बखर

बखर शब्दाची उत्पती अरबी शब्द खबर (बातमी, वृत्तांत) पासून झालेली आहे.

मराठांच्या काळात बखर हा शब्द माहिती देणाऱ्या अर्थाने रुढ झाला आहे. अशी माहिती अर्थातच ऐतिहासिक व्यक्ति व घटना नांच्याविषनी असते. अनेक वेळा चरित्रनानकाना हुकूमावरून बखरकाराकडून लिहून घेण्यात येत असे. तथापि बखरकार एका विशिष्ट पक्षाचे असल्याने त्यांचा इतिहास पक्षपतीपणे लिहिला जात असे. स्वयकीयांची स्तुती व परकीयांची निंदा असे. तरीही राजकीय स्वरुपाच्या इतिहास लेखनाची परंपराच्या दृष्टीने त्यांचे महत्व आहे. शालीवाहन बखर ही सर्वांत जुनी बखर आहे. वि. का. राजवाडे यांच्या मते इ.स १८१८ पर्यंत सुमारे अडीचशे बखरी लिहिल्या गेल्या. इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ७० बखरी प्रसिद्ध झाल्या आहेत.

सभासद बखर, मोडी प्रत
सभासद बखर, देवनागरी लिप्यंतर
कृष्णाजी अनंत हिरेपारखी तथा 'सभासद' विरचित सभासद बखरीतील एक पान. डावीकडे, मूळ मोडी लिपीतील प्रत व उजवीकडे, त्याचे देवनागरी लिप्यंतर. बखरी या साधारणतः दुय्यम साधने समजली जात असली तरी, 'सभासद' हा शिवछत्रपतींचा दरबारी असून समकालीन व प्रत्यक्षदर्शी होता. आणि याच कारणामुळे या बखरीला एक वेगळे महत्व आहे जे इतर उत्तरकालीन बखारींना नाही.

बखरलेखनाचे कालखंड

बखरलेखनाचे सर्वसाधारण तीन कालखंड पडतात. शिवपूर्व कालखंड, शिवकाल व पेशवेकाल, शिवपूर्वकालात बखर ही आख्यायिका म्हणून वावरते. शिवकालात ही बखर चरित्रकथा म्हणून अवतरते. पेशवेकालात तिला स्वतःचे स्वयंपूर्ण विकसीत स्थान मिळते.

शिवकालीन बखरी

सभासद बखर

सभासद बखर ही शिवाजी महाराजांवरील सर्वात जुनी व शिवकालात लिहिली गेलेली बखर आहे. (इ.स १६९४) हिचा कर्ता कृष्णाजी अनंत सभासद हा असून त्याने शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वतः पाहिलेला व ऐकिलेला आहे. राजाराम महाराजांच्या आज्ञेने ही बखर लिहिण्यात आली. मराठी इतिहासाच्या अभ्यासूच्या दुर्देवाने सभासदाने ही बखर फार संक्षिप्त अशी लिहिली आहे. तरीही महाराजाच्या काळातील ही बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्व आहे. बखरीत महाराजांची राज्यकारभार व्यवस्था, लप्कर अवस्था, किल्ले, खजिना, सरदार इत्यादी अनेक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे.

९१ कलमी बखर

ही बखर ९१ कलम बखर नावाने प्रसिद्ध आहे. कारण त्यात ९१ कलमे असून मालोजी राजे भोसले यांच्या पासून शिवाजी महाराजांच्या मृत्युपर्यंतचा इतिहास कथन केला आहे. ही बखर प्रसिद्ध करण्याचे श्रेय संशोधक वि. स. वाकसकर यांच्याकडे जाते. (इ.स. १९३०) वाकसकरांच्या मते ही बखर मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यानी तयार केली. तिचा लेखनकाल इ.स १६८५ ते इ.स १७०७ दरम्यानचा असावा.

चिटणीस बखर

चिटणीस बखर मल्हारराव रामराव चिटणीस यानी इ.स. १८११ मध्ये दुसऱ्या शाहूंच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली. बखरकाराचे खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस शिवाजी महाराजांचे समकालीन होते. या बखरीत एकूण सात प्रकरणे आहेत. ही बखर प्रथम विविध ज्ञानविस्तार मासिकात प्रसिद्ध झाली (इ.स. १८७७). बखरकाराकडे साधनाची अनुकूलता असली तरी साधनसामग्रीचा पद्धतशीर उपभोग करण्याचे ज्ञान त्याला नव्हते. बखरीतील घटना कालानुक्रमाने दिलेल्या नाहीत.

