सृष्टी देशमुख

सृष्टी जयंत देशमुख ( २८ मार्च १९९६) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

२०१८ मध्ये संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या चर्चेत आल्या. या परीक्षेत त्यांनी भारतात ५ वा क्रमांक पटकावला होता. तसेच मुलींमध्ये त्यांचा देशात प्रथम क्रमांक आला होता.

जीवन

सृष्टी देशमुख यांचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आहे. त्या मूळच्या मराठी आहेत. त्यांच्या आई सुनीता देशमुख या शिक्षिका तर वडील जयंत देशमुख हे अभियंते आहेत. त्यांना एक लहान भाऊ आहे.

देशमुख यांनी भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ९३.४ टक्के मिळवून त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. नंतर त्यांनी भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून रासायनिक अभियांत्रिकी (२०१४ ते २०१८) मध्ये बी.टेक.ची पदवी घेतली.

कारकीर्द

रासायनिक अभियांत्रिकीमधील पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भोपाळमध्येच त्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी देशात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गुणवत्ता यादीत त्या ५ व्या क्रमांकावर होत्या.

त्या २०१९ बॅचच्या आय.ए.एस अधिकारीआहेत. त्यांची पहिली नियुक्ती मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती. सध्या देशमुख यांची मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा येथील उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

केंद्रीय लोकसेवा आयोगनागरी सेवा परीक्षाभारतीय प्रशासकीय सेवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यूट्यूबअभिव्यक्तीजन गण मनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीजिजाबाई शहाजी भोसलेनाचणीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीअशोक चव्हाणगजराइंडियन प्रीमियर लीगसंगीतातील रागअहवाल लेखनउच्च रक्तदाबजळगाव लोकसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमहाराष्ट्रातील घाट रस्तेगणपतीसुशीलकुमार शिंदेसदा सर्वदा योग तुझा घडावामराठी नावेनवरी मिळे हिटलरलागूगलशिखर शिंगणापूरसमुपदेशनमाती प्रदूषणशरद पवारमकबूल फिदा हुसेनअकोला जिल्हामहाड सत्याग्रहमीठकैलास मंदिरमोबाईल फोनजगदीश खेबुडकरनेतृत्वमुळाक्षरसोलापूर लोकसभा मतदारसंघविधान परिषदभारतातील सण व उत्सवक्रिकेटचा इतिहासधनादेशमहाराष्ट्र विधानसभाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीखडकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतीय लष्करमहेंद्र सिंह धोनीविनयभंगजिल्हा परिषदसंयुक्त महाराष्ट्र चळवळनदीकुपोषणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतीय स्वातंत्र्य दिवसत्रिरत्न वंदनारत्‍नागिरी जिल्हाकल्की अवतारनाथ संप्रदायज्वारीबखरभारताची अर्थव्यवस्थामराठा आरक्षणसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाहितीजास्वंदभारतातील मूलभूत हक्कबोधिसत्वगालफुगीबँकओशोबावीस प्रतिज्ञाजी.ए. कुलकर्णीवर्णमालाऊसपौर्णिमाबुद्धिमत्ताअर्जुन वृक्षनिबंध🡆 More