भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड

भारतरत्न डॉ.

बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक किंवा क्रांतिभूमी हे महाराष्ट्रातील महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक राष्ट्रीय स्मारक आहे. आंबेडकरांनी १९२७ साली महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन केले होते. या दोन ऐतिहासिक घटनांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने चवदार तळे सौंदर्यीकरण आणि २००४ साली या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली. सध्या हे स्मारक समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) त्याची देखरेख करते. या स्मारकाची वास्तू व इतर घटक सध्या बिकट अवस्थेत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
सर्वसाधारण माहिती
प्रकार राष्ट्रीय स्मारक, संग्रहालय
ठिकाण महाड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
बांधकाम सुरुवात १४ एप्रिल १९९८
पूर्ण १० ऑगस्ट २००४
मूल्य २२ कोटी रुपये
क्षेत्रफळ १०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक
बांधकाम
मालकी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)

इतिहास

आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून केले होते. त्यानंतर २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले. या दोन घटना समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्या आणि त्यामुळे समाज जागृत झाला होता.

युती सरकारच्या काळात १४ एप्रिल १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते स्मारकाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन १० ऑगस्ट २००४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

रचना

सुमारे १०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर इमारतीच्या बांधकाम झाले आहे. स्मारकामध्ये भव्य असे वातानुकूलित प्रेक्षागृह, संग्रहालय व वाचनालय, तरणतलाव व ड्रेसिंग रूम, बहुउद्देशीय सभागृह (१०४६ आसन व्यवस्था) व उपाहारगृह इत्यादी विविध दालने आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती ब्रॉंझचा पुतळा व अंतर्गत रस्ते डांबरीकरण, प्रेक्षागृहांतील फर्निचर, पाणीपुरवठा व जलनिःसारण, विद्युतीकरण, पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन यांचे काम करण्यात आले. या कामाला सुमारे २२ कोटी रुपये खर्च लागला.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड इतिहासभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड रचनाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड हे सुद्धा पहाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड संदर्भभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाडचवदार तळेचवदार तळ्याचा सत्याग्रहडॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थामनुस्मृती दहन दिनमहाडसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सम्राट हर्षवर्धनसईबाई भोसलेधुळे लोकसभा मतदारसंघसयाजीराव गायकवाड तृतीयगणपती स्तोत्रेनांदेड लोकसभा मतदारसंघहरितगृहस्मृती मंधानासंत तुकारामसोलापूर लोकसभा मतदारसंघपंचांगगिटारकथकधूलिवंदनपु.ल. देशपांडेकादंबरीवाघजायकवाडी धरणन्यूटनचे गतीचे नियमरविदासगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघशीत युद्धपुन्हा कर्तव्य आहेमानवी हक्कपानिपतची पहिली लढाईशेतकरी कामगार पक्षजलप्रदूषणअर्जुन पुरस्कारशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकशाश्वत विकाससर्वनामसकाळ (वृत्तपत्र)कमळखेळकुणबीबँकपोवाडासिंहसंभाजी भोसलेजया किशोरीचेतासंस्थाऊससामाजिक समूहहनुमान चालीसाप्राणायामशुभेच्छानातीमाती प्रदूषणपक्ष्यांचे स्थलांतरस्त्री नाटककारमहाराष्ट्र विधान परिषदचिमणीनितीन गडकरीमाधवराव पेशवेवर्धा लोकसभा मतदारसंघसत्यशोधक समाजभरती व ओहोटीसेंद्रिय शेतीअश्वगंधाजागतिकीकरणसह्याद्रीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीयेशू ख्रिस्तमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीचेन्नई सुपर किंग्सनदीचाफाजिजाबाई शहाजी भोसलेए.पी.जे. अब्दुल कलामअतिसारमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीहोमी भाभाशिवाजी अढळराव पाटीलपुरंदर किल्लाबचत गटरक्षा खडसेताज महालअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९🡆 More