व.पु. काळे

वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील लेखक होते.

ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.

वसंत पुरुषोत्तम काळे
जन्म नाव वसंत पुरुषोत्तम काळे
टोपणनाव वपु, व.पु. काळे
जन्म २५ मार्च १९३२ (1932-03-25)
मृत्यू २६ जून, २००१ (वय ६९)
मुंबई, महाराष्ट्र, माझे माझ्य्यापाशी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र स्थापत्यशास्त्र, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा
कादंबरी
कथाकथन
प्रसिद्ध साहित्यकृती ही वाट एकटीची, पार्टनर
प्रभाव ओशो रजनीश
वडील पुरुषोत्तम काळे
पुरस्कार पु.भा. भावे


ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.


काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. २६ जून २००१ रोजी मुंबई येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं राहत्या घरात निधन झाले.

जीवन

व.पु.काळे मुंबई महानगरपालिकेत होते. पेशाने वास्तुविशारद होते. लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार, अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणस, दोस्त, माझ्या माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फोर द रोड, रंग मनाचे, माणूस, वपुर्झा, हुंकार, असे पत्रसंग्रह, ललीतप्रकार खुपच प्रसिद्ध आहेत. तसेच तप्तपदी ठिकरी व वाट एकटीची यासारख्या कादंबरी खूपच गाजल्या. तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. ज्या वेळी व.पु.चे निधन झाले. त्याच्या २ वर्षापासून ते एका विचित्र मन स्थितीमध्ये होते. त्यांना जीवनाची निराशा आली होती.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

साहित्यकृतीचे नाव प्रकाशनवर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशक
आपण सारे अर्जुन वैचारिक
इन्टिमेट कथासंग्रह
ऐक सखे कथासंग्रह
कथा कथनाची कथा ललित
कर्मचारी कथासंग्रह
का रे भुललासी कथासंग्रह
काही खरं काही खोटं कथासंग्रह
गुलमोहर कथासंग्रह
गोष्ट हातातली होती! कथासंग्रह
घर हलवलेली माणसे कथासंग्रह
चिअर्स व्यक्तिचित्र
झोपाळा कथासंग्रह
ठिकरी कादंबरी
तप्तपदी कथासंग्रह
तू भ्रमत आहासी वाया कादंबरी
दुनिया तुला विसरेल ललित
दोस्त कथासंग्रह
निमित्त ललित
पाणपोई ललित
पार्टनर कादंबरी
प्रेममयी ललित(?)
प्लेझर बाँक्स भाग १ आणि २ पत्रसंग्रह
फॅन्टसी - एक प्रेयसी ललित
बाई, बायको आणि कॅलेंड‍र कथासंग्रह
भुलभुलैय्या कथासंग्रह
महोत्सव कथासंग्रह
माझं माझ्यापाशी? ललित
माणसं व्यक्तिचित्र
मायाबाजार जानेवारी १९७७ कथासंग्रह
मी माणूस शोधतोय कथासंग्रह
मोडेन पण वाकणार नाही कथासंग्रह
रंगपंचमी ललित
रंग मनाचे कथासंग्रह
लोंबकळणारी माणसं कथासंग्रह
वन फॉर द रोड कथासंग्रह
वलय कथासंग्रह
वपु ८५ कथासंग्रह
वपुर्झा २५ मार्च १९८२ ललित
वपुर्वाई कथासंग्रह
सखी कथासंग्रह
संवादिनी कथासंग्रह
स्वर कथासंग्रह
सांगे वडिलांची कीर्ती व्यक्तिचित्र
ही वाट एकटीची कादंबरी
हुंकार कथासंग्रह
तप्तपदी कथासंग्रह

पुरस्कार व सन्मान

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.

व. पु. काळे यांचे विचार

  1. मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
  2. संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
  3. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
  4. जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!
  5. खर्च झाल्याच दुःख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
  6. प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
  7. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
  8. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
  9. घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
  10. माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
  11. बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण..!!
  12. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे.
  13. पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वतःला मासा बनावे लागते.
  14. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्त्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
  15. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
  16. आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
  17. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
  18. संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
  19. अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
  20. वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
  21. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
  22. सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  23. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
  24. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते.
  25. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
  26. गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
  27. अत्यंत महागडी, न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
  28. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!
  29. आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

पारिभाषिक शब्द

http://vapurzaa.blogspot.in/

बाह्य दुवे

व.पु. काळे 
विकिक्वोट
व.पु. काळे हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.
  • "वसंत पुरुषोत्तम काळे- ब्लॉग".
  • वसंत पुरुषोत्तम काळे facebook page (मराठी मजकूर)

Tags:

व.पु. काळे जीवनव.पु. काळे प्रकाशित साहित्यव.पु. काळे पुरस्कार व सन्मानव.पु. काळे व. पु. काळे यांचे विचारव.पु. काळे पारिभाषिक शब्दव.पु. काळे बाह्य दुवेव.पु. काळेपार्टनरमराठी भाषालेखकवपुर्झाही वाट एकटीची

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भूकंपाच्या लहरीवसुंधरा दिनराजकारणसायाळशनिवार वाडामराठा घराणी व राज्येक्रिकेटचे नियमबाजी प्रभू देशपांडेसात बाराचा उतारायूट्यूबपर्यावरणशास्त्रसदा सर्वदा योग तुझा घडावास्त्री सक्षमीकरणग्रंथालयसातारा लोकसभा मतदारसंघपसायदानजागरण गोंधळहनुमान चालीसाभोपळाऔद्योगिक क्रांतीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपीपल्स एज्युकेशन सोसायटीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकुपोषणबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्राचे राज्यपालजय श्री रामबालविवाहअमरावती जिल्हास्वामी समर्थसंस्कृतीपृथ्वीचे वातावरणभारतीय निवडणूक आयोगभाषालंकारघोणसजिल्हाधिकारीविजयसिंह मोहिते-पाटीलसुषमा अंधारेकेळजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)ययाति (कादंबरी)टोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसमासज्योतिर्लिंगहृदयमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनकुटुंबनियोजनसोलापूर लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गरेणुकासंगीत नाटकविश्व स्वास्थ्य संस्थाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीप्रीमियर लीगकुंभ रासशिखर शिंगणापूरनामअकोला लोकसभा मतदारसंघहापूस आंबाअक्षय्य तृतीयाकिशोरवयस्वरनैसर्गिक पर्यावरणसंभाजी भोसलेलिंगभावनांदेड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीराजदत्तउच्च रक्तदाबसंगीतातील घराणीनवनीत राणाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हआदिवासीजागतिक महिला दिन🡆 More