पोवाडा: मराठी वाङ्मय प्रकार

पोवाडा हा अस्सल मराठी वाङ्मयप्रकार असून तो तेराव्या शतकात उदयाला आला आणि सतराव्या शतकापर्यंत जोमात राहिला.

'पोवाडा' हा दृश्य, श्राव्य प्रकार आहे. पोवाड्याचा उल्लेख 'कीर्ती' काव्यात केला जातो. पोवाडा म्हणजे "वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या मते बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा", तरी सुद्धा पोवाडा म्हणजे ठासून स्तुती करणे किंवा वीरांच्या पराक्रमाचे स्तुतीपर गेय कवन असे म्हणत.

पोवाड्याची उत्पती

पोवाडयाच्या सर्वांत जुना उल्लेख महिकावतिच्या बखरीत सापडतो. यासंदर्भात वि. का. राजवाडे लिहितात. बिंबराजाचा पुत्र केशव देव - याने मोठ्या ऐश्वर्याने बारावर्षे राज्य केले. त्याने राजपितामह म्हणजे आसपासच्या सर्व लहानसहान संस्थानिकांना आजा ही पदवी धारण केली. व त्या अर्थाचे बडेजावीचे गद्य पद्य पोवाडे रचिले म्हणजेच सर्वसाधारणपणे शके अकराशेच्या सुमारास मराठी भाषेत पोवाडयाची व्युत्पत्ती झाली असावी असे दिसते. वि. का. राजवाडे यांनी पोवाडयाची परंपरा चंपू काव्याशी निगडीत असल्याचे मत संपा दित बखरीच्या विवेचनामध्ये व्यक्त केले आहे. तसेच सुरुवातीचे हे पोवाडे गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरुपाचे दिसतात. 'पोवाडा' या शब्दाच्या उत्पत्ती संबंधीचा आणखी एक उल्लेख बाराव्या, तेराव्या शतकाच्या सुमारास ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पहावयास मिळतो. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये अनुक्रमे दहाव्या आणि एकशे त्रेसष्टाव्या ओवीमध्ये "पवाडा" असा शब्द आढळतो. याठिकाणी पवाडा याच अर्थ काही ठिकाणी स्तुती तर काही ठिकाणी युद्ध, झगडा असा घेतलेला दिसतो. यादवांच्या दरबारी यादवराजांची स्तुती गाण्यासाठी भाट होते. या भाटांचा गायनपरंपरेचा परिणाम शिवशाहीतील शाहि रांच्यावर झाला असावा. आणि या भाटांच्या संपकानेच अज्ञानदासा सारख्या शाहिराने आपल्यामध्ये असणा-या सुप्त काव्यशक्तीला मुक्त करून पोवाडयाची परंपरा शिवशाहीमध्ये रुजू केली असावी. अज्ञानदास " सारख्या काही कवींनी गुरुस्तुती सारख्या विषया . वर क्वचीत पोवाडयाची रचना केलेली दिसते. म्हणजेच इसवी सन १६५९ च्या पूर्वीच काहीप्रमाणात का असेना पोवाडा लोकप्रिय झालेला दिसतो. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व पोवाडयापैकी सर्वात जुना आणि पहिला पोवाडा 'अज्ञानदास यांनी लिहिलेला आहेया पोवाडयाची सुरुवात आपल्या त्याचा विषय शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आहे गुरुला नारायण' या नावाने नमन करून केलेली आहेहा पोवाडा केवळ नाममात्र पद्य आहे अन्यथा याची उद. रचना एकतारी तुणतुण्यावर सहज सुराने गाता येईल अशी गद्याचीच आहे

"डावे हाती बिचवा ल्याला । वाघनख सरजाच्या पंजाला॥ वरून बारीक झगा ल्याला । कंबररस्ता वेढा केला । पोलाद घातला गळां ॥ फीरंग पट्टा जिऊ म्हाल्याप दिला । शिवाजी सरजा बंद सोडुनि चालला ॥"

