केप टाउन: दक्षिण आफ्रिकेतील शहर

केपटाऊन (आफ्रिकान्स व डच: Kaapstad कापस्टाड; खोसा: iKapa इ’कापा) हे दक्षिण आफ्रिका देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे.

केपटाऊन
Cape Town
Kaapstad
दक्षिण आफ्रिकामधील शहर

केप टाउन: इतिहास, भूगोल, वस्तीविभागणी

केप टाउन: इतिहास, भूगोल, वस्तीविभागणी
चिन्ह
केपटाऊन is located in दक्षिण आफ्रिका
केपटाऊन
केपटाऊन
केपटाऊनचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 33°55′31″S 18°27′26″E / 33.92528°S 18.45722°E / -33.92528; 18.45722

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
राज्य वेस्टर्न केप
स्थापना वर्ष इ.स. १६५२
क्षेत्रफळ २,४५५ चौ. किमी (९४८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३४,९७,०९७
  - घनता १,४२५ /चौ. किमी (३,६९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + २:००
https://www.capetown.gov.za/

केप टाऊन देशाची वैधानिक राजधानी आहे. वेस्टर्न केप राज्यातील हे शहर राज्याच्या ६४% लोकांचे वसतिस्थान आहे. ६ एप्रिल, १६५२ रोजी येथे यान व्हान रीबेक या पहिल्या युरोपीय रहिवाशाने कायम वस्ती केली होती. डच ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या भारत, पूर्व आफ्रिका आणि आशियाकडे जाणाऱ्या नौकांसाठीचे रसदकेंद्र येथे उभारले.

हे शहर टेबल बे या अाखाताच्या किनारी वसलेले आहे. येथील बंदर आणि अआत तसेच टेबल माउंटन आणि केप ऑफ गुड होप ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीची आहेत.

इतिहास

सध्याच्या केप टाऊनच्या आसपासचे सगळ्यात जुने मानवावशेष १५-१२,००० वर्षांपूर्वीचे आहेत. फिशहोक परिसरातील पियर्स केव्ह येथे सापडलेल्या या अवशेषांबद्दल लिखित माहिती सापडत नाही. पोर्तुगीज खलाशी बार्तोलोम्यू दियासने १४८६मध्ये या प्रदेशाबद्दल नोंद केलेली आढळते. दियास केप टाऊन प्रदेशात पोचणारा पहिला युरोपीय होता. त्याने या भागास काबो सान तोर्मेंतास (वादळांचे भूशिर) असे नाव दिले. नंतर पोर्तुगालचा राजा होआव दुसऱ्याने याचे काबो दा बोआ एस्पेरान्सा (केप ऑफ गुड होप किंवा चांगल्या आशेचे भूशिर) असे नामकरण केले. यात युरोपातून भारत आणि आशियाकडे जाणारी समुद्री वाट मिळण्याच्या आशेचा उल्लेख होता. वास्को द गामाने १४९७ साली केप ऑफ गुड होपला वळसा घातल्याचा उल्लेख केला आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्लिश जहाजे आपल्या सफरींदरम्यान येथे थांबत असत. येथील खोइखोइ जमातींना ते ताज्या मांसाच्या बदल्यात तंबाखू, लोखंड आणि तांबे देत असत.

१६५२मध्ये व्हेरेनिग्ड ऊस्ट-इंडिश कंपनीने (व्हीओसी, डच ईस्ट इंडिया कंपनी) यान व्हान रीबेक आणि इतर लोकांना या प्रदेशात वसाहत करण्यास पाठविले. तेथे जाऊन कंपनीच्या जहाजांसाठीचे ठाणे उभारण्याचे काम त्यांना दिले गेले होते. त्यांनी येथे फोर्ट द गुड होप ही गढी उभारली. त्यानंतर काम करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने येथील विकास हळू होता. या ठाण्याचा विकास करण्यासाठी व्हीओसीने इंडोनेशिया आणि मादागास्कर येथून गुलाम पकडून आणले. हे गुलाम केप टाऊनमधील कृष्णवर्णी समाजाचे आदिपुरुष/स्त्रिया होत. रीबेक आणि त्याच्यानंतरच्या गव्हर्नरांनी युरोपातील अनेक प्रकारची उपयोगी झाडेझुडुपे आणून येथे लावली. याने येथील स्थानिक पर्यावरण कायमचेच बदलले. द्राक्षे, सफरचंद, शेंगदाणे, नारंगीसह अनेक प्रकारच्या झाडांनी येथील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केला.

