित्रपट देखील दिग्दर्शित केले.

सर्वाधिक विक्री होणाऱ्या संगीतकारांपैकी एक असलेल्या टेलर स्विफ्टचे  आतापर्यंत २०० दशलक्ष रेकॉर्ड विकले गेले आहेत. तिच्या नावावर ११७ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द फोनोग्राफिक इंडस्ट्रीकडून तीन वेळा ग्लोबल रेकॉर्डिंग आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार तिला मिळाला आहे. टेलर स्विफ्ट ही सर्वाधिक कमाई करणारी महिला टूरिंग अ‍ॅक्ट आहे, स्पॉटिफाई आणि ऍपल म्युझिकवर सर्वाधिक स्ट्रीम केलेली महिला आहे. संगीत हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेली ती पहिली अब्जाधीश आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर (२०२३) हा सन्मान मिळालेली टेलर स्विफ्ट ही रोलिंग स्टोनची सर्वकालीन महान गीतकारांची यादी, बिलबोर्डची सर्वकालीन महान कलाकारांची यादी आणि फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांची यादी यांसारख्या अनेक याद्यांमध्ये आहे. तिच्या प्राप्त सन्मानांमध्ये १२ ग्रॅमी पुरस्कार (तीन अल्बम ऑफ द इयर विजयांसह), १ प्राइमटाइम एमी अवॉर्ड, ४० अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स ( दशकातील सर्वोत्कृष्ट कलाकार – २०१० सह), ४० बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स आणि २३ एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्स यांचा समावेश आहे. स्विफ्ट ही एक परोपकारी आहे आणि कलाकारांचे हक्क आणि महिला सक्षमीकरणाची ती समर्थक आहे.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भाषामूलद्रव्यशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघसंभाजी भोसलेजिजाबाई शहाजी भोसलेमाहिती अधिकारसमुपदेशनव्हॉट्सॲपबडनेरा विधानसभा मतदारसंघसात आसरासंस्‍कृत भाषाकोटक महिंद्रा बँकप्रज्ञा विवर्धन स्तोत्रदलित एकांकिकाकुपोषणहिंदू कोड बिलतलाठीसंगणक विज्ञानगोंडडाळिंबतमाशावसाहतवादअशोक चव्हाणशेतकरीविठ्ठल रामजी शिंदेबीड विधानसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रचिन्हमिया खलिफाझाडपुरस्कारभारतरत्‍नसिंधु नदीआईम्हणीवनस्पतीअहवालहळदजागतिक व्यापार संघटनापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजनहित याचिकाफुटबॉलसातव्या मुलीची सातवी मुलगीस्थानिक स्वराज्य संस्थानांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीकाळूबाईशिरूर लोकसभा मतदारसंघकावीळजया किशोरीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीहातकणंगले लोकसभा मतदारसंघरमाबाई रानडेदक्षिण दिशासाईबाबाअर्जुन वृक्षअष्टांगिक मार्गदेवेंद्र फडणवीसनाणेमहाराष्ट्रामधील जिल्हेसूत्रसंचालनसर्वनाममिरज विधानसभा मतदारसंघअमित शाहयवतमाळ जिल्हामहाराष्ट्रातील राजकारणबिरजू महाराजऔद्योगिक क्रांतीसोलापूर लोकसभा मतदारसंघभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसमीक्षाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणगणपती स्तोत्रेनामदुष्काळ🡆 More