चित्रगुप्त बखर

ही बखर सभासद बखरीवर आधारित आहे. हिचा कर्ता रघुनाथ यादव चित्रगुप्त (चित्रे) हा असून बखरींच्या मजकूरात अधूनमधून त्यानी आपल्या कविता घातल्या आहेत. हा बखरकारही बाळाजी आवजी चिटणीसांच्याच घराण्यातील होता. सभासद बखरीत ज्या पुरुषांची आडनावे दिली नाहीत. त्यांची आडनावे चित्रगुप्त लिहिण्याच्या झोकात सहजासहज देऊन जातो. ही बखर इ.स. १७६५ च्या सुमारास लिहिली गेली असावी.

दलपतरावाची बखर

दलपतरावाची बखर शिवाजी महाराजांना विरोधी पक्षात असणाऱ्या लेखकाने ही बखर लिहिली आहे. त्यामुळे महाराजांच्या विरोधात असणाऱ्या तत्कालीन मंडळीचे लांना त्याच्या कर्माविषयी काय मत होते, हे अजमाविण्यासाठी या बखरींचा उपयोग होता.

शिवदिग्विजय बखर

ही बखर इ.स.१८१८ साली लिहली गेली आहे. हिचा कर्ता अज्ञात आहे. इतिहास संशोधक नंदुरबारकर व दांडेकर यानी तिचे संपादन केले व ती इ.स.१८९५ साली प्रसिद्ध केली. इतिहासाचार्य राजवाडांच्या मते या बखरीचा मजकूर एखाद्या जुन्या बखरीवरान घेतला असावा. राजाराम महाराजांना राजपद मिळावे म्हणून राणी सोराबाईने केलेल्या कृत्यांचे वर्णन ना बखरकाराने केले आहे.

मराठी साम्राज्याची छोटी बखर

मराठी साम्राज्याची छोटी बखर या बखरीचा रचना इ. स. १८१७ साली झाली असावी. इतिहासकार बाळाजी जनार्दन मोडक यांनी ती 'काव्येतिहासंग्रह' या मासिकात प्रसिद्ध केली. स्थल, व्यक्ती व काल यांचा बराच विपर्यास बखरीत आहे. तरीही शिवचरित्रामधील काही नव्या बाबी या बखरीतून पुढे येतात.

चिटणीसकृत संभाजी महाराजांची बखर व राजाराम महाराजांची बखर

चिटणीसकृत संभाजी महाराजांची बखर व राजाराम महाराजांची बखर मल्हार रामराव चिटणीसानेच या दोन बखरी लिहिल्या आहेत. मराठ्याच्या बाजूकडून संभाजी महाराज व राजाराम महाराज यांची चरित्रे कळण्यासाठी याच बखरींचा उपभोग होतो. हा बखरकार संभाजी महाराजांच्या विरोधात लिहितो व राजाराम महाराजांच्या संबंधी प्रशंसेचे उद्गार काढतो.

पेशवेकालीन बखरी

पेशवेकालीन बखरी इ.स. १७०७ मधील शाहूचे दक्षिणेतील आगमन ते इ.स. १८१८ मध्ये झालेला मराठी राज्याचा अस्त ना पेशवे काळाविषयी ही अनेक बखरी लिहिल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या बखरी खालीलप्रमाणे आहेत.

साष्टीची बखर

उत्तर कोकणातील साष्टी व वसई प्रांतावर इ.स. १७३७ ते ३९ या काळात मराठांनी स्वारी केली व ते प्रांत जिंकून घेतले. या विजयाची माहिती या बखरीत दिली आहे. ही बखर इ.स १७४२ मध्ये लिहिली गेली आहे. वसईच्या संग्रामाचे खरे श्रेय गंगाजी नाईक यांचे असून यांच्या तुलनेत चिमाजी अप्पाचे या संग्रामातील योगदान गौण असल्याचे प्रतिपादन या बखरीत करण्यात आले आहे.

श्री. शाहू महाराजांची बखर

श्री. शाहू महाराजांची बखर या बखरीचा कर्ता गोविंदराव खंडेराव चिटणीस आहे. या बखरीत शाहू महाराजांचा जन्म ते मृत्युपर्यंतची माहिती विस्ताराने दिली आहे. मुघलांच्या कैदेत असता शाहू महाराजांच्या परिस्थितीचे तपशीलवार वर्णन बखरकाराने केले आहे.

