कमळ

नेलुंबो नुसिफेरा म्हणजे भारतीय कमळ ही एक जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिला 'लक्ष्मी कमळ' किंवा 'पवित्र कमळ' असे देखील म्हणतात.

या वनस्पतीची जातकुळी नेलुंबो आहे.

भारतीय कमळ
नेलुंबो नुसिफेरा
नेलुंबो नुसिफेरा
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: सपुष्प वनस्पती
गण: प्रोटिआलिस
कुळ: निलंबियासी
जातकुळी: नेलुंबो
ॲडान्स
जीव: नुसिफेरा

कमळाचे रोप कमी ऑक्सिजन असणाऱ्या दलदलीत चांगले वाढते. कमळाचे पान, फूल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढते. फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून, परागीभवन झाल्यानंतर त्यावर प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. पूर्ण परिपक्व बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाण्या एवढा असून रंग काळपट होतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा 'कमळगठ्ठ्याचे मणी' असे म्हणतात. हे कमळगठ्ठ्याचे मणी हिंदू धर्मात जपाच्या माळेसाठी वापरले जातात. प्राचीन काळापासून लक्ष्मीचे प्रतीक म्हणून या मण्यांना मान्यता आहे. कमळाचे सर्व भाग खाण्यायोग्य असून त्यांचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापर होतो.

कमळ हे भारत आणि व्हिएतनामचे राष्ट्रीय फुल आहे. ही प्रजाती मुख्यतः भारतात हिमालय ते खाली श्रीलंका येथपर्यंत उगवते. या प्रजातीचे फुल गुलाबी असून, इंग्रजीत त्याला इंडियन लोटस किंवा सेक्रेड लोटस म्हणतात.

कमळ आणि कुमुदिनी यातील फरक

'कमळ (Nelumbo)' आणि 'कुमुदिनी उर्फ वॉटर लिली' मूलतः या दोन्ही जलीय वनस्पती असून दिसायला सुंदर आणि सामान्य माणसाला सहजासहजी भेद न करता येणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत. या दोन्हीत पुढील प्रमाणे वेगळेपणा दिसून येतो -

  1. कमळाची पाने अखंड गोलाकार असतात. याउलट कुमुदूनीच्या पानावर, पानाच्या काठापासून ते मध्यभागी देठापर्यंत एकच वैशिष्ट्यपूर्ण खाच आहे.
  2. कमळाचे फूल आणि बहुतेक पाने ही पाण्याच्या पृष्ठभागावर दोन ते तीन फूट उंच हवेत वाढतात. याउलट कुमुदिनीची पाने ही पाण्याच्या पृष्ठभागावर

तरंगतात.

  1. कमळाचे बीज, ज्याला कमळ गठ्ठा असे म्हणतात, हे शेंगदाण्याच्या आकाराचे जाड आणि लंबगोल असतात. तर कुमुदिनीचे बीज हे खसखस इतके बारीक असून काही मोजक्याच प्रजातीत ते उगवतात.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

कमळ (नेलुंबो)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नितीन गडकरीउत्तर दिशामहाराष्ट्राचे राज्यपालविठ्ठल रामजी शिंदेन्यूझ१८ लोकमतवर्धा लोकसभा मतदारसंघसमासमानसशास्त्रयोगघोरपडसमाजशास्त्रनाटकभारतातील जिल्ह्यांची यादीउंटमृत्युंजय (कादंबरी)सोलापूरलोकशाहीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रचिन्हसंयुक्त महाराष्ट्र समितीतापी नदीआमदारसामाजिक समूहजैन धर्महातकणंगले विधानसभा मतदारसंघमीन राससतरावी लोकसभासप्तशृंगी देवीछावा (कादंबरी)सूर्यव्यंजनअष्टविनायकलोकमतजागतिक लोकसंख्याअतिसारदिवाळीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीहस्तमैथुनकुणबीभारताची अर्थव्यवस्थापृथ्वीचे वातावरणत्र्यंबकेश्वरभाषाभाऊराव पाटीलराज्यसभामाळीमहाराष्ट्रमासिक पाळीअर्थशास्त्रबारामती विधानसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागक्रियाविशेषणवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघहळदअहिल्याबाई होळकरसम्राट अशोकसांगली विधानसभा मतदारसंघसत्यनारायण पूजानांदेडसह्याद्रीतूळ रासअर्थसंकल्पसंयुक्त महाराष्ट्र चळवळबच्चू कडू२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाब्राझीलची राज्येहोमरुल चळवळछत्रपती संभाजीनगर जिल्हाभोवळनोटा (मतदान)भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तएकविरामहाराष्ट्र दिनशिवसत्यशोधक समाजमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादी🡆 More