लक्ष्मी: प्रमुख हिंदू देवी

लक्ष्मी (/ˈlʌkʃmi/; संस्कृत: लक्ष्मी, IAST: lakṣmī इंग्रजी : Lakshmi (Laxmi) goddess of wealth, fortune ) ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे.

ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली.देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आई तिरंगिनी यांची कन्या आहे.

लक्ष्मी
लक्ष्मी: कल्की पुराण, प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र, जन्म आणि विवाह कथा
राजा रवी वर्मा यांचे देवी लक्ष्मीचे चित्र

समृद्धी, संपत्ती - इत्यादींची अधिपती देवता

मराठी लक्ष्मी
संस्कृत लक्ष्मीः
कन्नड ಲಕ್ಷ್ಮಿ
तमिळ லட்சுமி
निवासस्थान पृथ्वी वैकुंठ
वाहन कमळ , गरुड वैनतेय, घुबड
शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, कमळ, शंख
वडील प्रभु समुद्रदेव
आई तिरंगिनी
पती विष्णू नारायण
अपत्ये कामदेव
अन्य नावे/ नामांतरे विष्णूप्रिया,पद्मा (कल्की), सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, माधवी आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती, पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतसृजा, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनादप्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करीषिणी, चन्द्रालक्ष्मी, समुद्रराजतनया,मोहिनी
या देवतेचे अवतार सीता, पद्मा, धरणी, यशोधरा, पृथ्वी (माता), राधा, रुक्मिणी
या अवताराची मुख्य देवता पृथ्वी धरणी
मंत्र महादेव्यै च विद्महे। विष्णू पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात॥

ॐ महालक्ष्म्यै नम:॥

नामोल्लेख श्रीमद भागवत, विष्णू पुराण श्रीसुक्त
तीर्थक्षेत्रे श्रीवीर वेंकटसत्यनारायण स्वामी मंदिर, तिरुपती बालाजी, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर
विशेष माहिती दिवाळी, लक्ष्मीपूजन, लक्ष्मीनारायण पूजा, कोजागरी / पौष पौर्णिमा

ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण(विष्णू)सहित रामावतारात ती सीता बनली , कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे.

    संस्कृत श्लोक
    राघवत्वेऽभवत् सीता रुक्मिणी कृष्णजन्मनि ।
    अन्येषु चावतारेषु विष्णोः एषा अनपायिनी ॥

कल्की पुराण

  • इयं मम प्रिया लक्ष्मीः सिंहले संभविष्यति

बृहद्रथस्य भूपस्य कौमुद्यां कमलेक्षणा

भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -कल्कि पुराण: २.६

अर्थ - कल्की पुराणानुसार, ती माझी प्रिया लक्ष्मी सिंहल नावाच्या बेटात जन्म घेईल. सिंहल या बेटाचा राजा बृहद्रथ आणि त्यांची पत्नि राणी कौमुदी यांची कमळासमान डोळे असणारी कन्यादेवी लक्ष्मी आहे. तिला माझी पत्नी पद्मा नावाने ओळखतील.[१]

भागवत पुराणानुसार, कामदेव हा श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे.श्रीकृष्णरुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे.;वैष्णव सिद्धान्तानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात.

लक्ष्मीला “श्री” म्हणजे “समृद्धी” “आनंद”, “वैभव” असे म्हटले जाते; लक्ष्मीला माधवी, रमा, कमला, श्री अशी अनेक नावे आहेत. श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये अदिति-निर्ऋति. पृथिवी, शची, राका, सिनीवाली, कुहू, सरमा यांचा समावेश होतो.

दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येला प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, कुबेर, गणेशाची तसेच धनलक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र वा श्रीचक्र, शंख याची स्थापना करून पूजा करतात. दीपोत्सव भारतात आणि जगभरात साजरा होतो. या सणाच्या दिवशी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावतात. घराबाहेर विविधरंगी रांगोळी काढतात. स्वस्तिक, गोपद्म, कमळ, शंख, चक्र, पूर्णचन्द्राचीचे कला (पौर्णिमा), लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीची प्रतीके आहेत. ही मंगलचिन्हे दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगानी सजवतात.

लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. दिवाळीत घरोघरी फराळ बनवतात व शेजाऱ्या घरी पोचता करतात.

पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसाममध्ये लक्ष्मी देवी बरोबर वाहन घुबड (उल्लीक) याचीही पूजा होते.