केप टाउन: इतिहास, भूगोल, वस्तीविभागणी 
यान व्हान रीबेकचे टेबल बे येथे आगमन - चार्ल्स डेव्हिडसन बेलने काढलेले चित्र

अठराव्या शतकाअखेर नेदरलँड्समधील शासन कोलमडून पडले व नेदरलँड्स फ्रांसचे मांडलिक राज्य बनले. ही संधी साधून इंग्लंडने नेदरलँड्सच्या वसाहतींवर घाला घातला. १७९५मध्ये इंग्लंडने केप टाऊन जिंकले. १८०३ च्या तहानुसार त्यांनी ते नेदरलँड्सला परत केले परंतु १८०६मध्ये ब्लाउवबर्गच्या लढाईनंतर पुन्हा एकदा या प्रदेशाचा ताबा घेतला. १८१४ च्या तहानुसार केप टाऊन कायमचे इंग्लंडच्या आधिपत्यात आले. या शहरास नव्याने रचलेल्या केप वसाहतीची राजधानी करण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस या वसाहतीचा पूर्वेस मोठ्या प्रमाणात विस्तार झाला व स्थानिक (युरोपातून स्थलांतरित) लोकांनी इंग्लंडपासून स्वांतंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली. १८५४ साली केप वसाहतीची स्वतःची संसद स्थापन झाली आणि १८७२मध्ये केप वसाहतीसाठी स्वतंत्र पंतप्रधानपदाची रचना झाली. सांसदांच्या निवडणुकीसाठी केप क्वालिफाइड फ्रॅंचाइझ या नियमानुसार वर्णांध परंतु फक्त पुरुषांना मताधिकार देण्यात आला होता.

१८६७मध्ये ग्रिकालॅंड वेस्टमध्ये हिरे सापडले तसेच १८८६मध्ये विटवॉटर्सरॅंडमध्ये मोठ्या प्रमाणात सोने सापडले. याने दक्षिण आफ्रिकेला युरोप व जगातील इतर प्रदेशांतून स्थलांतर करणाऱ्या लोकांचा ओघ लागला. दक्षिण आफ्रिकेच्या आतल्या भागात राहणाऱ्या या लोकांनी ब्रिटिश आधिपत्य धुडकावून लावले. याचे पर्यवसान दुसऱ्या बोअर युद्धात (१८९९-१९०२) झाले. युद्ध जिंकल्यावर ब्रिटिशांनी १९१०मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाची स्थापना केली. यात केप वसाहत, नाताळ वसाहत आणि दोन बोअर वसाहतींचा समावेश होता. केप टाऊन या संघाची आणि कालांतराने दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकाची राजधानी झाले.

१९४८ च्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये नॅशनल पार्टीने वर्णभेदाचा पुरस्कार करीत बहुमत मिळविले. स्वार्ट गेव्हार (काळा धोका) या घोषणेसह या पक्षाने अपार्थाइडची (वर्णानुसार विभक्तीकरण) योजना केली. याने केप टाऊनमधील अनेकवर्णीय वसाहतींची वाताहत झाली. ग्रुप एरियाझ ॲक्ट या कायद्यातहत दक्षिण आफ्रिकेतली सरकारने केप टाऊनमधील सगळे भाग विशिष्ट वर्ण आणि वंशांच्या लोकांसाठी राखून ठेवल्याचे जाहीर केले व लाखो लोकांची उचलबांगडी केली. अश्वेतवर्णीय लोकांना शहरातील उच्चभ्रू भागांतून हाकलून दिले गेले व त्यांचे केप फ्लॅट्स आणि लॅव्हेंडर हिल येथे जबरदस्तीने पुनर्वसन केले गेले. यानंतरही केप टाऊनमध्ये मूळ आफ्रिकन लोकांना प्रवेश करण्यासही मनाई होती.

वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्या नेत्यांपैकी अनेकांना केप टाऊनजवळच्या रॉबेन द्वीपावरील तुरुंगात वर्षानुवर्षे डांबून ठेवलेले होते. यांपैकी सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या नेल्सन मंडेलानी वर्णभेद संपुष्टात येत असताना सुटका झाल्यावर केप टाऊनच्या नगरगृहाच्या छज्ज्यावरून आपले पहिले सार्वजनिक भाषण दिले होते.

गेल्या दोन दशकांत केप टाऊनमध्ये मादक पदार्थ, तत्सबंधी गुन्हे आणि टोळीयुद्ध सोकावले आहेत. तरीही पर्यटन आणि स्थावर मिळकतींच्या धंद्यांना बरकत आल्याने येथील अर्थव्यवस्था तगडी झाली आहे.

भूगोल

केप टाउन आफ्रिकेच्या नैऋत्य टोकाजवळ आहे. अटलांटिक महासागरावर वसलेले हे शहर आफ्रिकेचे दक्षिणेचे टोक नसले तरी शहरापासून जवळ असलेल्या केप ऑफ गुड होप या भूशिरापासून पूर्वेकडे जाणारे जलमार्ग सुरू होतात. केप टाउनचा अक्षांश साधारण सिडनी आणि बॉयनोस एर्सइतका आहे.

