राशीमेघ

इंग्रजी नाव - Cumulus Cloud

राशीमेघ
पुणे येथून १३ मार्च २०१९ रोजी दिसलेले राशिमेघ
राशीमेघ
राशीमेघांमुळे दिसलेला छाया प्रकाशाचा खेळ

इंग्रजी खूण - Cu

मेघतळ पातळी निम्न

भृपृष्ठ ते २००० मीटर

आढळ सर्व जगभर पण दमट हवामानात जास्त प्रमाणात.
काळ संपूर्ण वर्षभर पण उन्हाळ्यात आढळ जास्त

निम्न पातळीवर आढळणारे हे राशीमेघ जलबिंदू किंवा अतिशीत जलबिंदू किंवा हिमकणांचे  किंवा ह्या सर्वांच्या मिश्रणाचे बनलेले आढळून येतात. ह्यांचा आकार कापसाच्या राशी एकमेकावर ठेवल्याप्रमाणे असून ढगांच्या कडा स्पष्ट ओळखू येतात. ढगांचा तळ एकाच क्षितिजसमांतर पातळीत आढळून येतो. शिखराचा भाग घुमट किंवा मनोऱ्याप्रमाणे दिसतो पण ढग फार उंच वाढल्यास वरच्या भागाचे फुलकोबीशी साम्य वाटू शकते. विमानातून पाहताना वरून सूर्यप्रकाशात नाहून निघालेले खाली पसरलेले  हे ढग पांढरेशुभ्र दिसतात. मात्र जमिनीवरून पहिले असताना डोक्यावर आलेल्या ह्या ढगांचा तळ काळसर दिसतो व कडा रंगीत दिसतात. राशीमेघ हे एकएकटे, एका पाठोपाठ रांगेत किंवा मोठ्या समूहात आढळू शकतात.

राशीमेघ हे आर्द्र हवेत ऊर्ध्वगामी वातप्रवाहामुळे निर्माण होतात.

राशीमेघ हे चांगल्या हवेचे निदर्शक मानले जातात. त्यातून वृष्टी सहसा होत नाही पण त्यांचे रूपांतर इतर प्रकारच्या ढगात होऊन उदा. वर्षास्तरी किंवा गर्जन्मेघ,  नंतर वृष्टी होऊ शकते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाचणीराष्ट्रकुल खेळगिटारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनयोगासननरेंद्र मोदीगणपतीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकव्यवस्थापनअजिंठा लेणीसृष्टी देशमुखपुंगीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)छावा (कादंबरी)राशीकालिदासमध्यान्ह भोजन योजनाचंद्रगुप्त मौर्यबलुतेदारव्यापार चक्रराज ठाकरेवर्तुळजीवनसत्त्वजवाहरलाल नेहरूध्यानचंद सिंगमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळसह्याद्रीस्वामी विवेकानंदगोवाकटक मंडळपु.ल. देशपांडेदादासाहेब फाळके पुरस्कारहरितगृहदहशतवाद विरोधी पथकजपानभारत सरकार कायदा १९३५पेशवेभालचंद्र वनाजी नेमाडेवस्तू व सेवा कर (भारत)भीमाशंकरनिलगिरी (वनस्पती)मुंबई–नागपूर द्रुतगती मार्गगोत्रसंख्यारतिचित्रणहिमालयइंग्लंड क्रिकेट संघहिमोग्लोबिनईमेलखान अब्दुल गफारखानप्रदूषणभारताचा भूगोलमधुमेहपृथ्वीचे वातावरणबृहन्मुंबई महानगरपालिकाजवाहरलाल नेहरू बंदरतबलाअभंगवल्लभभाई पटेलकोकण रेल्वेआफ्रिकाहळदी कुंकूसावित्रीबाई फुलेरत्‍नागिरी जिल्हातारामासाप्रेरणाराजा राममोहन रॉयचार्ल्स डार्विनघोणसमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पकमळरुईमलेरियामेळघाट व्याघ्र प्रकल्पमुख्यमंत्रीहनुमान चालीसाप्रतिभा पाटीलप्रल्हाद केशव अत्रेमहाराष्ट्र भूषण पुरस्कार🡆 More