या नंतरचा दुसरा पोवाडा तुलसीदास यानी शिवकालातील १२ अनेक राजकीय घटनांवर आधारित रचलेला दिसतो. त्याने आपण स्वतः शाहीर आहोत. असे स्पष्ट सांगितलेले आहे. त्यानंतर यमाजी " हा सुद्धा नारायणाचे स्मरण करणारा असून " बाजी पासलकर यांच्या जीवनावर पोवाडा रचलेला दिसतो. वरती निर्देश केलेले सर्व पोवाडे हे सर्वसाधारणपणे मराठेशाहीच्या पूर्वार्धातील आहेत. उत्तरार्धातील पोवाडयांच्यामध्ये 'खर्ड्याची लढाई' वरील पोवाडा हसन याने रचलेला दिसतो. याच विषयावरचे तत्कालीन काळातील आणखी बरेच पोवाडे कवी राणू गुदाजी कवी बाळा लक्ष्मण" कवी भुजंग आप्पा अशा अनेक शाहिरांनी खर्ड्याची लढाईचे वर्णन केलेले दिसते.

आधुनिक पोवाडे

विसाव्या शतकात शिवाजी महाराजां सोबतच, स्वांतत्र्य चळवळीतील प्रमुख लोकनेते आणि तदनंतर सामाजिक चळवळी मध्ये अग्रेसर असणारे समाजसेवक यांचा कार्यगौरव करण्यासाठी अनेक पोवाडे लिहीले गेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, आझाद हिंद सेनेचे सुभाषचंद्र बोस, संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेच्या शिक्षणासाठी झटणारे कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्या जीवनावर अनेक पोवाडे लिहीले आहेत.लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेला एक लोकप्रिय पोवाडा खाली उद्धृतं केला आहे.

भिमरायाने मोलाचा संदेश दिला I आम्ही ही स्वीकारली पंचशीला ll
त्या भिमाच्या रूपाने एक सूर्य उगविला l जीवनातला अंधार पार निघूनच गेला llध्रुll
दलितांना नव्हते पाणी, दलितांना नव्हती वाणी l माणूस एक असोनी जवळी ना घेती कोणी ll
परी ह्या भीमाने एक चमत्कारच केला ll१ll... .

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंचायत समितीवैकुंठभगवद्‌गीतादिंडोरी लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघअश्वगंधाशब्दअरविंद केजरीवालभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हअण्णा भाऊ साठेविवाहप्रतापगडनक्षत्रग्राहक संरक्षण कायदाचंद्रशेखर आझादउदयनराजे भोसलेविठ्ठल रामजी शिंदेअळीवरक्तमोगराजागतिक व्यापार संघटनानाशिकसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकप्राण्यांचे आवाजमातीइतिहासहरभरासविनय कायदेभंग चळवळगोरा कुंभारसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीविरामचिन्हेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमोरहातकणंगले लोकसभा मतदारसंघजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेहिरडायूट्यूबप्रदूषणजळगाव जिल्हाजेजुरीहत्तीस्वरआचारसंहितामुघल साम्राज्यव्यवस्थापनउत्पादन (अर्थशास्त्र)सत्यशोधक समाजभारताचे राष्ट्रपतीप्रकाश आंबेडकरजया किशोरीवस्तू व सेवा कर (भारत)हरितगृह वायूगुढीपाडवामराठी भाषेमधील वृत्तपत्रेअजिंक्यताराअर्जुन वृक्षगोवरभारतीय पंचवार्षिक योजनापानिपतची पहिली लढाईशीत युद्धमहाराष्ट्रातील वनेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकेंद्रीय लोकसेवा आयोगभारत छोडो आंदोलनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीवेदबाळ ठाकरेशिरूर लोकसभा मतदारसंघकापूससंगणक विज्ञानहोळीविहीरकल्याण लोकसभा मतदारसंघभाडळीआनंदीबाई गोपाळराव जोशीरामटेक विधानसभा मतदारसंघ🡆 More