नर्मदा नदी: भारतातील एक नदी

नर्मदा नदी (Nerbada) ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे.

ही नदी भारताच्या मध्य प्रदेश (१०७८ कि.मी), महाराष्ट्र (54 कि.मी), गुजरात (१६० कि.मी.) या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. (इतर पश्चिम वाहिनी मोठ्या नद्या : तापी व मही).

नर्मदा
नर्मदा नदी: उगम, मार्गक्रमण व मुख, खोरे, उपनद्या
जबलपूर, मध्य प्रदेश येथील नर्मदेकाठचा 'झाशी घाट'
उगम अमरकंटक
मुख अरबी समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत (मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात)
लांबी १,३१२ किमी (८१५ मैल)
उगम स्थान उंची ९०० मी (३,००० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १,००,०००
धरणे सरदार सरोवर धरण(केवडिया कॉलोनी)

अगस्ती ऋषींनी काशी सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर नर्मदा नदी ओलांडून ते दक्षिणेतच स्थायिक झाले. नर्मदा ओलांडणारे व आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते.

उगम, मार्गक्रमण व मुख

उगम

नर्मदा नदी: उगम, मार्गक्रमण व मुख, खोरे, उपनद्या 
अमरकंटक येथील नर्मदाकुंड

अमरकंटक (शाडोल जिल्हा, मध्य प्रदेश ) येथील नर्मदाकुंडातून. मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगांच्या पूर्वेकडील ठिकाणी असलेल्या अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून नर्मदा नदी उगम पावते. नदी सोनारामडपासून पश्चिमेकडे वाहते, खडकावरून खाली वाहते आणि कपिलधारा नावाचा धबधबा बनवते. वळणदार मार्गाने आणि जोरदार वेगाने घनदाट जंगल आणि खडकांना ओलांडून रामनगरच्या जीर्ण राजवाड्यात पोहोचते. दक्षिण-पूर्वेस, रामनगर आणि मंडला (२५ कि.मी. (१५.५ मैल ) दरम्यान, येथील जलमार्ग तुलनेने खडकाळ असून, सरळ व खोल पाण्यात अडथळ्यांपासून मुक्त आहे. बंजर नदी डावीकडून येऊन मिळते. ही नदी वायव्येकडील अरुंद वळणावर जबलपूरपर्यंत पोहोचते. शहराजवळील नदी भेडाघाटाजवळ सुमारे ९ मीटर धबधब्याचे रूप धारण करते, हे धुवाधार म्हणून प्रसिद्ध आहे, पुढे एक खोल अरुंद जलवाहिनीद्वारे सुमारे ३ कि.मी.पर्यंत मॅग्नेशियम चुनखडी व बेसाल्ट खडकांद्वारे संगमरवरी खडक म्हणून ओळखले जाते. येथे नंदीची रुंदी ८० मीटर वरून केवळ १८ मीटर आहे. या प्रदेशापासून अरबी समुद्राच्या मिलनापर्यंत, नर्मदा उत्तरेकडील विंध्यान पर्वत व दक्षिणेस सतपुरा श्रेणी दरम्यान तीन अरुंद खोऱ्यांमध्ये प्रवेश करते. दरीचा दक्षिणेकडील विस्तार बहुतेक ठिकाणी पसरलेला आहे. संगमरवरी खडकांमधून उगम पावत नदी नर्मदाघाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीतील सुपीक प्रदेशात प्रवेश करते. हे क्षेत्र अंदाजे ३२० किमी (१९९ मैल)पर्यंत पसरलेले आहे, येथे दक्षिणेकडील या भागाची सरासरी रुंदी ३५ किमी (२२ मैल) आहे. उत्तरेकडील भाग, बरना-बरेली खोऱ्यातच मर्यादित आहे. हा भाग हुशंगाबादच्या बरखरा टेकड्यांनंतर संपतो. तथापि, कन्नोडच्या मैदानावरून ती पुन्हा डोंगरांकडे वळते. हे नर्मदाच्या पहिल्या खोऱ्यात आहे. तिथे दक्षिणेकडील बऱ्याच उपनद्या तिच्यामध्ये सामील होतात आणि सातपुडा टेकड्यांच्या उत्तरेकडील उतारातून पाणी आणतात. या उपनद्यांमध्ये शेर, साखर, दुधी, तवा (सर्वात मोठी उपनदी) आणि गंजल, साहिल याचा समावेश होतो. हिरन, बार्णा, कोरल, करम आणि लोहार यासारख्या महत्त्वाच्या उपनद्याही उत्तरेकडून सामील झाल्या आहेत.

