म्युच्युअल फंड (इंग्रजी: Mutual Fund; मराठी: सामाईक निधी) हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे.
गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतात.समभाग (Equity Shares) निगडित म्युच्युअल फंड योजना मध्ये शेअर बाजाराची आणि कंपनीच्या व्यवसायाची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे (Bonds) निगडीत योजना मध्ये व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची/ दीवाळखोरीची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते.
भारतीय भांडवल बाजारात अनेक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आपापले म्युच्युअल फंड चालवत आहेत. सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसते अशा सामान्य गुंतवणूक धारकासाठी गुंतवणुकीचा हा पर्याय स्वागतार्ह आहे. गुंतवलेल्या पैशावर म्युच्युअल फंड काही एन्ट्री लोड या नावाने काही प्रारंभिक शुल्क वसूल करतात. उरलेली रक्कम गुंतवली जाते व या रकमेच्या किमती इतके फंड युनिट ग्राहकाच्या नावाने दिले जातात. जमा झालेली एकूण रक्कम फंड व्यवस्थापक शेअर बाजारात फंडाच्या उद्दिष्टाप्रमाणे गुंतवतो. या गुंतवणुकीची किंमत जशी वाढते तशी फंडाच्या एका युनिटची किंमत वाढत जाते. जर गुंतवणूक केलेल्या शेअरची किंमत कमी झाली तर फंडाच्या युनिटची किंमतही कमी होते.
१८व्या शतकात अब्राहम (कींवा आड्रिआन) व्हॅन् केटविक या डच व्यापाऱ्याने "ईनद्राख्त माक्त माख्त" (एकी बळ निर्माण करते) या नावाची एक विश्वस्त संस्था काढली. या संस्थेच्या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांना विविध धंद्यांमध्ये भांडवल गुंतवता येत होते. हीच आजच्या म्युच्युअल फंडांची सुरुवात मानली जाते.
१९६३ साली भारत सरकार आणि भारतीय रिझर्व बँक यांनी एकत्र येऊन "युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया"ची स्थापना केली. हा भारतातील पहिला म्युच्युअल फंड होता. १९८७ साली भारतीय आयुर्विमा महामंडळ तसेच अन्य सार्वजनिक बँकांनी म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश केला. १९९३ साली म्युच्युअल फंडांसाठीचे नियम बनवण्यात आले आणि खाजगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात आली. म्युच्युअल फंडांचा प्रसार व्हावा, तसेच त्यातील गुंतवणूकदारांचे हित जपले जावे यासाठी सर्व नोंदणीकृत म्युच्युअल फंडांनी एकत्र येऊन २२ ऑगस्ट १९९५ साली ॲंम्फी (The Association of Mutual Funds in India) या संस्थेची स्थापना केली.
एप्रिल २०१८ अखेर भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले भांडवल २३,२९,७८२ कोटी रुपये इतके होते.
गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे पुढीलप्रमाणे
म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण दोन प्रकारे करता येते.
This article uses material from the Wikipedia मराठी article म्युच्युअल फंड, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.