विश्रामबाग वाडा

विश्रामबाग वाडा हा मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा जुन्या पुण्यातील राहता वाडा होता.

इ.स. १८०७ साली सुमारे ३.५ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला गेला. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसऱ्या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसऱ्या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेऱ्या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.

विश्रामबाग वाडा
पुण्यातील विश्रामबाग वाडा

नगरपालिकेचे कार्यालय

दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी बांधलेल्या विश्रामबागवाड्याची १८०८ मध्ये वास्तुशांत झाल्याच्या नोंदी मिळतात. शहराच्या मध्य भागातील हा ऐसपैस वाडा आणि त्याच्या दर्शनी भागाचे सुरुवातीपासून सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ब्रिटिशांच्या कालखंडात त्यांनी हा वाडा तब्बल एक लाख रुपयांना पुणे नगरपालिकेला विकल्याची नोंद आढळून येते. पुणे महापालिकेची सध्याची इमारत बांधून होण्यापूर्वी नगरपालिकेचे मुख्य कार्यालय विश्रामबागवाड्यामध्येच होते.

सांस्कृतिक केंद्र

पुणे महापालिकेतर्फे विश्रामबागवाड्यात एक 'कल्चरल सेंटर' उभारण्यात आले आहे. नेपथ्याचा वापर करून संगीत-नाट्य-कला प्रांतातील कलावंतांना आता पुणेकरांसमोर कलाविष्कार सादर करण्यासाठी हा एक रंगमंच उपलब्ध आहे. दगडाचे बांधीव स्टेज उभारण्यात आले असून शेजारी एक 'ग्रीन रूम' आहे. या स्टेजवरून तासा-दीड तासाचे लहान कार्यक्रम होऊ शकतात.,

बाह्य दुवे

विश्रामबाग वाड्याचा न माहीत असलेला इतिहास

Tags:

तिसरे इंग्रज-मराठा युद्धदुसरे बाजीराव पेशवेपुणेपेशवामराठा साम्राज्यवाडाशनिवार वाडा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रोहित (पक्षी)श्यामची आईनाटोमृत्युंजय (कादंबरी)यशवंतराव चव्हाणसमासभगवद्‌गीताजागतिक दिवसशेकरूभारत सरकार कायदा १९३५मूळव्याधहिंदू लग्नबिबट्याआदिवासीराम गणेश गडकरीचमारघनकचरागांडूळ खतमलेरियासोलापूर जिल्हामहाराष्ट्रातील खासदारांची यादीअंबाजोगाईव्हायोलिनभाऊराव पाटीलसंस्‍कृत भाषालोकमान्य टिळकफुटबॉलभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीईशान्य दिशाभारतातील शेती पद्धतीअहिल्याबाई होळकरजलचक्रमदर तेरेसागजानन महाराजदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनापालघरकालिदासमहात्मा फुलेअमेरिकेची संयुक्त संस्थानेवायुप्रदूषणज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षशहाजीराजे भोसलेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसावता माळीकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाकडधान्यमेंढीनाटकमहाराष्ट्र विधान परिषदजवाहरलाल नेहरूभारताचे उपराष्ट्रपतीसायबर गुन्हामहाराष्ट्रातील पर्यटनमहाराष्ट्रातील आदिवासी समाजअर्थशास्त्रमेरी क्युरीजन गण मनजैवविविधतातोरणाघारापुरी लेणीछगन भुजबळकोकणकावीळपिंपळदत्तात्रेयवासुदेव बळवंत फडकेफुलपाखरूविहीरमांगपर्यावरणशास्त्रऔद्योगिक क्रांतीकोकण रेल्वेऑलिंपिकदादासाहेब फाळके पुरस्कारभारतीय नौदलपंढरपूर🡆 More