प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र

  • भारतात कलश हे समृद्धीचे लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते.
  • हिंदुधर्माशास्त्रनुसार श्रीयंत्र हे सर्व यंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ यंत्र आहे.श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्रीमहालक्ष्मीचे स्वरूप आहे. श्रीललिता महात्रिपुरासुंदरीचे निवासस्थान मानले जाते. लक्ष्मी देवी यांच्या चतुर्भुज (विष्णूप्रमाणे ) चार हातामध्ये तिचा दोन वरचा उजव्या आणि डाव्या हातामध्ये पाण्यात उगवलेले दोन कमळपुष्प असते.आणि खाली डावीकडे खालचा हातामध्ये अभयमुद्रा दर्शविते. उजवीकडे खालचा हातामधुन सोन्याचे नाणी सोडताना दिसून येते, तिथे आपल्याला घुबड बसलेला आढळतो.लक्ष्मीला लाल वा गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली असते.
  • लक्ष्मी देवी, उभी किंवा पाण्यामध्ये मोठे कमळाचा फुलांचा असनावर बसलेली असते. तिला 'कमला' वा पद्मावती असे म्हणतात. ,तिचा हातात सोन्याचा भरलेला कलश आहे. लक्ष्मी या कलशातून संपत्तीचा वर्षाव करते तिला धनलक्ष्मी असे म्हणतात. कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन कुम्भ, ते हत्ती कुम्भातले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. तिला अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे म्हणतात. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. ॠग्वेदातील सूक्तात लक्ष्मीचे वर्णन आहे. ती हस्तिनाद प्रबोधिनी आहे. म्हणजे हत्तीच्या चित्कारांनी ती जागी होते
  • घुबड (उल्लूक) हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते.
  • शंख हा समुद्रात सापडतो.शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. समुदद्रमंथनातून मिळालेला पांचजन्य हा शंख भगवान विष्णूने घेतला. म्हणूनच लक्ष्मी-विष्णू (श्रीलक्ष्मी नारायण)पूजेमध्ये मूलत: शंख वाजविला ​​जातो.समुद्र मंथनातून पांचजन्य नावाचा शुभ्र शंखाची उत्त्पन झाले, विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून 'शंख'तिचा सहोदर भाऊ आहे. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे बहीण-भाऊ मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. विष्णूने आपल्या हातात एक शंख धारण केले.श्रीलक्ष्मी नारायणला अधिक प्रिय आहे. शंख ठेवण्याकरिता जे (बहुधा कासवाच्या आकाराचे) आसन असते त्याला अडणी म्हणतात.
  • कमळ हा श्रीलक्ष्मीला नारायणला अधिक प्रिय आहे
  • अश्वत्थ (पिंपळ), बेल, चंदन, आंब्याचे व नारळाचे झाड, परिजातकवृक्ष हा लक्ष्मीचा प्रियवृक्ष आहे.
  • लक्ष्मी म्हणजे लक्षण किंवा चिन्ह, शांती आनंदाची, निराश दुर करणारी देवी आहे.
लक्ष्मी: कल्की पुराण, प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र, जन्म आणि विवाह कथा 
गजलक्ष्मी

जन्म आणि विवाह कथा

पौराणिक समुद्रमंथन कथानुसार, लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगीनी देवी यांची कन्या.

हिंदू पौराणिकथानुसार,महर्षि भृगु हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांपैकी एक आहेत महर्षि भृगु यांनी दक्षप्रजापती यांची कन्या ख्याती हिच्याशी विवाह केला; गरुड पुराण, लिंग पुराण आणि पद्म पुराण मते, महर्षि भृगु आणि पत्नी ख्याती यांना २ पुत्र धाता आणि विधाता, १ पुत्री 'श्री' (लक्ष्मी) ही ३ मुले झाली. लक्ष्मी 'श्री'ला महर्षि भृगु आणि पत्नी ख्याती यांची कन्या आहे असे म्हटले जाते म्हणून श्रीला (लक्ष्मी) 'भार्गवी' असे नाव ठेवले गेले.

समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या आहे. ती कमलासनावर विराजमान, चतुर्भुज, तेजस्विनी, सुंदर होती. देव आणि दानव मोहित होऊन तिच्याजवळ गेले; पण लक्ष्मीने त्यांचाकडे लक्ष न देता, योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले. लक्ष्मीने विष्णूचा गळ्यात कमळाचे फुलांचा हार घातले. अशा प्रकारे विवाह झाला.

देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेले अन्य रत्‍नाबरोबर सागरातून तिची उत्पत्ती झाली. चतुर्युग, चारयुगापैकी एक युग म्हणजे सत्य युग(सतयुग).

प्रजापिता ब्रह्माकुमारी (Brahma Kumaris)मते,सतयुगातील विष्णूचे दिव्य निवासस्थान विष्णूलोक वैकुंठामध्ये लक्ष्मीदेवी नारायण(विष्णू) यांचा सोबत निवास करते त्या संयुक्त रूपाला 'लक्ष्मीनारायण' असे म्हणतात.

चौदा रत्नाचे श्लोक

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा ।

गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।

रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥[१०]

लक्ष्मी: कल्की पुराण, प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र, जन्म आणि विवाह कथा 
मायापूर मंदिरात कृष्णा आणि राधा

मुख्य पान: राधा

ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडात आणि गणेशखंडात लक्ष्मीच्या उत्पत्तिसंबंधी आणि रूपांबाबत पुढील माहिती मिळते : सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीरभागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीरभागापासून राधिका अशी दोन रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही दोन रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप दोन हात असलेले, तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर चार हातांचे होते. राधिकेने द्विभुज कृष्णाला वरले, तर त्याच्या चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागला. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती.

या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली. कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रमेचे रूप धारण केले. स्वर्गात ती इंद्रैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात व मर्त्यलोकात राजांच्या ठिकाणी राजलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली.

  • गौड़ीय वैष्णवसंप्रदायमध्ये, राधा ही लक्ष्मीदेवीचा अंश अवतार मानली आहे. राधा कृष्णाच्या डाव्या अंगातून निर्माण झाली. कृष्णाचे दोन भाग होऊन एक भागाला कृष्णाचे व दुसऱ्या भागाला राधेचे रूप प्राप्त झाले. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत.
  • कृष्ण सहीत राधाची उपासना करतात, राधाचा जन्म बरसाना किंवा रावल येथे झाला. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला 'श्रीराधा अष्टमी' असे म्हणतात.
  • राधा ही कीर्तिदादेवी वा रत्नगर्भा देवी आणि महाराज वृषभानु यांची कन्या राधाष्टमी मुख्यत: भागात, बरसाना, मथुरा, वृंदावन, नांदगाव आणि आसपासच्या भागात (ब्रज भूमि) साजरी केली जाते.

लाडिली जी मंदिर, बरसाना मथुरा जिल्हा, उत्तरप्रदेश मध्ये राधारानीचे मंदिर आहे.

काही विद्वानांचा असा विश्वास आहे की राधाचा जन्म यमुना जवळील 'रावल' या गावात झाला आणि नंतर राधाचे वडील बरसाना येथे स्थायिक झाले. या समजुतीनुसार नंद गोप आणि वृषभानु यांचे जवळचे मित्र होते. कंसाने पाठवलेल्या असुरांच्या भयामुळे, कारण नंद गोप गोकुळ-महावनला सोडून, आपल्या बालकृष्ण कुटूंबासह, सर्व गोप आणि गौधन घेऊन नंदगाव येथे वास्तव्य केले, तेव्हा वृषभानु पण आपल्या कुटुंबाबरोबर रावल गाव सोडले आणि वृषभानु राधा कुटुंबासह नंदगावजवळील बरसाना (वृषभानुपुर) येथे राहिले.

