नाट्यशास्त्र (संस्कृत : नाट्यशास्त्र ;रोमन लिपी : Nātyaśāstra) नाट्यशास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते.
नाट्यशास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २००च्या दरम्यान ह्याची निर्मिती झाल्याचे कळते.
भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात. भरत मुनींनी संस्कृतमध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागांत विभागणी केली आहे.
भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे. हे रस भारतीय नाट्याच्या आणि संगीताच्या व्याख्येस बळ देतात व त्यांवर त्यांचा प्रभाव आहे. भरत नाट्य या प्राचीन नृत्यप्रकाराचेही भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात विस्तृत वर्णन आहे.
"लोक- वृत्त-अनुकरणं नाट्यम्" "नाट्य म्हणजे अनुकरण" संदर्भ :- १.भरताचे नाट्यशास्त्र (इसवी सन पूर्व ४०० ते इसवी सन २००)
अमरकोष (पाचवे शतक) :- "तौर्य त्रिकं नृत्य-गीत-वाद्यं नाट्यम्"
संदर्भ :- "श्रीमदभरतमुनिप्रणीतम् नाट्यशास्त्रम्"- (संपादक - मधुसूदन शास्त्री भाग-१, पृष्ठ.१८).
This article uses material from the Wikipedia मराठी article नाट्य शास्त्र, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.