गेम ऑफ थ्रोन्स

गेम ऑफ थ्रोन्स ही अमेरिकन लेखक जॉर्ज आर.आर.

मार्टिन">जॉर्ज आर.आर. मार्टिन यांच्या अ सॉंग ऑफ आइस ॲन्ड फायर या कादंबरी शृंखलेवर आधारित एक दूरचित्रवाणी मालिका आहे. डेव्हिड बेनिऑफ आणि डि. बी वाईस हे या मालिकेचे निर्माते आहेत. याचे चित्रीकरण बेलफास्ट येथील टायटॅनिक स्टुडिओज् येथे आणि उत्तर आयर्लंड, क्रोएशिया, आइसलॅंड, मोरोक्को, स्पेन, अमेरिका, माल्टा या इतर ठिकाणी झाले. या मालिकेच पहिला भाग अमेरिकेमध्ये एचबीओ या वाहिनीवर १७ एप्रिल २०११ रोजी प्रदर्शित करण्यात आला. १९ मे २०१९ रोजी या मालिकेच्या आठव्या सत्राचा (सीझन) शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

गेम ऑफ थ्रोन्स
गेम ऑफ थ्रोन्स
दूरचित्रवाहिनी एच.बी.ओ.
भाषा इंग्रजी
प्रकार
  • काल्पनिक गोष्ट
  • सिरियल ड्रामा
देश अमेरिका
निर्माता
  • डेव्हिड बेनिऑफ
  • डि. बी. वाईस
शीर्षकगीत/संगीत माहिती
थीम संगीत संगीतकार रामदिन जवादी
शीर्षकगीत रामदिन जवादी
प्रसारण माहिती
चित्रप्रकार 1080i (16:9 HDTV)
ध्वनिप्रकार डॉल्बी डिजिटल ५.१
पहिला भाग १७ एप्रिल, २०११
अंतिम भाग १९ मे २०१९
एकूण भाग ७३
वर्ष संख्या
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माता
  • डेव्हिड बेनिऑफ
  • डि. बी वाईस
  • कॅरोलिन स्ट्राउस
  • फ्रॅंक डोएल्गर
  • बर्नाडेट काउलफिल्ड
स्थळ
  • क्रोएशिया
  • आइसलॅंड
  • माल्टा
  • मोरोक्को
  • उत्तर आयर्लंड
  • स्कॉटलंड
  • स्पेन
  • अमेरिका
  • कॅनडा
कालावधी ५० - ६५ मिनिटे
बाह्य दुवे
[www.hbo.com/game-of-thrones संकेतस्थळ]

गेम ऑफ थ्रोन्स मालिकेने एचबीओ वाहिनीवर विक्रमी संख्येने दर्शकांना आकर्षित केले आहे आणि अपवादात्मकरित्या व्यापक आणि सक्रिय चाहता वर्ग मिळवला आहे. याला समीक्षकांकडून त्यातील अभिनय, जटिल पात्रे, कथा, व्याप्ती आणि उत्पादन मूल्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे. पण त्याचबरोबर यामधील नग्नता, हिंसा आणि लैंगिक हिंसा यांचा वारंवार केला जाणारा वापर यामुळे टीकासुद्धा होते. या मालिकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

कथानक

गेम ऑफ थ्रोन्सच्या कथेत वेस्टेरॉस ह्या काल्पनिक खंडातील ७ राज्यांची व शेजारच्या एसोस ह्या खंडाची गोष्ट आहे. मालिकेत ह्या ७ राज्यातील अनेक मोठ्या खानदानांच्या व सत्ताभिलाषांच्या अधिपत्त्यासाठी चाललेल्या लढाईची कथा आहे. 

कलाकार आणि पात्रे

प्रमुख पात्रे खालीलप्रमाणे:

१. ड्नेरियस टारगरियन 

२. जॉन स्नो (खरं नाव - एगन टारगरियन)

३. सरसी लॅनिस्टर 

४. टिरीयन लॅनिस्टर 

५. आर्या स्टार्क 

६. जेमी लॅनिस्टर 

७. सांसा स्टार्क 

८. नाईट किंग 

निर्मिती

मालिकेतील बहुतांश पात्रे इंग्रजी बोलतात. पण काही पात्रे व्हलेरियन आणि डोथ्राकी या काल्पनिक भाषा बोलतात. मूळ कादंबरीतील या भाषांतील काही शब्दांवरून निर्मात्यांनी भाषाशास्त्रज्ञ डेव्हिड पीटरसन यांना व्हलेरियन आणि डोथ्राकी या नवीन भाषा तयार करायला लावल्या.

स्वीकार आणि यश

गेम ऑफ थ्रोन्सचे चाहते या मालिकेची त्याच्या प्रदर्शनापूर्वी आतुरतेने वाट पाहात होते. तेव्हापासून याला मोठ्या प्रमाणात क्रिटिकल आणि व्यावसायिक यश मिळाले आहे. द गार्डियन वृत्तपत्रानुसार ही मालिका २०१४ पर्यंत दूरचित्रवाहिनीवरील "सर्वात भव्य मालिका" आणि "सर्वात चर्चिली जाणारी मालिका" बनली होती.

संदर्भ

Tags:

गेम ऑफ थ्रोन्स कथानकगेम ऑफ थ्रोन्स कलाकार आणि पात्रेगेम ऑफ थ्रोन्स निर्मितीगेम ऑफ थ्रोन्स स्वीकार आणि यशगेम ऑफ थ्रोन्स संदर्भगेम ऑफ थ्रोन्सआइसलँडउत्तर आयर्लंडएचबीओजॉर्ज आर.आर. मार्टिनबेलफास्टस्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नीती आयोगराहुल कुलअकोलासारं काही तिच्यासाठीविनयभंगचिन्मयी सुमीतनांदेड जिल्हारविकांत तुपकरकविताराजगडभिवंडी लोकसभा मतदारसंघआर्थिक विकासबास्केटबॉलइंदिरा गांधीओशोसतरावी लोकसभारमाबाई आंबेडकरज्ञानेश्वरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीपुणे लोकसभा मतदारसंघभगतसिंगज्योतिबा मंदिरदलित एकांकिकाधर्मो रक्षति रक्षितःभारताचा स्वातंत्र्यलढाकृष्णा नदीव्यवस्थापनभारतीय रेल्वेवाघअहिल्याबाई होळकरमहाभारतअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघसूर्यअष्टांग योगशांता शेळकेलातूर जिल्हाकाळभैरवअशोक चव्हाणक्लिओपात्रारक्षा खडसेनिवडणूकछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसतुझेच मी गीत गात आहेकालिदासबिरजू महाराजरेणुकाअहवाल लेखनशेतकरी कामगार पक्षमाळीनाणेफुटबॉलभरती व ओहोटीभारताच्या अधिकृत भाषांची यादीरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबडनेरा विधानसभा मतदारसंघयोनीसावित्रीबाई फुलेकरमराठी संतकुंभ रासमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारत२०२४ लोकसभा निवडणुकासमुपदेशनखासदारमराठीतील बोलीभाषापिंपळकुपोषणबावीस प्रतिज्ञासुजात आंबेडकरबुलढाणा लोकसभा मतदारसंघविरामचिन्हेभारतीय संसदसमाज माध्यमेजास्वंदभारतरत्‍नयोगप्रकाश आंबेडकर🡆 More