नर्मदा नदी ही उत्तरी भारत आणि दक्षिण भारत यांच्यामधली सीमाारेषा आहे. भारतातील नद्यांपैकी फक्त नर्मदेची परिक्रमा करण्यात येते.

नर्मदा नदीच्या काठी मार्कंडेय, कपिल, भृगू, व्यास, च्यवन ऋषी, जमदग्नी ऋषी, अगस्ती ऋषी, दुर्वास ऋषी, वशिष्ठ, कृतू, अत्री, मरिची, गौतम, गर्ग, चरक, शौनक यांसाख्या अनेक ऋषींनी तप केल्याचे सांगितले जाते. यांपैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केली.

मुख

नर्मदा गुजरातच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरील भरूच शहराजवळ खंभायतच्या आखातास मिळते.

खोरे

नर्मदेचे खोरे विंध्यसातपुडा पर्वतरांगांमध्ये (७२°३२' ते ८१°३५' पूर्व रेखांश व २१°२०' ते २३°४५' उत्तर अक्षांश) पसरले असून एकूण पाणलोट क्षेत्रफळ ९८७९६ चौरस कि.मी. आहे. यातील ८६% भूभाग मध्य प्रदेशात असून १२% गुजरात व अगदी थोडा (२%) महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहे. नर्मदेला तब्बल ४१ उपनद्या येऊन मिळतात. त्यातल्या २२ उपनद्या सातपुड्यातून तर उर्वरित विंध्य पर्वतातून वाहणाऱ्या आहेत.

नर्मदेचे खोऱ्याचे ढोबळ मानाने पाच भाग पडतात.

  1. वरच्या बाजूचे (उगमाजवळील) डोंगराळ प्रदेश (शाहडोल, मंडला, दुर्ग, बालाघाट आणि शिवनी)
  2. वरच्या बाजूचे मैदानी प्रदेश(जबलपूर, नरसिंगपूर, सागर, दामोह, छिंदवाडा, हुशंगाबाद, बैतूल, रायसेनसिहोर)
  3. मधले पठार (खांडवा, देवास, इंदूरधार )
  4. खालच्या बाजूचे (मुखाकडील) डोंगराळ प्रदेश (खरगोन, झाबुआ, नंदुरबार, बडोदा)
  5. खालच्या बाजूचे मैदानी प्रदेश (नर्मदा जिल्हा, भरूच जिल्हा)

उपनद्या

सातपुडा

  • गंजल
  • तवा (नर्मदेची सर्वांत मोठी उपनदी)
  • दुधी
  • शक्कर
  • शेर


विंध्य

  • करम
  • बारना
  • लोहार
  • हिरण

पर्यावरण

वनसंपदा

भूविज्ञान

नर्मदेचे खोरे भूदोषामुळे (पृथ्वीचे भूकवच प्रसारण पावताना तयार झालेला चर) तयार झाले आहे.

सातपुड्याचा उत्तरेकडील उतार व विंध्य पर्वताचा दक्षिणेकडील उतार यांनी नर्मदेचे पाणलोट क्षेत्र तयार झाले आहे. विंध्य पर्वताचे पठार मात्र उत्तर दिशेला झुकलेले असल्याने तेथील पाणी गंगा किंवा यमुना या नद्यांना जाते.

जीवाश्म विज्ञानाच्या दृष्टीने नर्मदेचे खोरे अत्यंत महत्त्वाचे आहे. नर्मदेच्या खोऱ्यात अनेकदा डायनासोरचे जीवाश्म आढळून आले आहेत. (उदा. Titanosaurus indicus आणि Rajasaurus narmadensis.)

