स्थापत्य अभियांत्रिकी

स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी अभियांत्रिकी शाखा आहे.

यात नागरी नियोजन, नागरी अभियांत्रिकी, वास्तुकला , बांधकाम तंत्रज्ञान, आणि बांधलेल्या इमारतींची संरचना व इतर संबंधित नागरी क्षेत्रे इत्यादींचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये समावेश होतो. पृथ्वी, जल, आणि त्यांच्या क्रिया यांच्या संबंधित असल्यानेच इंग्रजीत याला सिव्हिल इंजिनिअरिंग असे म्हटले जाते. आजच्या याच्या क्षेत्रात पाणीपुरवठा व मलनिःस्सारण , जल व्यवस्थापन आणि वाहतूक यांचा ही अंतर्भाव होतो. थोडक्यात स्थापत्य अभियांत्रिकी असे क्षेत्र आहे की जे आपल्या विश्वाला, राहत्या जागेला अधिक सुखकर बनवण्यास मदत करते.

स्थापत्य अभियांत्रिकी
हूवर धरण
स्थापत्य अभियांत्रिकी
बुर्ज खलिफा,जगातील सर्वात उंच ईमारत.
स्थापत्य अभियांत्रिकी
आर्किमिडीजच्या सिद्धांतावर आधारीत हातांनी चालवता येण्याजोगे साधे यंत्र. याने खोलातुन पाणी वर आणण्यास सोपे होत असे.

स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये खालील प्रमुख शाखांचा समावेश होतो :-

  • नागरी नियोजन
  • नागरी अभियांत्रिकी
  • ग्रामीण अभियांत्रिकी
  • वास्तुकला
  • बांधकाम तंत्रज्ञान
  • वाहतूक अभियांत्रिकी
  • महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी हा (१) नागरी नियोजन (Civil Planning) (२) नागरी अभियांत्रिकी (Civil Engineering) (३) वास्तुकला (Architecture) आणि (४) बांधकाम तंत्रज्ञान (Construction Technology) या समकक्ष / समतुल्य शाखेतील पदवीधारक किंवा पदविकाधारक किंवा पदव्युत्तर पदवीधारक किंवा पदव्युत्तर पदविकाधारक असेल तर तो जिल्हा परिषद मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट , ब) अराजपत्रित तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय जलसंपदा / जलसंधारण आणि लघुपाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक. (गट ,ब) अराजपत्रित पदासाठी उमेदवारी ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरू शकतात.

स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास

स्थापत्य अभियांत्रिकी हे भौतिकशास्त्रातील नियमांचे उपयोजन असून याचा इतिहास भौतिकशास्त्र आणि गणिताच्या सखोल अध्यायानाशी संबंध दाखवतो. स्थापत्य अभियांत्रिकी हा भव्य व्यवसाय असल्यामुळे या शाखेचा इतिहास संरचनात्मक अभियांत्रिकी, पदार्थविज्ञान, भूगोल, भूगर्भशास्त्र, मृदा यांत्रिकी, जल विज्ञान, पर्यावरण, उपयोजित यंत्रशास्त्र आदी शाखांशी संबंधित आहे.

पुराणकाळापासून रचना आणि बांधकामाचे बहुतेक कार्य हे शिल्पकार आणि सुतार यांच्यासारख्या कारागिरांनी केले. उत्तरोत्तर काळात चतुर बांधकाम कारागिराची गरज वाढत गेली. बांधकामासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान हे अशा कारागिरांच्या संघटनेत जतन केले जात असे, आणि नव्या पिढीला पुरवले जात असे. इमारती, रस्ते आणि इतर बांधकाम हे पुन्हा पुन्हा त्याच पद्दतींनी बांधले जात होते आणि त्यांची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढत होती.

भौतिकशास्त्रातील आणि गणितातील उदाहरणांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये वापर करून घेण्याचे पुरातन उदाहरण म्हणजे आर्किमिडीजचे ई.स.पु. तिसऱ्या शतकातले काम ज्यामध्ये आर्किमिडीजच्या सिद्धांताचा, ज्यामुळे आपण उल्हासित वृत्ती समजून घेऊ शकतो तसेच काही समस्यांच्या व्यावहारिक निवारणांचा (उदा. आर्किमिडीजचा स्क्रू-वरील चित्र बघा.) समावेश होतो. ब्रह्मगुप्त या भारतीय गणिततज्ञाने सातव्या शतकात उत्खननाच्या परिमाणाच्या आकडेमोडीसाठी हिंदू-अरेबिक अंकांवर अवलंबून असणाऱ्या अंकगणिताचा वापर केला होता.

Tags:

अभियांत्रिकी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शरद पवारक्रियाविशेषणमहात्मा गांधीअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगर जिल्हाहरितक्रांतीहातकणंगले विधानसभा मतदारसंघमराठी भाषा दिनरायगड जिल्हाक्रिकेटजागतिक व्यापार संघटनाहवामानअमित शाहकबड्डीनगर परिषदछगन भुजबळआदिवासीविद्या माळवदेरामजी सकपाळविनयभंगतिरुपती बालाजीकाळूबाईरेणुकागोपाळ कृष्ण गोखलेताराबाईविवाहखंडोबाशहाजीराजे भोसलेओमराजे निंबाळकरसकाळ (वृत्तपत्र)राजकीय पक्षफुटबॉलजगातील देशांच्या राजधान्यांची यादीकर्ण (महाभारत)चलनवाढप्रकल्प अहवालमहाराणा प्रतापश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघहिंदू लग्नभारतीय रिपब्लिकन पक्षवसंतराव दादा पाटीलवाशिम जिल्हाहनुमान जयंतीअजिंठा लेणीमहाराष्ट्र शासनमासिक पाळीलिंग गुणोत्तरभूतनक्षत्रमाहिती अधिकारमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीइंदुरीकर महाराजगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुळाक्षरसंभोगमहाबळेश्वरधाराशिव जिल्हाशनिवार वाडाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचिपको आंदोलनइतिहासाच्या अभ्यासाची साधनेअहिल्याबाई होळकरभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीकालभैरवाष्टकनृत्यरामदास आठवलेबुलढाणा लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःभोपाळ वायुदुर्घटनारतन टाटापुन्हा कर्तव्य आहेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघसंस्कृतीसैराटराज्य निवडणूक आयोगनामदेवगजानन महाराज🡆 More