मे ७: दिनांक

मे ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२७ वा किंवा लीप वर्षात १२८ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

एकोणिसावे शतक

  • १८४९: स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ’कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ’बेथुन कॉलेज’ मध्ये रूपांतर झाले आहे.
  • १८७८ : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन (आताचे साहित्य संमेलन) भरविण्यात आले
  • १८९५ : अलेक्झांडर पोपॉफने प्राथमिक रेडिओ रिसीव्हर वापरून रेडिओ संदेशवहनाचा प्रयोग यशस्वी केला
  • १८९९ : रॅंड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी

विसावे शतक

  • १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
  • १९४५ : जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त - युरोप विजय दिन
  • १९४६: सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली.
  • १९५२ : जेफ्री डमर याने आधुनिक संगणनाचा आधार असलेल्या 'इंटिग्रेटेड सर्किट्स'ची संकल्पना प्रकाशित केली
  • १९५४ - १९५५पासून सर्व विषयांसाठी मराठी माध्यम आणण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या विधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला
  • १९५५: एर इंडियाची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली.
  • १९७३ : अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरचा पायाभरणी समारंभ
  • १९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
  • १९७८ : एव्हरेस्टची पहिली ऑक्सिजनरहित मोहीम यशस्वी
  • १९८० : जागतिक आरोग्य संघटनेने देवी रोगाचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले
  • १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
  • १९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
  • १९९४ : नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी
  • १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर ही कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.

एकविसावे शतक

जन्म

  • १९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन लँड
  • १९१२: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल
  • १९४८: मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर

मृत्यू

  • १९२४: आदिवासींना जंगलात जाण्याचा हक्क मिळण्यासाठी लढणारा क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू
  • १९८६- समाजसुधारक शिवाजीराव पटवर्धन
  • १९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाळ नरहर नातू यांचे पुणे येथे निधन.
  • १९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर
  • २००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर
  • २००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन
  • २००२ - दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
  • २०२० - मालविका मराठे, (१९९१-२००१ या काळातल्या त्या दूरदर्शन या दूरचित्रवाणी प्रसारक संस्था-सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका.)

प्रतिवार्षिक पालन

  • रेडियो दिन - रशिया.
  • जागतिक अस्थमा दिन
  • एड्समुळे अनाथ झालेल्यांचा जागतिक दिवस

बाह्य दुवे




मे ५ - मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - (मे महिना)

Tags:

मे ७ ठळक घटना आणि घडामोडीमे ७ जन्ममे ७ मृत्यूमे ७ प्रतिवार्षिक पालनमे ७ बाह्य दुवेमे ७ग्रेगरी दिनदर्शिकालीप वर्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हार्दिक पंड्याहवामानसयाजीराव गायकवाड तृतीयरस (सौंदर्यशास्त्र)वायू प्रदूषणमहाभारतइन्स्टाग्रामहोमी भाभाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीउद्धव ठाकरेफणसनीती आयोगधनंजय चंद्रचूडभारतीय जनता पक्षमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाजीभइतिहाससुधा मूर्तीपानिपतची पहिली लढाईमहाराष्ट्रामधील जिल्हेसिंहगडशिरूर लोकसभा मतदारसंघसोलापूर लोकसभा मतदारसंघअर्जुन पुरस्कारप्रतापगडसिन्नर विधानसभा मतदारसंघभारतीय प्रजासत्ताक दिनमहाड सत्याग्रहराष्ट्रीय शौर्य पुरस्कारनैसर्गिक पर्यावरणलसीकरणनाशिकजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेईस्टरकानिफनाथ समाधी स्थळ मढीविजय शिवतारेशिव जयंतीतुकडोजी महाराजसोलापूर जिल्हाभारतातील शासकीय योजनांची यादीविनायक दामोदर सावरकरसौर ऊर्जासह्याद्रीसंग्रहालयअकोला लोकसभा मतदारसंघजागतिकीकरणन्यूझ१८ लोकमतलिंबूआणीबाणी (भारत)महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाचोखामेळाभाषालंकारनरेंद्र मोदीसंगणक विज्ञानवातावरणझाडसम्राट हर्षवर्धनसकाळ (वृत्तपत्र)भाडळीलोकसभावृषभ रासभारताचे सर्वोच्च न्यायालयहरभरासोयाबीनऊसऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमूलद्रव्यराम गणेश गडकरीपुणे करारभारताचा ध्वजमुखपृष्ठसमर्थ रामदास स्वामीशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची हास्यजत्रानामदेव🡆 More