मानववंशशास्त्रदृष्ट्या महत्त्व

नर्मदा नदीच्या प्रदेशात असलेले भीमबेटका येथील पूर्वैतिहासिक गुंफाचित्रे आणि मानवी निवासस्थाने (इ.पू. १५०००) संयुक्त राष्ट्र संघटनेने 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली आहेत.

धरण व कालवे

धबधबा- नर्मदा नदीवर जबलपूर येथे धुवांधार नावाचा धबधबा आहे.

धार्मिक महत्त्व

नर्मदा नदी: उगम, मार्गक्रमण व मुख, खोरे, उपनद्या 
ओंकारेश्वर
  • नर्मदेकाठची मंदिरे (उगमापासून ते मुखापर्यंत, क्रमाने) खालीलप्रमाणे:
  1. अमरकंटक
  2. शुक्लतीर्थ
  3. ओंकारेश्वर
  4. महेश्वर
  5. सिद्धेश्वर
  6. चौसष्ट योगिनींचे मंदिर
  7. चोवीस अवतारांचे मंदिर
  8. भोजपूरचे शिवमंदिर
  9. भृगु ऋषीचे मंदिर
  • 'नार्मदीय ब्राह्मण' समाज नर्मदेला आपली कुलस्वामिनी मानतो.

==पर्यटन==Narmada bachao anndolan nishkarsh

नर्मदेकाठची महत्त्वाची शहरे

मध्य प्रदेश

   महाराष्ट्र 
  • ((नंदुरबार)),

गुजरात

हे सुद्धा पहा

संदर्भ

भारतातील त्रिभुज प्रदेश निर्माण न होणारी नदी

Tags:

नर्मदा नदी उगम, मार्गक्रमण व मुखनर्मदा नदी खोरेनर्मदा नदी उपनद्यानर्मदा नदी पर्यावरणनर्मदा नदी धरण व कालवेनर्मदा नदी धार्मिक महत्त्वनर्मदा नदी नर्मदेकाठची महत्त्वाची शहरेनर्मदा नदी हे सुद्धा पहानर्मदा नदी संदर्भनर्मदा नदीगुजराततापीभारतमध्य प्रदेशमहाराष्ट्ररेवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुंबई उच्च न्यायालयनिलगिरी (वनस्पती)धर्मो रक्षति रक्षितःमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसयेसूबाई भोसलेगणपती स्तोत्रेसर्वनामअडुळसाचोखामेळारतिचित्रणभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळश्रीनिवास रामानुजनशेळी पालनऑलिंपिक खेळात भारतसायली संजीवईशान्य दिशादादाभाई नौरोजीकीर्तनदहशतवादजागतिक बँकअर्थसंकल्पजलप्रदूषणअर्थशास्त्रदादाजी भुसेविठ्ठल रामजी शिंदेरामनवमीसंपत्ती (वाणिज्य)चंद्रपूरम्हैसभारताचा ध्वजद्राक्षगणेश चतुर्थीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकोरोनाव्हायरस रोग २०१९सूर्यमालाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभारतीय संसदरेबीजआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकघनकचराबाळाजी विश्वनाथमदर तेरेसावातावरणाची रचनारोहित (पक्षी)पर्यावरणशास्त्रसातारा जिल्हाइ.स. ४४६मीरा-भाईंदरतुर्कस्तानअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहेंद्रसिंह धोनीसमासऋग्वेदकुक्कुट पालननाटोदिशाप्रकाश आंबेडकरलोकसभेचा अध्यक्षस्वामी समर्थलावणीरमाबाई रानडेसती (प्रथा)संगणक विज्ञानतणावसाडेतीन शुभ मुहूर्तभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताची राज्ये आणि प्रदेशऊसजैन धर्मनरेंद्र मोदीराज ठाकरेभारतातील जिल्ह्यांची यादीबहिणाबाई चौधरीसंयुक्त महाराष्ट्र चळवळस्वरघारापुरी लेणीदुष्काळभारतीय नियोजन आयोग🡆 More