  • दक्षिण भारतात लक्ष्मीला 'श्रीदेवी' वा 'पद्मावती' असे म्हणतात.दक्षिण भारतातील श्रीवैष्णव मोठ्याप्रमणात पंचधातुपासून आणि काळ्यादगडापासून(शालिग्राम) भक्तीने उपासना करतात.
  • लक्ष्मीदेवीची उपासना ऋग्वेदात आहे.इतर पुत्र देवसखा, चिक्लीत, आनंद, कर्दम,श्रीद हे नाव श्रीसूक्त श्लोकामध्ये उल्लेख आढळते. ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीसूक्ताची देवता ‘श्री’ म्हणजेच ‘लक्ष्मी’ होय. कारण श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. त्याला 'लक्ष्मी सुक्तम्' देखील म्हणतात.
  • श्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरण्मयी, अश्व-रथ-गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे. ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. कर्दम आणि चिक्लीत ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावे श्रीसूक्तात निर्दिष्ट आहेत. श्रीसूक्तातील प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रांत लक्ष्मीचे विष्णूपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात. तिला महालक्ष्मी असेही म्हटले आहे. ती विष्णूमनोनुकुला असून क्षीरसमुद्राची राजकन्या होय. ऋग्वेदातील ज्ञानसूक्तात ‘भद्रैषां लक्ष्मीर्निहताSधि वाचि’ (१०.७१.२) इ. मंत्रांत एक प्रकारे वाग्लक्ष्मीचाच निर्देश केलेला दिसतो. वाणीचे भद्र सौंदर्य हीसुद्धा लक्ष्मीच. भागवत पुराणात विष्णूची शोभा, कांती म्हणजेच लक्ष्मी, असा निर्देश केलेला दिसतो. वाजसनेयिसंहितेतील (३१.२२) पुरुषसूक्ताच्या शेवटच्या मंत्रात मात्र ‘श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ’ असा निर्देश आला आहे. त्यावरून ‘पुरुष’ रूपी विष्णूच्या श्री आणि लक्ष्मी या पत्नी होत्या, असा संदर्भ मिळतो. श्रीसूक्त हे देवीच्या वर्णन असलेले प्रसिद्ध सूक्त ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे
    सक्तुमिव तितउना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रत । अत्रा सखायः सख्यानि जानते भद्रैषां लक्ष्मीर्निहिताधि वाचि ॥२॥-ऋग्वेदः - मण्डल १० सूक्तं १०.७१
  • हे सुक्त ऋग्वेदात अधिक प्रसिद्ध बनले आहे. सूक्तकारांची इच्छा लक्ष्मीच्या आश्रयाने अलक्ष्मीचा नाश व्हावा अशी आहे (ऋचा ५). मार्कण्डेय पुराणातील दुर्गासप्तशतीत भीमा या महालक्ष्मीच्या अवताराचे वर्णन आले आहे. लक्ष्मीच्या दोन रूपांचाही उल्लेख श्रीसूक्तामध्ये आलेला आहे (ऋचा १३-१४) ती रूपे म्हणजे सूर्या आणि चंद्रा लक्ष्मी. चन्द्रा अथवा ‘चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं’ आणि आदित्यवर्णा हे इतरत्र सूक्तात आलेले उल्लेख तिच्या आदित्य आणि चंद्राशी असलेल्या जवळिकीचे निदर्शक आहेत याचा निर्देश यापूर्वी आलेला आहेच. सूर्याचा पर्जन्याशी संबंध असल्याचे उल्लेख अनेकवेळा ऋग्वेदात आलेले आहेत, तर चन्द्रामध्ये सोमरूपी अमृत असल्याची कथा तर सर्वज्ञात आहे. १०व्या मंडळातील सूर्यासूक्ताचा पाठ विवाहविधीत केला जातो, कारण सूर्या म्हणजे सूर्यकन्या धरित्री विवाहसोहळय़ाचे त्यात वर्णन आले आहे. या सृजनाशी व सुफलत्वाशी संबंधित असलेल्या प्रतीकांचा सूर्यालक्ष्मी आणि चन्द्रालक्ष्मी या नावावर प्रभाव असावा असे वाटते.
लक्ष्मी: कल्की पुराण, प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र, जन्म आणि विवाह कथा 
Ibu Pertiwi पृथ्वीची मूर्ती इंडोनेशिया मध्ये