शहराच्या दक्षिणेस टेबल माउंटन हा १,००० मी पेक्षा जास्त उंचीचा सरळसोट कडे असलेला डोंगर आहे. याचा माथा म्हणजे विस्तृत पठार आहे. याच्या दोन बाजूस डेव्हिल्स पीक आणि लायन्स हेड हे दोन छोटे डोंगर आहेत. शहराच्या पश्चिमेस सिग्नल हिल नावाची टेकडी असून या डोंगरांच्या मधील खोलगट भागात केप टाउन वसलेले आहे.

हवामान

केप टाउनचे हवामान कोप्पेन वर्गवारीनुसार उष्ण-भूमध्य समुद्रीय आहे. येथील हिवाळे जून ते ऑगस्ट दरम्यान असून फार थंड नसतात. त्या काळात येथील तपमान ८.५ ते १८ अंश सेल्शियस मध्ये असते. येथील बव्हंश पाउस हिवाळ्यात पडतो. येथील उन्हाळे समशीतोष्ण असतात. तेव्हाचे तपमान २६ ते १६ अंश सेल्शियस असते.

अटलांटिक आणि हिंदी महासागरांवरून वाहत येणाऱ्या वाफाळलेल्या वाऱ्यामुळे केपटाउनजवळच्या टेबल माउंटनवर वर्षभर धुके व ढगांची पातळ अशी दुलई तयार होते. याला टेबलक्लॉथ म्हणतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस आग्नेयेकडून केप डॉक्टर नावाने ओळखले जाणारे वारे वाहते. यामुळे शहरावरील प्रदूषणाचे सावट निघून अटलांटिक समुद्राकडे जाते. उन्हाळ्याच्या मध्यात काही आठवड्यांकरता टेबल माउंटनच्या पलीकडून बर्ग वारे वाहतात. अतिशय गरम असलेल्या या वाऱ्यांमुळे केप टाउनमधील हवा अतिउष्ण होते.

येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५१५ मिमी आहे. केप टाउन शहरात वर्षातून ३,१०० तास सूर्यप्रकाश असतो.

शहराजवळील समुद्रातील पाण्याच्या तपमानात ठिकाणानुसार मोठा फरक असतो. अटलांटिक समुद्रातील पाणी १० अंश सेल्शियस इतके गार तर पलीकडील हिंदी महासागराचा भाग असलेल्या फॉल्स बे या आखातातील पाण्याचे तपमान २२ अंश सेल्शियस इतके असते. हे तपमान कॅलिफोर्नियातील सान फ्रांसिस्को किंवा बिग सुर येथील (अटलांटिक) आणि नीस किंवा मॉंटे कार्लो येथील (फॉल्स बे) सारखे असते.

साधारणपणे २०१५पासून केप टाउन व आसपासच्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडलेला आहे. शंभर वर्षांतील महाकठीण अशा या दुष्काळामुळे केप टाउनमध्ये पाण्याची कमतरता आहे. ५ मार्च, २०१८ रोजी महानगरपालिकेने जाहीर केले होते की १५ जुलै रोजी शहरातील पाणीपुरवठा संपेल. त्यानंतर झालेल्या पावसामुळे हा डे झीरो आता २०१९ च्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

