हळदी कुंकू

हळदी-कुंकू ही हिंदू महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे.

हळदी कुंकू
हळदी कुंकू

स्वरूप

सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात. (आधुनिक काळात विधवा महिलांना यामध्ये सहभागी करून घेण्याचे प्रमाणही दिसून येते.)यामध्ये एक महिला आपल्या घरी हळदी कुंकू समारंभ आयोजित करते आणि त्याला अन्य महिलांना बोलावते. यामध्ये विशिष्ट पूजा, सण यानिमित्ताने महिलांना आमंत्रित करून त्यांना कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते.पान-सुपारी दिली जाते.अत्तर लावले जाते,अंगावर गुलाबपाणी शिंपडले जाते. काही प्रसंगी ओटीही भरली जाते.

हळदी कुंकू केले जाणारे सण

  • चैत्रगौरी- चैत्र महिन्यात चैत्र गौरीचे हळदीकुंकू केले जाते. यावेळी आलेल्या महिला आणि मुलींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे दिले जाते. ओल्या हरभरा-याने ओटी भरली जाते. मोगरा फुले किंवा त्याचे गजरे दिले जातात.
  • वटपौर्णिमा- या दिवशी वडाच्या झाडापाशी महिला एकत्र येऊन वडाची पूजा करतात. एकमेकींना हळदी- कुंकू लावून फणसाचे गरे,फळ देतात.
  • श्रावण महिना- श्रावण महिन्यात महिला नागपंचमी, मंगळागौरी सत्यनारायण पूजा या निमित्ताने एकत्र येऊन पूजा करतात व या प्रसंगीही एकमेकींना हळदी कुंकू दिले जाते.
  • भाद्रपद महिना- भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजा, गणपती आणि विशेषतः ज्येष्ठ गौरी पूजनाच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात.
  • शारदीय नवरात्र- शारदीय नवरात्रात महिला एकमेकींना घरी बोलावून श्रीसूक्त पाठ करतात, अष्टमीच्या दिवशी देवीचे पूजन करतात. ललिता पंचमीला कुमारिका पूजन करतात. या विशेष दिवसात हळदी कुंकू केले जाते. *
  • कोजागिरी पौर्णिमा या पूजेमध्ये केले जाणारे लक्ष्मीपूजन, दिवाळी लक्ष्मीपूजन, मार्गशीर्ष गुरुवार व्रत अशा प्रसंगीही हळदी कुंकू केले जाते.
  • मकरसंक्रांत- या दिवशी महिला एकमेकींना वाण देतात, ते धान्याचे, वस्तूचे असते. रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू केले जाते. नववधूचे तिळवण आणि लहान बाळाचे बोरन्हाण यानिमित्त ही हळदी कुंकू आवर्जून केले जाते.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

हळदी कुंकू स्वरूपहळदी कुंकू केले जाणारे सणहळदी कुंकू चित्रदालनहळदी कुंकू संदर्भहळदी कुंकू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अकोला लोकसभा मतदारसंघविवाहयशस्वी जयस्वालवडमुरूड-जंजिराव्हॉट्सॲपरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघचैत्र पौर्णिमाशनिवार वाडाविंचूआंबेडकर जयंतीआलेखाचे प्रकारनितीन गडकरीआयतराज ठाकरेभारत छोडो आंदोलनहिंदू लग्नपाणीमेष रासलातूर लोकसभा मतदारसंघलोकमतगुप्त साम्राज्यकिशोरवयमराठी व्याकरणमटकाशिवनेरीभीमा नदीसदा सर्वदा योग तुझा घडावागणपतीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकनागपूर लोकसभा मतदारसंघपसायदानमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीअन्नप्राशनस्वामी विवेकानंदहिंदू धर्मताम्हणभारतातील सण व उत्सवडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनवंजारीक्रांतिकारकजालना लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यशुभेच्छाअसहकार आंदोलनलोकसभासाम्राज्यवादमौद्रिक अर्थशास्त्रभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहादेव जानकरअलिप्ततावादी चळवळबच्चू कडूयकृतआरोग्यत्रिरत्न वंदनायूट्यूबदीनानाथ मंगेशकरवचनचिठ्ठीमानवी विकास निर्देशांकआवळापुणे लोकसभा मतदारसंघमासिक पाळीअशोक चव्हाणबाळूमामाच्या नावानं चांगभलंकुटुंबसप्तशृंगी देवीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीपुस्तकव्यवस्थापनशिवाजी महाराजराखीव मतदारसंघभारतीय संस्कृतीछगन भुजबळपोलीस पाटीलसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाअभिव्यक्ती🡆 More