इतिहास

ऐतिहासिक काळात भारतामध्ये कलेचा आविष्कार घडला तो मौर्य-शुङग काळात लक्ष्मीची रुपे कोरली गेली; बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी दिसून येते.आणि मुख्यत्वे सांची भारहूत येथील बौद्ध कलेतून, यक्ष-यक्षींच्या भीमकाय पाषाणप्रतिमातून आणि पक्क्या मातीच्या बाहुल्यांसारख्या प्रतिमांतून. प्रत्यक्ष श्री/लक्ष्मीच्या बाबतीत म्हणावयाचे झाल्यास भारहूतच्या स्तूपावरील यक्ष-यक्षींच्या प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. स्तूपाभोवतीच्या दगडी कठड्यावर जवळजवळ पुरुषाकारामध्ये उंच उठावात या पाषाण प्रतिमा आढळतात. त्यात विशेषकरून सिरिमा, चंदा यखी आणि कुपिरो (कुबेर) यखो अशा ओळख करून देणाऱ्या अभिलेखांसह आढळणाऱ्या यक्षप्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सिरिमा म्हणजे श्री व कुपिर म्हणजे कुबेर यक्ष यांच्या प्रतिमांचा बौद्ध स्तूपावरील अंतर्भाव झाला यावरून या देवता सामान्यजनांच्या मानसात घर करून होत्या हे स्पष्ट आहे. इंद्र, ब्रह्मा इत्यादी देवतांचासुद्धा बौद्ध देवकुलामध्ये अंतर्भाव होता यावरून हे स्पष्ट होते की सांप्रदायिक भेदामुळे जनमानसात लोकप्रिय असलेल्या देवतांच्या पूजाविष्कारात खंड पडलेला नव्हता. आधी उल्लेखिल्याप्रमाणे ‘श्री ही वैदिक देवता’ म्हणून मानण्यास काहीच हरकत नाही. तसेच निदान निरुक्तकार यास्कांच्या काळात कुबेर हा एक ऐतिहासिक मानव देवत्वाला गेल्याचा उल्लेख येतो. मनुष्य प्राकृतिक देवाचे उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि त्या अर्थाने उत्तर वैदिक काळात त्याचा देवकुलात अंतर्भाव झालेला होता. चन्द्रा लक्ष्मी म्हणून श्रीसूक्तात उल्लेखिलेले श्रीचे स्वरूप चन्द्रा यखी म्हणूनही पुजिले जात असे. परंतु श्री/लक्ष्मी विषयीची बौद्ध उपासकांच्या मनात असलेली प्रतिमा अगदी वेगळय़ा रूपात शिल्पकलेत प्रकट झालेली सांची येथे पाहावयास मिळते. ते दोन-तीन उदाहरणांतून प्रकट झाले आहे. एक म्हणजे अभिषेक लक्ष्मी. दोन हातांत दोन कमळाचे फुल घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले आहे, तर दुसऱ्या एका शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातांत कमळाचे फुल आहेत असे कोरीवकाम दिसून येते. पद्मेस्थिता आणि पद्मिनी या तिच्या दोन्ही बिरुदांत अभिप्रेत असलेला अर्थ कलाकाराने त्या रूपात प्रकट केलेला दिसतो, तर हस्तिनाद-प्रबोधिनी या बिरुदाशी पहिल्या चित्रणाचा संबंध दिसतो. काही कलामर्मज्ञांच्या मते हत्ती हे मेघाचे व पर्यायाने पर्जन्याचे प्रतीक असून लक्ष्मीने हातात धरलेली कमळे व ती कमळावर उभी आहे. कमळ ही सर्व सर्जनाची प्रतीके आहेत असे मानले जाते. अशाच प्रकारच्या पण कमलासीन अभिषेकलक्ष्मीचे एक ठळक चित्रण पितळखोरे (इ.स.पू. पहिले शतक) येथील विहाराकडे जाणाऱ्या सोपानाच्या शीर्षांवर आहे. पितळखोरे लेणे येथे ही लक्ष्मीचे शिल्प आढळते. कुषाण आणि गुप्तकाळात लक्ष्मीचे ठसे असलेली नाणी दिसून येतात. आणखी एक वेगळ्या प्रकारचे श्रीचे चित्रण सांची येथील तोरणावर आहे. येथे ती कमलासीन असून तिचे हात कमळमुद्रेत वक्षासमोर धरले आहेत. भरतनाट्यातील परंपरेप्रमाणे या मुद्रेचा अर्थ पूजा असल्याने लक्ष्मी भगवान बुद्धाला वंदन करते आहे असाच घेतला पाहिजे. श्री/लक्ष्मी ज्याप्रमाणे बौद्ध धर्मात स्वीकारली गेली तशी ती जैन धर्मातही आढळते. यावरून स्पष्ट होते.

लक्ष्मी: कल्की पुराण, प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र, जन्म आणि विवाह कथा 
Azilisesचे नाणेवर गज लक्ष्मी कमळावर उभी असल्याचे दर्शवते १ शतक इ.स.पू.
  • जैन, बौद्ध,शिल्पात अभिषेक किंवा गजलक्ष्मी दिसून येते. दोन हातांत दोन कमळे घेऊन उभी व बसलेली असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखवातात.

