सप्तशृंगी देवी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "आर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.

सप्तशृंगी देवी
या http://mivanikar.blogspot.in/2014/01/blog-post_8426.html , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.


सप्तशृंगी देवी
सप्तशृंगी देवी
सप्तशृंगी देवी
सप्तशृंगी देवी मंदिर

सप्तशृंगी हा भारताच्या हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला । आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरीपासून झाली आहे, ज्यांचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे, परंतु आता शाकम्भरी देवीची अनेक मंदिरे बांधली गेली आहेत परंतु मुख्य शक्तीपीठ हे एक आहे सहारनपूर ।

अलंकार

देवीची मूर्ती ९ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार पैठणी / शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात. डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

भौगोलिक स्थान

हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात.

इतिहास

सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदाय मध्ये नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन असे आहे कि दत्त गुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानक पणे महादेव यांना कळत की कोणी तरी तपश्चर्या करत आहे ते बघण्या करिता ते दत्तगुरू याना पाठवता व दत्तगुरू त्यांना घेऊन महादेव कडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल. ''शाबरी विद्या''ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तीसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतातही देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात.

रूप

कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे

स्वरूप

देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने ४७२ पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत. व २०१८ पासून रज्जूमार्गाचा वापर सुरू झाला आहे.

पूजा

पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यांत भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही नैवेद्य म्हणून असते असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो.

गडावरील इतर ठिकाणे

  • कालीकुंड
  • सूर्यकुंड
  • जलगुंफा
  • शिवतीर्थ
  • शितकडा
  • गणपती मंदिर
  • गुरुदेव आश्रम

गडावर जाण्याच्या सोई

गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिकचे जुने मध्यवर्ती बस स्थानक येथून व दिंडोरी नाका येथून मिळतात. उत्सव काळात जास्तीच्या एस. टी. बसेसची सोय करण्यात आलेली असते. गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर बस आहे.

राहण्याची व भोजनाची सोय

भाविकांना गडावर निवासाच्या सोयीसाठी ट्रस्टने धर्मशाळेमध्ये २१४ खोल्या उपलब्ध केलेल्या आहेत. धर्मशाळा कार्यालय २४ तास उघडे असते. धर्मशाळेच्या खोलीसाठी आरक्षण पद्धत नाही. गडावर आल्यानंतर खोली मिळेल व खोली एका दिवसासाठी मिळेल.

संस्थानातर्फे केवळ २० रुपये देणगी मूल्यामध्ये पोटभर प्रसादाची (भोजनाची) सोय करण्यात आली आहे. पौर्णिमा, नवरात्र व चैत्रात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते. प्रसादलयात भाविकांसाठी सकाळी ११ ते २.३० व रात्री ७ ते ९.३० या वेळेत प्रसादाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. एकावेळी एक हजार भाविकांची बसायची सोय आहे.

अधिक वाचन

हेसुद्धा पहा

देवीची साडेतीन शक्तिपीठे

संदर्भ

Tags:

सप्तशृंगी देवी अलंकारसप्तशृंगी देवी भौगोलिक स्थानसप्तशृंगी देवी इतिहाससप्तशृंगी देवी रूपसप्तशृंगी देवी स्वरूपसप्तशृंगी देवी पूजासप्तशृंगी देवी गडावरील इतर ठिकाणेसप्तशृंगी देवी गडावर जाण्याच्या सोईसप्तशृंगी देवी राहण्याची व भोजनाची सोयसप्तशृंगी देवी अधिक वाचनसप्तशृंगी देवी हेसुद्धा पहासप्तशृंगी देवी संदर्भसप्तशृंगी देवी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वसंतराव दादा पाटीलतानाजी मालुसरेसावता माळीमहात्मा गांधीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमातीबहावाराज्यपालभारतातील राजकीय पक्षजनहित याचिकाब्राझीलची राज्येमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभारतीय निवडणूक आयोगकर्ण (महाभारत)महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीउदयनराजे भोसलेदिल्ली कॅपिटल्समहाराष्ट्रातील नद्यांची यादीमुघल साम्राज्यसोनारसमाज माध्यमेवाचनज्यां-जाक रूसोहवामान बदलकुणबीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)बुद्धिबळहातकणंगले लोकसभा मतदारसंघअमरावतीजागतिक पुस्तक दिवसघनकचरापोक्सो कायदाविजयसिंह मोहिते-पाटीलपुणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आदिवासी समाजविमालिंग गुणोत्तरमहाराणा प्रतापउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र समितीधनुष्य व बाणनिबंधभारताचे उपराष्ट्रपतीशनि (ज्योतिष)सुभाषचंद्र बोसउच्च रक्तदाबरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघएकनाथ शिंदेयवतमाळ विधानसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरविरामचिन्हेसॅम पित्रोदावृत्तपत्रभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारताचा स्वातंत्र्यलढातिसरे इंग्रज-मराठा युद्धमधुमेहशब्द सिद्धीदीपक सखाराम कुलकर्णीइंदिरा गांधीॐ नमः शिवायरामदास आठवलेध्वनिप्रदूषणगंगाखेड विधानसभा मतदारसंघविठ्ठलराव विखे पाटीलसमासनाटकमहाविकास आघाडीताराबाईभाऊराव पाटीलअष्टांगिक मार्गमहिलांसाठीचे कायदेलीळाचरित्रलहुजी राघोजी साळवेप्रेमानंद महाराज🡆 More