नवीन सदस्यांना मार्गदर्शन

मराठी विकिपीडिया वर आलेल्या सर्व नवीन सदस्यांचे आम्ही मराठी विकिपीडिया परिवारातर्फे सहर्ष स्वागत आहे.

आपण आपल्या नावाची "नवीन नोंदणी" (Sign In) केली असेलच. नसेल तर अवश्य करावी. आपल्याला लेख संपादन करण्यासाठी त्याची मदत होईल. त्यासाठी पानाच्या वरील उजव्या कोपऱ्यात "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" येथे क्लिक करून नवीन नोंदणी करावी. जर शक्य असेल तर आपला विपत्र पत्ता (Email Address) नोंदणी करताना दिलात तर आपला पत्ता कोणालाही कळू न देता इतर सदस्यांना आपल्याशी Email वर संपर्क साधता येऊ शकतो. पण हे करणे अनिवार्य नाही.

मराठी विकिपीडियावर कार्यरत होताना विकिपीडिया:धोरणांची व मार्गदर्शक तत्त्वांची सूची अवश्य वाचावी.

मराठी विकिपीडिया वर आपण काय काय करू शकतो?

  1. नवीन लेख तयार करणे.
  2. असलेल्या लेखांमध्ये भर घालणे आणि संदर्भ देऊन लिखाणाला बळकटी देणे.
  3. प्रकल्पासंदर्भात असलेली चित्रे स्वत: काढून / मिळवून (प्रताधिकारात न अडकता) विकिमीडिया कॉमन्स वर चढवणे आणि त्याची लिंक मुख्य लेखात देणे.
  4. इतर भाषांमधील लेखांची लिंक, आपआपल्या भाषेतील लेखांची लिंक इतर भाषांमधील लेखात देणे.
  5. सर्व लेखांना योग्य साचे, वर्ग आणि बाह्य दुवे देणे.
  6. असलेल्या लेखातील अशुद्ध लेखन दुरूस्ती करणे.
  7. इंग्रजी विकि मधील चांगले लेख मराठी विकिवर भाषांतरित करणे.
  8. माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देणे.
  9. मराठी विकिपीडिया प्रकल्प तयार करून त्या प्रकल्पाअंतर्गत नवीन लेख लिहिणे आणि असेलेले लेख परिपूर्ण करणे.
  10. सांगकामे (बॉट) म्हणजेच स्वयंचलित यंत्राद्वारे वारंवार करावी लागणारी संपादने करणारी यंत्रणा अधिक अद्ययावत करणे आणि संघटनेला बळकटी आणणे.

सहाय्य पाने

कुठून सुरुवात करू?

नवीन सदस्यांना नोंदणी केल्यावर पडलेला हा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे.

  • मराठी विकिपीडियाचे मुखपृष्ठ पाहिल्यास खालच्या बाजूला "संक्षिप्त सूची" दिलेली आहे. मराठी विकिपीडियामधील अत्यंत मोठ्या आणि मुख्य विभागांची नावे आणि उपविभाग, यांचे नामनिर्देश केले आहेत. आपल्या आवडीच्या विभागात जाऊन आपण त्यात भर घालू शकता तसेच नवीन लेख लिहू शकता.
  • मराठी विकिपीडियामध्ये डाव्या पट्टीमध्ये "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. तुम्ही या पानावर इतरांकडून होत असलेले बदल तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा आणि लेखाचे स्वतः संपादन करा.
  • मराठी विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
  • याशिवाय आपल्याला आवडीचा कोणताही विषय, लेख, व्यक्ती ह्यांची माहिती मराठी विकिपीडियावर शोधा आणि त्यात भर घालायला सुरुवात करा. उदा. आपला आवडता - लेखक, कवी, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, खेळाडू, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, शास्त्रीय गायक, व्यक्ती, राजकारणी, पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, पौराणिक व्यक्ती‎, कलावंत, वादक इत्यादी.
  • आपणास एखाद्या विषयाची भरपूर आणि सखोल माहिती असेल तर त्या विषयासंदर्भात अनेक लेखांवर आपण काम करू शकता. उदा. भूगोल या विषयासंदर्भात जसे गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश, पर्वत रांगा, नद्या, सागर, तलाव, मंदिरे अनेक लेख लिहिता येतील.
  • नवीन लेख लिहिताना शक्यतो त्या विषयाच्या जवळचा लेख मदतीसाठी घेऊन लेख लिहिला तर लेख लिहिणे, फुलविणे, योग्य साचे, वर्ग, चित्रे, संदर्भ देणे सोपे जाते.


आम्हाला आशा आहे की, या सर्व गोष्टींचा आपणास उपयोग होईल आणि आपणाकडून "मराठी विकिपीडिया" वर भरपूर काम होईल. या संदर्भात आपण लेखांच्या चर्चापानावर तसेच चावडीवर चर्चा करू शकता.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जुने भारतीय चलनवर्धा लोकसभा मतदारसंघनंदुरबार लोकसभा मतदारसंघबौद्ध धर्महनुमान जयंती२०१४ लोकसभा निवडणुकाहिंगोली जिल्हाअकोला लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणबेकारीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेसुतकअर्थसंकल्पअनिल देशमुखमहारहस्तकलाधर्मो रक्षति रक्षितःभाषा विकासहार्दिक पंड्यालोणार सरोवरसमाज माध्यमेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघटरबूजविशेषणजागतिक तापमानवाढबुद्धिबळकुंभ रासदौलताबादबंगालची फाळणी (१९०५)महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९इंदुरीकर महाराजमहाराष्ट्र पोलीसपानिपतची पहिली लढाईगुढीपाडवाउद्धव ठाकरेधाराशिव जिल्हाकृत्रिम बुद्धिमत्तानाटकउत्पादन (अर्थशास्त्र)भारतीय निवडणूक आयोगनरेंद्र मोदीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीजवाहरलाल नेहरूमूलद्रव्यहिंदू धर्मातील अंतिम विधीमंदीमाहिती अधिकारमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीकोकणमहाराष्ट्रातील स्थानिक शासनएकनाथमांगग्रंथालयपु.ल. देशपांडेअर्थशास्त्रजपानतमाशाराज ठाकरेसोनेनफाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसंयुक्त महाराष्ट्र चळवळपानिपतची तिसरी लढाईपळसअलिप्ततावादी चळवळसिंहगडकांजिण्याअंकिती बोसविदर्भमुंबईशिवाजी महाराजशाळादालचिनीपुरस्कारसकाळ (वृत्तपत्र)यकृतकळसूबाई शिखर🡆 More