तिबेट, नेपाळ आणि दक्षिण आशियाच्या बौद्ध पंथांमध्ये

  • बौद्धधर्मातील नेपाळ (नेवार लोक) आणि तिबेट बौद्धधर्मात, वसुधरा (Shiskar Apa) ही संपत्ती, समृद्धी यांचे बौद्ध बोधिसत्व देवी आहे.
  • Ibu Pertiwi (English: Mother Prithvi म्ह्णजे माता पृथ्वी) या नावाची  इंडोनेशिया मध्ये देवी वसुंधरापृथ्वीची मूर्ती आणि हिंदू देवी लक्ष्मीची सारखी मुर्ति आढळते.
लक्ष्मी: कल्की पुराण, प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र, जन्म आणि विवाह कथा 
अष्टलक्ष्मी कोविल - आठ लक्ष्मींचे मंदिर, चेन्नई, तामिळनाडू,

श्रीअष्टलक्ष्मी

'लक्ष्मीचे आठ अवताराला 'श्रीअष्टलक्ष्मी' असे म्हणतात.महालक्ष्मीचे आठ रूप आहेत म्हणून नाव प्रसिद्ध आहे.

आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी.

अष्टलक्ष्मी कोविल

अष्टलक्ष्मी कोविल - आठ लक्ष्मींचे मंदिर, चेन्नई, तामिळनाडू येथील अष्टलक्ष्मी मंदिर लक्ष्मी देवींना समर्पित आहे.

अष्टलक्ष्मी कोविल एक हिंदू मंदिर आहे, चेन्नईच्या, Elliotच्या समुद्र तटावर समुद्राच्या किनारपट्टीवर आहे.

नाव

लक्ष्मीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते, संस्कृत मध्ये लक्ष्मी-सहस्रनामांची शुक्रवारी पहाटे लक्ष्मी सहस्रनाम वाचले जाते.

पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री, विष्णूप्रिया, कमला, प्रकृति, धरणी, पृथ्वी, पद्मा, माधवी, सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती, पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतस्र्रजा, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनादप्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करीषिणी, चन्द्रालक्ष्मी, समुद्रराजतनया इतर नावे श्रीसूक्तात दिली आहे.

पद्मा- कमळासारखी

कमला- कमळासारखी सुंदर

पद्मप्रिया- कमळ पुष्प प्रिय असणारी

पद्ममालाधरा- कमळ माल धारण करणारी

पद्ममुखी- कमळासारखा सुंदर चेहरा असलेला

पद्मक्षी- कमळांसारखे सुंदर डोळे

पद्महस्ता- कमळ हातात धारण करणारी

पद्मसुंदरी- कमळासारखी सुंदर

श्री- समृद्धी / आनंद / यश समृद्धी मध्ये जन्म

जगदीश्वरी- जगाची ईश्वरी

विष्णूप्रिया- विष्णू पत्नि

सण-उत्सव

लक्ष्मीपूजन

हिंदु धर्मात दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येत लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी घरांत  प्रदोषकाळी (संध्याकाळी) कुबेर, गणेश व लक्ष्मीचे पूजन श्रीसूक्तपठणही केले जाते. घरामध्ये व बाहेर अनेक दीप (दिवा) लावला जाते. काही वैष्णव भक्त श्रीलक्ष्मीनारायणाची आराधना करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक उर्जा असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात.

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात?

आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते. म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निःसारण, म्हणजेच रात्री १२ वाजता घरात केर काढतात.

स्वस्तिक,गोपद्म,कमळ,शंख ,चक्र ,पूर्ण चन्द्राचे कला (पौर्णिमा) , लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीचे प्रतीक आहे सुद्धा मंगलचिन्ह दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगानी सजवावी

कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा , ही आश्विन पौर्णिमा म्हणून सण साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये असते. कोजागरी पौर्णिमेला ,शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यामध्ये 'आश्‍विनी पौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. उपवास,पूजन व जागरण या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.

  • ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात.
  • रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आटवून त्यात केशर,पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलचीपुड, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.
लक्ष्मी: कल्की पुराण, प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र, जन्म आणि विवाह कथा 
बंगाली हिंदु स्वस्तिक
  • कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक याला 'लोख्खी पुजो' असे म्हणतात .दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये बंगाली समाजातील लोक लोख्खी पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबेचा कलश किंवा मातिचा कुंभावर आणि शहाळीनारळावर सिंदूराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूरा लेपाचा वापर करून काढतात या दिवशी भक्तीने शंख कमळाचे फुलाबरोबर श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.

तुळशी विवाह

तुळशी वनस्पतींचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते. तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतींचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांना तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत.

