अनंत भवानीबावा घोलप

अनंत घोलप ऊर्फ अनंतफंदी (जन्म : शा.श.

१६६६ / इ.स. १७४४; - शा.श. १७४१ / इ.स. १८१९) हे एक मराठी कवी, शाहीर होते.

जीवन

अनंत फंदी हे संगमनेर येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले.

अनंतफंदींच्या आईचे नाव राऊबाई आणि पत्नीचे म्हाळसाबई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या; त्यांतील कांहीं प्रसिद्ध आहेत. नंतर त्यांनीं तमाशा आरंभिला व नंतर तमाशा सोडला. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चवथे हे अनंतफंदी.

अनंतफंदीस "फंदी" नांव पडण्याचें कारण, पूर्वी संगमनेर येथें मलकफंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमीं लोकांत चमत्कारिक रीतीनें वागत असे म्हणून त्यास फंदी म्हणत. त्या फकिराचा आणि अनंतफंदीचा स्नेह असे. यावरून यासही लोक फंदी म्हणूं लागले. वर सांगितलेले चौघे फंदी तमाशा घेऊन होळकरशाहीत गेले. अनंत फंदींनी आठ लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. शंकराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी या वृत्तांत त्यांनी रचना केल्या आहेत.

साहित्य

  • माधवग्रंथ

अनंदफंदीवरील पुस्तके

  • अनंतफंदीकृत लावण्या, अनेक भाग (चित्रशाळा प्रकाशन)

संदर्भ

बाह्य दुवे


Tags:

अनंत भवानीबावा घोलप जीवनअनंत भवानीबावा घोलप साहित्यअनंत भवानीबावा घोलप अनंदफंदीवरील पुस्तकेअनंत भवानीबावा घोलप संदर्भअनंत भवानीबावा घोलप बाह्य दुवेअनंत भवानीबावा घोलपमराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गंगाराम गवाणकरजगातील देशांच्या राजधान्यांची यादीचीनरमाबाई आंबेडकरअक्षय्य तृतीयातानाजी मालुसरेसप्तशृंगी देवीचमारहिंदू धर्मातील अंतिम विधीपानिपतभीमाशंकरभारताची राज्ये आणि प्रदेशकुळीथवि.स. खांडेकरभारतीय अंतराळ संशोधन संस्थाराजकारणजागतिक बँकबालविवाहहिंदू धर्मलोकसंख्या घनताश्यामची आईज्योतिबाआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५उच्च रक्तदाबलिंगायत धर्मभारताचे पंतप्रधानजागतिक तापमानवाढइंडियन प्रीमियर लीगबाळाजी विश्वनाथअमृता फडणवीसश्रीकांत जिचकारमहाराष्ट्रसम्राट हर्षवर्धनगुळवेलभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसोळा संस्कारव्यवस्थापनचोखामेळास्त्री सक्षमीकरणइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमुख्यमंत्रीलोकसंख्यामहाराष्ट्र विधान परिषदॲडॉल्फ हिटलरहंबीरराव मोहितेमहाबळेश्वररामकृष्णा नदीग्रामीण साहित्यसृष्टी देशमुखकांजिण्यातत्त्वज्ञानमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गशमीदत्तात्रेयसमुपदेशनकर्ण (महाभारत)भंडारा जिल्हागोपाळ हरी देशमुखराज्यसभाभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मखासदारहॉकीव.पु. काळेबैलगाडा शर्यतहरिहरेश्व‍रमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)केदारनाथग्रामगीताआयुर्वेदअप्पासाहेब धर्माधिकारीभारद्वाज (पक्षी)ब्रिज भूषण शरण सिंगहत्तीरोगमहाराणा प्रतापकार्ल मार्क्सजागतिक लोकसंख्याअर्थव्यवस्थासकाळ (वृत्तपत्र)🡆 More