दीक्षाभूमी

दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला 'धम्मचक्र स्तूप' असेही म्हटले जाते.

दीक्षाभूमी
दीक्षाभूमी
सर्वसाधारण माहिती
प्रकार धार्मिक व ऐतिहासिक स्मारक
ठिकाण नागपूर, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात जुलै १९७८
पूर्ण १८ डिसेंबर २००१
ऊंची
वास्तुशास्त्रीय १२० फूट उंचीचा स्तूप
बांधकाम
वास्तुविशारद शे डान मल, शशी शर्मा

दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी यांच्या संखेत लक्षणिय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’चे अध्यक्ष व भारतीय बौद्ध भिक्खू सुरई ससाई यांनी म्हटले आहे की, “दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे. तिचे पावित्र्य जगात आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील.” भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला 'मानवतेचे प्रेरणास्थान' म्हटले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. येथे येऊन मी धन्य झालो आहे’, अशा शब्दांत भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.

इतिहास

दीक्षाभूमी 
हिंदू धर्माच्या त्याग करतांना दीक्षाभूमी, नागपूर येथे २२ प्रतिज्ञा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १४ ऑक्टो. १९५६

सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणना गेला. विसाव्या शतकात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सपत्निक बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या ५,००,०००० अनुयायांना दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी सोहळ्याला उशिरा आलेल्या उर्वरित ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानाला महत्त्व प्राप्त झाले, एक प्रमुख बौद्ध क्षेत्र म्हणूनही या स्थानानाची ओळख बनली. दरवर्षी येथे बरेच बौद्ध लोक बुद्ध, बाबासाहेब व दीक्षा अभिवादन करण्यासाठी येऊ लागले. इथे एक भव्य स्तूप निर्माण केला गेला, बावीस प्रतिज्ञांचा स्तंभही अभारला गेला. येथे बोधिवृक्ष लावला गेला व बौद्ध भिक्खू भिक्खूणींच्या निवासासाठी बाजूला एक विहार बांधला गेला.

रचना

दीक्षाभूमी 
दीक्षाभूमीतील आतील बाजू – बुद्ध मूर्तींसमोर बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थीकलश

दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

धमचक्र प्रवर्तन दिन

दीक्षाभूमी 
धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने

दीक्षाभूमी येथे दरवर्षी १४ ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात.त्यावेळी येथे १५ ते २० लाख बौद्ध जमा होतात आणि बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील, विषेशतः महाराष्ट्रातील मुख्य राजकीय नेते सणात सहभागी होतात; जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांतील बौद्ध उपासक, भिक्खूही उपस्थित राहतात.

मान्यवरांच्या भेटी

भारतातील आणि जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना दीक्षाभूमीस भेटी देऊन बुद्ध व बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. यात दलाई लामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद राजपक्षे, श्रीलंकन क्रिकेट खेळाडू दिनेश चंदिमल, बाबा रामदेव, अजय देवगण, अमित शहा इ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यक्ती आहेत.

चित्र दालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

दीक्षाभूमी इतिहासदीक्षाभूमी रचनादीक्षाभूमी धमचक्र प्रवर्तन दिनदीक्षाभूमी मान्यवरांच्या भेटीदीक्षाभूमी चित्र दालनदीक्षाभूमी हे सुद्धा पहादीक्षाभूमी संदर्भदीक्षाभूमी बाह्य दुवेदीक्षाभूमी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीमाती प्रदूषणअंधश्रद्धायोगासनदिशाझी मराठीअहमदनगर जिल्हाअजिंक्यतारापालघरशनिवार वाडावातावरणाची रचनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९गौतमीपुत्र सातकर्णीथोरले बाजीराव पेशवेब्रह्मदेवगुढीपाडवादिवाळीकबड्डीसुषमा अंधारेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसमाज माध्यमेपेरु (फळ)ॲना ओहुरामंदार चोळकरहॉकीजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेवाणिज्यटायटॅनिकजैवविविधतानृत्यकुष्ठरोगसाखरअडुळसामेंदूतारामासाकायदाभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीसत्यशोधक समाजरवींद्रनाथ टागोररॉबिन गिव्हेन्ससुतार पक्षीतरससिंहगडछत्रपतीगांडूळ खतकुंभारकुणबीकुस्तीसोळा सोमवार व्रतबेकारीमहासागरलोकशाहीयेशू ख्रिस्तप्रतापगडव्यंजनमहेंद्रसिंह धोनीनर्मदा नदीअटलांटिक महासागरनालंदा विद्यापीठखान अब्दुल गफारखाननीरज चोप्राबलुतेदारधोंडो केशव कर्वेकर्नाटकक्योटो प्रोटोकॉलमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीआडनावभारतातील शेती पद्धतीफणसग्रामीण साहित्यलोकसभाइतर मागास वर्गगोवानिलगिरी (वनस्पती)सचिन तेंडुलकररोहित शर्मामहाराष्ट्रातील आरक्षणजास्वंद🡆 More