सुश्रुत

सुश्रुत हे प्राचीन काळातील भारतीय शल्यविशारद होते.

सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.छेदन, भेदन, लेखन, आहरण , व्याधन, इसण, स्रवण, शिवण या त्या आठ क्रिया होत.

सुश्रुत
सुश्रुतांचा हरिद्वारमधील पुतळा

गंगा नदीच्या काठी जिथे आजचे वाराणसी शहर वसले आहे त्याच परिसरात सुश्रुतांनी आपल्या विद्येचा अभ्यास तसेच प्रसार केला. शल्यक्रियेमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे सुश्रुत शल्यक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जातात.

विविध प्रकारचे गोळे(ट्यूमर), शरीरांतर्गत झालेली किंवा बाहेरून झालेले इजा, अस्थिभंग व गर्भारपण/ बाळंतपणातील त्रास व त्याचेसाठीची शल्यक्रिया, आतड्याची शल्यक्रिया आदी शस्त्रक्रिया सुश्रुतांनी विकसित केल्या. त्यांना कॉस्मेटिक सर्जरीचे जनक समजल्या जाते.

जेंव्हा औषोधोपचाराने रोगी ठिक होत नाही तेंव्हा काही रोगात शल्यक्रिया आवश्यक असते असे त्यांचे म्हणणे होते. अर्बुद, गंडमाला, मूळव्याध, मुत्राश्मरी, गुदभ्रंश, स्तनरोग आदी व्याधींमध्ये कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांचे वर्णन त्यांनी त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात केले आहे. शस्त्रक्रियेआधी काय तयारी करावयास हवी, इतर प्रक्रिया, शरीरातील मर्मे सुंगणी शल्यक्रियेनंतर करावयाचे उपचार याचीपण माहिती या ग्रंथात आहे. ते शस्त्रक्रियेनंतर जखम शिवण्यास रेशिम, गुळवेल किंवा अस्मांतक वृक्षाचा धागा वापरत. त्यांनी हजारो वर्षाआधी शल्यक्रियेचा पाया घातला.


(आयुर्वेद)

संदर्भ

Tags:

छेदन (आयुर्वेद)भेदन (आयुर्वेद)सुश्रुत संहिता

🔥 Trending searches on Wiki मराठी:

देवेंद्र फडणवीसहत्तीउंबरलोकशाहीईमेलबाळाजी बाजीराव पेशवेतांदूळपी.टी. उषाशब्द सिद्धीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीलाल किल्लाबीबी का मकबरारतिचित्रणभारत सरकार कायदा १९३५महाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पचमारघनकचरामहाराष्ट्र शासनकेदारनाथ मंदिरकमळलोकसभेचा अध्यक्षटरबूजमुख्यमंत्रीमहाराष्ट्राचा इतिहासससाबीड जिल्हाभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्रातील धरणांची यादीयेसूबाई भोसलेगणेश चतुर्थीबुध ग्रहमाहितीसंख्याभगवद्‌गीताकबीरविटी-दांडूगोलमेज परिषदसंताजी घोरपडेदादाजी भुसेबाजरीमहादेव कोळीभारतीय आडनावेशरद पवारमिठाचा सत्याग्रहविराट कोहलीधान्यगावजागतिक तापमानवाढकबूतरशाहीर साबळेपवन ऊर्जाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळबायोगॅसमोटारवाहनआणीबाणी (भारत)जागतिक बँकज्योतिर्लिंगकेशव सीताराम ठाकरेविवाहसिंधुदुर्ग जिल्हासंगणक विज्ञानसम्राट हर्षवर्धनजागतिक महिला दिनशिवसेनाइंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूचीवचन (व्याकरण)सृष्टी देशमुखविरामचिन्हेखेळपन्हाळासोळा सोमवार व्रतस्त्री सक्षमीकरणविष्णुफुफ्फुसजागतिकीकरण🡆 More