रफल: फ्रान्सचे अत्याधुनिक लढाऊ विमान

रफल हे फ्रान्सने विकसित केले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.

हे दोन इंजिने असलेले त्रिकोनी पंखाचे विमान आहे.

रफल
रफल: इतिहास, स्वरूप, तांत्रिक बाबी

फ्रान्स हवाई दलाची उडणारी दोन रफल विमाने

प्रकार हलके लढाऊ विमान
उत्पादक देश फ्रान्स
उत्पादक
पहिले उड्डाण ४ जुलै १९८६
समावेश फ्रान्स हवाई दल, फ्रान्स नौदल
सद्यस्थिती फ्रान्स हवाई दलात.
मुख्य उपभोक्ता फ्रान्स
एकूण कार्यक्रमखर्च ४० दशलक्ष युरो

इतिहास

युरोफायटर टायफून या प्रकल्पाची इ.स. १९७० मध्ये सुरुवात होतांना यात फ्रान्सही सामील होता. परंतु फ्रान्सला युरोफायटर टायफूनपेक्षाही हलके विमान हवे होते. शिवाय त्या विमानाने अणुस्फोटके वाहून नेली पाहिजेत अशीही अट होती. विमानाचे वजन किती असावे यावरून फ्रान्सचे इतर देशांशी फाटले आणि त्यांनी रफलचा विमानांचा संसार थाटला. सुरुवातीला रफल एची निर्मिती झाली मग रफल बी प्रत्यक्षात आले. हे विमान फ्रान्सच्या हवाई दलाप्रमाणेच फ्रान्सच्या आरमारालाही हवे होते. कारण त्यांची तत्कालीन विमाने मोडीत काढण्याची वेळ आली होती. मग या दोन विभागांनी मिळून हा प्रक्ल्प करायला घेतला.

स्वरूप

या विमानाला दोन इंजिने आहेत. याचाही आकार डेल्टा विंग म्हणजे त्रिकोनी पंखाचा आहे. या विमानातही कार्बन धागे आणि इतर साहित्य वापरले जाते. हे विमानही रडार आपले अस्तित्व पुसट करू शकते. अतिशय वेगवान त्रिमितीय नकाशे या विमानात उपलब्ध होऊ शकतात. तसेच प्रहार झाल्यास त्याचा आगाऊ प्रतिभेद करण्याची क्षमता या विमानात आहे. या विमानाची रडार अतिप्रगत इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान आणि लपण्याची क्षमता याचीच किंमत जास्त आहे. हे विमान भरपूर दारूगोळा घेऊन उडू शकते. याच विमानाचा भाऊ रफल एम हा फ्रेंच आरमारात वापरात आहे. एकाच प्रकारचे विमान हवाईदल आणि आरमारात वापरता येणे हा चांगला भाग या विमानाच्या वापरात आहे.

तांत्रिक बाबी

रफल: इतिहास, स्वरूप, तांत्रिक बाबी 
रफल cross-section
  • चालक दल: २
  • लांबी: १५.२७ मीटर (५०.१ फुट)
  • पंखांची लांबी : १०.८० मीटर(३५.४ फुट)
  • उंची : ५.३४ मीटर (१७.५ फुट)
  • पंखांचे क्षेत्रफळ: ४५.७ मी² (४९२ फुट²)
  • विमानाचे वजन: १०,१९६ किलो
  • भारासहित वजन : १४,०१६ किलो (३०,९०० पाउंड)
  • कमाल वजन क्षमता : २४,५०० किलो
  • इंधन क्षमता :४७०० किलो
  • कमाल वेग :
  • अति उंचीवर: मॅक १.८+ (२,१३०+ किमी/तास)
  • कमी उंचीवर: १३९० किमी/तास
  • पल्ला: ३,७००+ किमी
  • प्रभाव क्षेत्र: १८५२+ किमी
  • बंदुक : ३० मिमी
  • उडताना समुद्रसपाटीपासुन उंची : १५ किमी

वापर

नाटो राष्ट्रांनी इ.स २०११ मध्ये लिबिया विरुद्ध केलेल्या हल्ल्यात या विमानांचा वापर करण्यात आला.

भारताची खरेदी

इ.स २०११ मध्ये भारताने फ्रान्सला या विमानांच्या प्रात्यक्षिकासाठी आमंत्रित केले होते. फ्रान्स शिवाय हे विमान अन्य कोणत्याही देशाकडे नाही.

इतरत्र वापर

सौदीने हे विमान घेण्याची तयारी दाखवली होती पण त्यांना यापेक्षाही आधुनिक तंत्रज्ञान हवे होते म्हणून हा करार झाला नाही.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ९, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी १७, २००६ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)

Tags:

रफल इतिहासरफल स्वरूपरफल तांत्रिक बाबीरफल वापररफल भारताची खरेदीरफल इतरत्र वापररफल हे सुद्धा पहारफल बाह्य दुवेरफलफ्रान्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पसायदानसूत्रसंचालनलोकशाहीबहिणाबाई चौधरीवेदअमेरिकेची संयुक्त संस्थानेहनुमान चालीसास्वादुपिंडमराठी विश्वकोशकबीरहडप्पा संस्कृतीनीती आयोगपंजाबराव देशमुखचमारजाहिरातहरितगृह वायूआरोग्यशेतीघुबडमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कादंबरीसुजात आंबेडकरमहाराष्ट्र गीतमराठी साहित्यनर्मदा नदीआळंदीमहिलांसाठीचे कायदेमहाड सत्याग्रहसम्राट अशोक जयंतीविनायक दामोदर सावरकरनारायण मेघाजी लोखंडेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीनिलगिरी (वनस्पती)शिर्डी लोकसभा मतदारसंघढेमसेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसामाजिक कार्यगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघतुकडोजी महाराजसंगणकाचा इतिहाससकाळ (वृत्तपत्र)लोकसभा सदस्यआलेहळद२०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०हवामान बदलमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाछत्रपतीखासदारअळीवस्वच्छ भारत अभियानअघाडाहरीणस्त्री सक्षमीकरणउत्पादन (अर्थशास्त्र)अणुऊर्जाचाफाजीभपुरंदरचा तहमराठा साम्राज्यपृथ्वीराज चव्हाणवल्लभभाई पटेलदिशाअतिसारमोबाईल फोनउजनी धरणअजिंठा-वेरुळची लेणीमहाराष्ट्र विधान परिषदउदयनराजे भोसलेनिष्कर्षमृत्युंजय (कादंबरी)कुक्कुट पालनछगन भुजबळभारतीय राष्ट्रीय काँग्रेसखो-खोअरबी समुद्रईमेलकुटुंब🡆 More