कायपरचा पट्टा

कायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे (सूर्यापासून सुमारे ३० खगोलशास्त्रीय एकक (A.U.)) ते ५० खगोलशास्त्रीय एकक यामध्ये पसरला आहे.

हा पट्टा लघुग्रहांच्या पट्ट्यासारखाच आहे, मात्र त्यापेक्षा बराच मोठा, म्हणजे जवळपास २० पट रुंद व २०-२०० पट अधिक वस्तुमान असलेला असा आहे. लघुग्रहांच्या पट्ट्याप्रमाणेच हा पट्ट्यातसुद्धा मुख्यत्वेकरून सूर्यमालेतील छोट्या वस्तू आहेत. जवळपास सर्व लघुग्रह हे पाषाण रूपात असले तरी कायपर पट्ट्यातील जवळपास सर्व वस्तू ह्या गोठलेला मिथेन, अमोनिया व पाण्याचा बर्फ ह्यांच्या बनलेल्या आहेत. प्लूटो, हौमिआमाकीमाकी हे तीन बटु ग्रह या पट्ट्यात आहेत. सूर्यमालेतील काही ग्रहांचे उपग्रह (उ.दा. नेपच्यूनचा ट्रायटनशनीचा फीबी) हे याच पट्ट्यात बनले आणि नंतर त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या पट्ट्यात अडकले आहेत.

कायपरचा पट्टा
कायपरच्या पट्ट्यातील ज्ञात खगोलीय वस्तू, सोबत ४ बाह्य राक्षसी वायुग्रह दाखविले आहेत.

१९९२च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकीत करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)(अल्पायुषी)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू म्हणून गणतात. कायपरच्या पट्ट्यातील वस्तूंमध्ये व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे. जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेपटी तयार होईल.

जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी, प्लूटोपेक्षा थोडा मोठा असलेल्या ट्रायटनचे वातावरण, तसेच त्यावरची भूरचना, यांबाबतीतील अनेक गुणधर्म प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवतीच्या कक्षेत अडकला.

संदर्भ

Tags:

अमोनियाखगोलशास्त्रीय एककट्रायटन (उपग्रह)नेपच्यूनप्लूटोबटु ग्रहमाकीमाकी (बटु ग्रह)मिथेनलघुग्रह पट्टाशनी ग्रहसूर्यमालेतील छोट्या वस्तूहौमिआ (बटु ग्रह)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकमान्य टिळकश्रीधर स्वामीसत्यनारायण पूजासंयुक्त महाराष्ट्र चळवळभारताचे संविधानजगातील देशांची यादीआणीबाणी (भारत)शिवाजी महाराजांचा जीवनक्रमधनंजय चंद्रचूडकापूससंस्‍कृत भाषादौंड विधानसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीदशरथइंग्लंडजाहिरातकुर्ला विधानसभा मतदारसंघजागतिक पुस्तक दिवसहोमी भाभाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमासिक पाळीपारू (मालिका)वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघजय श्री रामजीवनसत्त्वअश्वत्थामाहिमालयवित्त आयोगदुसरे महायुद्धइंदुरीकर महाराजअण्णा भाऊ साठेभारताचे राष्ट्रचिन्हक्लिओपात्रासमुपदेशनभारतातील मूलभूत हक्कबुलढाणा लोकसभा मतदारसंघइंदिरा गांधीलोकमतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेघोरपडनामसोयाबीनसाहित्याचे प्रयोजनवाचनजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नगर परिषदसूर्यनमस्कारकांजिण्याभाषा विकासवृषभ रासजळगाव जिल्हामानसशास्त्रसतरावी लोकसभाप्रीमियर लीगमहाराष्ट्रातील लोककलानक्षत्रठाणे लोकसभा मतदारसंघअजित पवारपरभणी लोकसभा मतदारसंघ२०१९ लोकसभा निवडणुकानिसर्गभीमाशंकरसामाजिक कार्यअमरावती लोकसभा मतदारसंघदिवाळीसरपंचखंडोबामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)करवंदमहादेव जानकरपुणेएकनाथ खडसेमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथजळगाव लोकसभा मतदारसंघनाटकचंद्रगुप्त मौर्यलता मंगेशकरहिंगोली जिल्हा🡆 More