चिमणी: एक पक्षी

भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. तिला भारतात तपकीर असेही म्हटले जाते.

चिमणी
चिमणी: रान चिमणी, चिमणीचे घरटे, चित्रदालन
चिमणा (नर)
चिमणी: रान चिमणी, चिमणीचे घरटे, चित्रदालन
चिमणी (मादी)
शास्त्रीय नाव सिकोनिया सिकोनिया
(Passer domesticus)
कुळ
(Passeridae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश हाऊस स्पॅरो
(House Sparrow)
संस्कृत चटक, वार्तिका, गृहनीड, पोतकी
चिमणी: रान चिमणी, चिमणीचे घरटे, चित्रदालन
चिमण्यांचा जागतिक आढळ दर्शवणारा नकाशा       मुळ आढळ       नवा आढळ

House Sparrow.ogg चिमणीचा आवाज ऐका

हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात हिच्या काश्मिरी आणि वायव्यी अशा किमान दोन उपजातीही आढळतात.

माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सूर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली.

चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात.[ संदर्भ हवा ]

अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

२० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. या काळात चिमणीची संख्या कमी होत आहे. वीज, मोबाईलमधुन येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे चिमणीच्या आणि इतर पक्षी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

चिमणी शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे कारण ती कीटक सुद्धा खाते. चिमण्यांच्या एकूण ४३ प्रजाती आहेत.

रान चिमणी

शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठी चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काहीअंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.

चिमणीचे घरटे

चिमणी तिचे घरटे स्वतः आणि खूप आकर्षक बनवते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चिमणी घर बनवण्यास सुरुवात करते. साधारणपणे चिमणीचे घर हिरवे बारीक गवत यापासून बनवलेले असते. चिमणीच्या खोप्यावर बहिणाबाई चौधरी यांनी काव्य रचले आहे.

चित्रदालन

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

चिमणी रान चिमणी चे घरटेचिमणी चित्रदालनचिमणी संदर्भचिमणी बाह्य दुवेचिमणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सम्राट अशोक जयंतीयेसूबाई भोसलेसम्राट अशोकदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघहिंदू लग्नसिंधुताई सपकाळहरितक्रांतीकुष्ठरोगआईभाऊराव पाटीलरामदत्तात्रेयपांडुरंग सदाशिव सानेचोळ साम्राज्यपूर्व दिशामाहितीमहाराष्ट्राचे राज्यपालहळदवर्धा विधानसभा मतदारसंघकरवंदमहाराष्ट्राचा इतिहासनामदेवशास्त्री सानपस्वामी समर्थरावेर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीजेजुरीएकविराबच्चू कडूश्रीया पिळगांवकरपानिपतची दुसरी लढाईभारतीय संस्कृतीभारतीय जनता पक्षसमाजशास्त्रहातकणंगले लोकसभा मतदारसंघमुंबईवातावरणराणी लक्ष्मीबाईभारताचे सर्वोच्च न्यायालययशवंत आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभावंजारीभारताचे राष्ट्रपतीमहाबळेश्वरसातारा लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबहावानगदी पिकेमीन रास२०१४ लोकसभा निवडणुकाविजय कोंडकेप्रीतम गोपीनाथ मुंडेइतिहासनवनीत राणाचिमणीधनगरतूळ रासटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीराहुल गांधीएकनाथ शिंदेदेवनागरीइंडियन प्रीमियर लीगमानवी हक्कप्रतिभा पाटीलरविकिरण मंडळहिंगोली विधानसभा मतदारसंघखर्ड्याची लढाईमहारआद्य शंकराचार्यधुळे लोकसभा मतदारसंघअमरावतीहिरडाफकिरामहाराष्ट्रातील किल्लेवर्तुळईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील लोककला🡆 More