पेशव्यांची बखर

पेशव्यांची बखर या बखरीचा कर्ता कृष्णाजी सोहीनी आहे. इ.स. १७१३ ते १८१८ या काळातील सर्व घडामोडींचा तपशीलवार उल्लेख या बखरीत आढळतो. ही बखर पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा आहे. मराठांच्या इतिहासातील विविध प्रसंगाचे वर्णन त्यामध्ये केले आहे.

पानिपत बखर

पानिपत बखर इ.स. १७६३ मध्ये रघुनाथ नादव याने पेशवा नानासाहेब यांची विधवा पत्नी गोपिकाबाई याच्या आज्ञेवरून ही बखर लिहिली होती. रघुनाथ यादव हा पेशव्यांच्या पदरी कारकून होता. पानिपतच्या संग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या महत्वाच्या व्यक्तींची यादी हे या बखरीचे विशेष वैशिष्ट आहे. पानिपतच्या संग्रामानंतर लगेचच ही बखर लिहिली गेली असल्याने यातील हकीगत खरी असावी ही सर्वसाधारण अपेक्षा मात्र खोटी ठरते. जदुनाथ सरकार तर या बखरीचे वर्णन 'अफीमबाजाचे लेखन' असे करतात.

भाऊसाहेबांची बखर

भाऊसाहेबांची बखर पत्ररुपातील या बखरीचा लेखक शिद्यांच्या पदरी एक सेवक असावा. या बखरीत इ.स. १७६१ च्या पानिपतच्या संग्रामाविष नीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. मात्र त्याच्या विश्वसनीयतेची खात्री देता येत नाही. बखरीतील मजकूरावरून काही तत्कालीन चालीरीतीवर प्रकाश पडतो. सतीची पद्धत, पाठीवर जखम झालेल्या सैनिकाची समाजात होणारी हेटाळणी याचा उल्लेख बखरकाराने केला आहे.

काशीराजाची बखर

काशीराज हा मराठी ब्राम्हण अवधचा नवाब शूजाउद-दौलाच्या सेवेत होता. त्याने फारसी भाषेत पानिपतच्या लढाईचा वृतांत लिहिला आहे. पानिपतच्या लढाईच्या तपशिलाविषयक हा वृतांत महत्वाचे साधन आहे.

संदर्भ व नोंदी

अधिक वाचन

  1. मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा वेचक इतिहास : डॉ.विद्यासागर पाटंगणकर. चिन्मय प्रकाशन औरंगाबाद.
  2. प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप : ह.श्री. शेणोलीकर

Tags:

बखर लेखनाचे कालखंडबखर शिवकालीन ीबखर पेशवेकालीन ीबखर संदर्भ व नोंदीबखर अधिक वाचनबखर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विजयसिंह मोहिते-पाटीलशिवछत्रपती पुरस्कारनियोजनसांगली जिल्हापवनदीप राजनयूट्यूबक्रिकेटबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीप्रदूषणमराठी व्याकरणमण्यारलोणार सरोवरवृद्धावस्थाहातकणंगले विधानसभा मतदारसंघगोवरअक्षय्य तृतीयाकृष्णजागरण गोंधळदीनबंधू (वृत्तपत्र)अर्जुन वृक्षश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचक्रीवादळआचारसंहिताबँकमहाराष्ट्रआंबेडकर कुटुंबजिंतूर विधानसभा मतदारसंघसुषमा अंधारेदेवेंद्र फडणवीससंभाजी भोसलेमोबाईल फोनकादंबरीबहावारामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीभारताचे सर्वोच्च न्यायालयबाराखडीखो-खोमराठी भाषा दिनगजानन महाराजआज्ञापत्रनाझी पक्षदूरदर्शननर्मदा नदीपंचशीलहॉकीराज्यशास्त्रभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्रातील पर्यटनछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसव्यवस्थापनहवामान बदलकृष्णा नदीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)खंडोबालोकगीतसप्तशृंगी देवीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षआरोग्यमुळाक्षरद प्रॉब्लम ऑफ द रूपीहृदयसंगीतातील रागपुरंदर किल्लानांदेडगोंधळइराकशिवाजी महाराजजालियनवाला बाग हत्याकांडअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोममहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४अभंगतेजस ठाकरेकोरफडज्योतिबा मंदिरनक्षलवादवस्तू व सेवा कर (भारत)🡆 More