मदर तेरेसा: एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन

मदर तेरेसा जन्माचे नाव Anjezë Gonxhe Bojaxhiu जन्म (२६ ऑगस्ट, इ.स.

१९१० अल्बानिया) या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार होते.

मदर तेरेसा: संतपद बहाल, आलोचना, सन्मान
मदर तेरेसा

त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.

इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.

मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.

संतपद बहाल

मदर तेरेसा ह्यांनी संतपदाची कसोटी असलेली दुस‍ऱ्या चमत्काराची अट पूर्ण केल्यामुळे त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५ मध्ये झाला. संत की उपाधी ९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटी मध्ये पोप फ्रांसिस ने मदर तेरेसा यांना संतची उपाधि ने विभूषित केले.

आलोचना

मदर तेरेसा ह्यांचा मृत्यू १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला. 'ह बसेरा', नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन ह्या दाव्यातील वास्तव समजून घेतले, तर अनेक गोष्टी लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता. चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते की प्रत्यक्षात मोनिका बसेरा ह्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता आणि त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर ह्यांच्या नेतृत्वाखाली 'महा. अंनिस'ने ह्या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता आणि वास्तव समाजापुढे ठेवले होते. त्यानंतरही त्याच पद्धतीने २००८मध्ये केवळ मदर तेरेसा ह्यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी ब‍ऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याला नक्की कोणता आजार होता, प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते, यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही. त्यांना १७ डिसेंबर २०१५ पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले. १५ भारतीय अधिकरी व हजारएक अन्य लोक ४ सप्टेंबर २०१६ रोजी सेंट पीटर स्वेअरमध्ये संतपणाच्या मिसबलिदानात सामील होते.

सन्मान

  • २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर तेरेसा पाचव्या क्रमांकावर होत्या.

मदर तेरेसा यांच्यावरील पुस्तके

  • भारतरत्न मदर तेरेसा (रमेश तिरूखे)
  • मदर तेरेसा : प्रतिमेच्या पलीकडे - १९१०-१९९७ (ॲन सेबा)
  • मदर तेरेसा (आशा कर्दळे)
  • (दीन दुःखितांची विश्वमाता) मदर तेरेसा (शंकर कऱ्हाडे)
  • (माणुसकीचा नंदादीप) मदर तेरेसा (शांताराम विसपुते)
  • (विश्वमाता) मदर तेरेसा (सु.बा. भोसले)

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

मदर तेरेसा संतपद बहालमदर तेरेसा आलोचनामदर तेरेसा सन्मानमदर तेरेसा यांच्यावरील पुस्तकेमदर तेरेसा संदर्भमदर तेरेसा हे सुद्धा पहामदर तेरेसा बाह्य दुवेमदर तेरेसानोबेल शांतता पुरस्कारभारत रत्न

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्र केसरीपाटीलपृथ्वीचे वातावरणकल्याण लोकसभा मतदारसंघपरभणी जिल्हाघनकचराएकनाथ शिंदेसुप्रिया सुळेचाफेकर बंधूकलाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हपुणेखंडोबामुरूड-जंजिराशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकलातूर लोकसभा मतदारसंघहंसजनमत चाचणीसूर्यकैकाडीगुढीपाडवाशिवनेरीअर्जुन वृक्षकुणबीहनुमानभूगोलवल्लभभाई पटेलबहिणाबाई चौधरीबाळ ठाकरेहस्तमैथुनशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसात बाराचा उतारासांगली जिल्हाभाषाकादंबरीमहादेव जानकरविष्णुसहस्रनामगणपत गायकवाडमानवी शरीरलोकसभा सदस्यउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबच्चू कडूलॉरेन्स बिश्नोईपोक्सो कायदाफकिरापंढरपूरहोमी भाभाभारतीय संविधानाचे कलम ३७०शनिवार वाडापृथ्वीच्या अंतरंगाची रचनाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पसातव्या मुलीची सातवी मुलगीइंदुरीकर महाराजस्वस्तिकसंवादगांडूळ खतसूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)सात आसरागोंधळतबलाखरबूजरामटेक विधानसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेसुधीर मुनगंटीवारअहवाल लेखनश्रीमटकाम्हणीपिंपळमहाड सत्याग्रहभरड धान्यलहुजी राघोजी साळवेफुटबॉलअल्बर्ट आइन्स्टाइनसांगली लोकसभा मतदारसंघपुणे जिल्हामुलाखतशिवसेना🡆 More