दिवा लावण्याच्या प्रथेमागील वेगवेगळी कारणे किंवा कथा

पौराणिक कथेनुसार, दिवाळीच्या दिवशी अयोध्याचा राजा राम, लंकेच्या राजा रावणाची वध करून राम सीता आणि लक्ष्मण सह अयोध्येत परतले. कृष्ण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा केला आणि विष्णूने हिरण्यकशिपुचा नरसिंहच्या रूपात वध केला होता आणि या दिवशी धन्वंतरि समुद्रमंथन नंतर आले. लोक आनंदाने दिवा लावतात.

लक्ष्मीचे संस्कृत श्लोक

श्रीलक्ष्मी नारायण संस्कृत श्लोक

ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्

वन्दे विष्णूं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥

श्रीसूक्त

ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥२॥

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्। श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम्॥३॥

कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्। पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम्॥४॥

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियंलोके देव जुष्टामुदाराम्। तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्व:। तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी:॥६॥

उपैतु मां देवसख: कीर्तिश्चमणिना सह। प्रादुर्भुतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे॥७॥

क्षुत्पपासामलां जेष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिमसमृद्धिंच सर्वानिर्णुद मे गृहात॥८॥

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्। ईश्वरिं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्॥९॥

मनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि। पशूनां रूपमन्नस्य मयि श्री: श्रेयतां यशः॥१०॥

कर्दमेनप्रजाभूता मयिसंभवकर्दम। श्रियं वासयमेकुले मातरं पद्ममालिनीम्॥११॥

आप स्रजन्तु सिग्धानि चिक्लीत वस मे गृहे। निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टि पिङ्गलां पद्ममालिनीम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥

आर्द्रां यः करिणीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीम्। सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह॥१४॥

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम्॥१५॥

यः शुचि: प्रयतोभूत्वा जुहुयादाज्यमन्वहम्। सूक्तं पञ्चदशर्चच श्रीकाम: सततं जपेत्॥१६॥

    प्रार्थना

ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥-बृहदारण्यक उपनिषद्

ॐ आम्हाला असत्य पासून सत्याकडे घेऊन जाते. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जाते. ॐ शांती शांती शांती.-बृहदारण्यक उपनिषद्

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

लक्ष्मी कल्की पुराणलक्ष्मी प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्रलक्ष्मी जन्म आणि विवाह कथालक्ष्मी इतिहासलक्ष्मी श्रीअष्टलक्ष्मी नावलक्ष्मी सण-उत्सवलक्ष्मी चे संस्कृत श्लोकलक्ष्मी हे सुद्धा पहालक्ष्मी संदर्भलक्ष्मीअमृतआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरणविष्णूसमुद्रसमुद्रमंथनहिंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धटेबल टेनिसभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाराष्ट्रातील पर्यटनआंतरजाल न्याहाळकधाराशिव जिल्हानाशिक लोकसभा मतदारसंघआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावासफरचंदमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगदेहूयोगगंगा नदीरामशेज किल्लाना.धों. महानोरभूकंपजायकवाडी धरणगणेश दामोदर सावरकरभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहाराष्ट्र विधान परिषदहिंदू धर्ममांगशब्दसूत्रसंचालनक्रिकेटचा इतिहासमण्यारभारताची जनगणना २०११संधी (व्याकरण)ॐ नमः शिवायमुद्रितशोधनइंदिरा गांधीआम्ही जातो अमुच्या गावासर्वनामअजित पवारनागपूर लोकसभा मतदारसंघभारत राष्ट्रीय क्रिकेट संघभरती व ओहोटीतुकडोजी महाराजमराठी विश्वकोश२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासम्राट अशोकजांभूळन्यूझ१८ लोकमतनक्षत्रस्ट्रॉबेरीदुसऱ्या महायुद्धाचे परिणामआंबेडकर कुटुंबबलुतेदारकुळीथवाक्यआचारसंहिताभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमराठी संतटोमॅटोमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारताचे सर्वोच्च न्यायालयसत्यशोधक समाजतुळजापूरऔरंगजेबमासिक पाळीवल्लभभाई पटेलवर्गमूळविज्ञानविधान परिषदसायकलिंगमहाराष्ट्राचे राज्यपाललातूर लोकसभा मतदारसंघराम सातपुतेहरीणमहाराष्ट्राची हास्यजत्राख्रिश्चन धर्ममिठाचा सत्याग्रहराजगडशीत युद्ध🡆 More