Cape Town (1961–1990) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 39.3
(102.7)
38.3
(100.9)
43.0
(109.4)
38.6
(101.5)
33.5
(92.3)
29.8
(85.6)
29.0
(84.2)
32.0
(89.6)
33.1
(91.6)
37.2
(99)
39.9
(103.8)
41.4
(106.5)
43.0
(109.4)
सरासरी कमाल °से (°फॅ) 26.1
(79)
26.5
(79.7)
25.4
(77.7)
23.0
(73.4)
20.3
(68.5)
18.1
(64.6)
17.5
(63.5)
17.8
(64)
19.2
(66.6)
21.3
(70.3)
23.5
(74.3)
24.9
(76.8)
22.0
(71.6)
दैनंदिन °से (°फॅ) 20.4
(68.7)
20.4
(68.7)
19.2
(66.6)
16.9
(62.4)
14.4
(57.9)
12.5
(54.5)
11.9
(53.4)
12.4
(54.3)
13.7
(56.7)
15.6
(60.1)
17.9
(64.2)
19.5
(67.1)
16.2
(61.2)
सरासरी किमान °से (°फॅ) 15.7
(60.3)
15.6
(60.1)
14.2
(57.6)
11.9
(53.4)
9.4
(48.9)
7.8
(46)
7.0
(44.6)
7.5
(45.5)
8.7
(47.7)
10.6
(51.1)
13.2
(55.8)
14.9
(58.8)
11.4
(52.5)
विक्रमी किमान °से (°फॅ) 7.4
(45.3)
6.4
(43.5)
4.6
(40.3)
2.4
(36.3)
0.9
(33.6)
−1.2
(29.8)
−4.3
(24.3)
−0.4
(31.3)
0.2
(32.4)
1.0
(33.8)
3.9
(39)
6.2
(43.2)
−4.3
(24.3)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 15
(0.59)
17
(0.67)
20
(0.79)
41
(1.61)
69
(2.72)
93
(3.66)
82
(3.23)
77
(3.03)
40
(1.57)
30
(1.18)
14
(0.55)
17
(0.67)
515
(20.28)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.1 mm) 5.5 4.6 4.8 8.3 11.4 13.3 11.8 13.7 10.4 8.7 4.9 6.3 103.7
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 71 72 74 78 81 81 81 80 77 74 71 71 76
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 337.9 297.4 292.9 233.5 205.3 175.4 193.1 212.1 224.7 277.7 309.8 334.2 ३,०९४
स्रोत: जागतिक हवामान संस्था, एन.ओ.ए.ए., South African weather service, eNCA

वस्तीविभागणी

२०११ च्या जनगणनेनुसार केप टाउन महानगराची लोकसंख्या ३७,४०,०२६ होती. येथील लिंग-गुणोत्तर ९६ आहे म्हणजे एकूण पुरुषांपेक्षा स्त्रीयांची संख्या अधिक आहे. एकूण लोकसंख्येतील ४२.४% लोक स्वतःला अश्वेतवर्णीय, १५.७% गोरे, ३८.६% कृष्णवर्णीय आफ्रिकन तर १.४% लोक भारतीय-आशियाई म्हणवून घेतात. १९४४मध्ये ही आकडेवारी अनुक्रमे ४६%, ४७%, ६% आणि १% होती.

नगरप्रशासन

सिटी ऑफ केप टाउन नावाने ओळखली जाणारी नगरपालिका शहराचे प्रशासन सांभाळते. येथील सभामंडळात २२१ सदस्य असतात. यांपैकी १११ वॉर्डांतून थेट निवडलेले प्रत्येकी एक सदस्य आणि ११० सदस्य पक्षनिहाय मतविभागणी सदस्य असतात. ही नगरसभा महापौर आणि उपमहापौर निवडतात.

वाहतूक

विमानवाहतूक

केप टाऊन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील एकमेव प्रवासी विमानतळ आहे. हा विमानतळ दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

केप टाउन इतिहासकेप टाउन भूगोलकेप टाउन वस्तीविभागणीकेप टाउन नगरप्रशासनकेप टाउन वाहतूककेप टाउन संदर्भ आणि नोंदीकेप टाउनआफ्रिकान्स भाषादक्षिण आफ्रिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवेरूळ लेणीविमाहिंगोली विधानसभा मतदारसंघक्रिकेटवर्णनात्मक भाषाशास्त्रपृथ्वीमहाभारतलखनौ करारज्वारीतुतारीअण्णा भाऊ साठेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसोळा संस्कारसामाजिक कार्यमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीवर्तुळसुतकपर्यावरणशास्त्रकाळभैरववातावरणमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनइतिहासाच्या अभ्यासाची साधनेॲडॉल्फ हिटलरसाम्राज्यवादभारतातील शासकीय योजनांची यादीविष्णुसहस्रनामलाल किल्लामृत्युंजय (कादंबरी)समासठाणे लोकसभा मतदारसंघप्रेमानंद गज्वीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभूकंपाच्या लहरीआचारसंहिताभारताचे संविधानकेरळआंबेडकर कुटुंबवडस्त्री सक्षमीकरणमांगहनुमानदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनासंगणक विज्ञानसाडेतीन शुभ मुहूर्तकबड्डीपोलीस पाटीलसंत जनाबाईमटकाउत्तर दिशायशवंतराव चव्हाणपंकजा मुंडेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभोवळतणावशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसंगीत नाटकबीड विधानसभा मतदारसंघबसवेश्वरपोक्सो कायदानाथ संप्रदायशिवछत्रपती पुरस्कारभरतनाट्यम्आणीबाणी (भारत)होनाजी बाळाजैन धर्मकेदारनाथ मंदिरक्रियापदजागतिक व्यापार संघटनापृथ्वीचा इतिहासरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघभारतीय रेल्वेहरितक्रांतीराज ठाकरेविंचूगोदावरी नदीताम्हणसिंधुदुर्ग जिल्हा🡆 More