महाबळेश्वर: महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात.

ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.

  ?महाबळेश्वर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाबळेश्वर: भौगोलिक परिस्थिती आणि हवामान, पर्यटन विषयाचे महत्त्व, इतिहास

१७° ५५′ ३०″ N, ७३° ३९′ २७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,४३८ मी
जिल्हा सातारा
तालुका/के महाबळेश्वर
लोकसंख्या १२,७८० (२००१)

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती, याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५, स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे शिरगणतीनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे. येथे मराठी, हिंदी या भाषा बोलल्या जातात. पुरुष / स्त्री प्रमाण १०/९ असे आहे. येथील साक्षरता प्रमाण ७८% आहे. ६ वर्षाखालील मुलाची ११% लोकसंख्या आहे.

भौगोलिक परिस्थिती आणि हवामान

महाबळेश्वर शहर १७.९२३७ उत्तर अक्षांश आणि ७३.६५८६ पूर्व रेखांश वर वसलेले आहे. याची सरासरी उंची १३५३ मीटर(४४३९फुट) आहे. हे पुणे शहराच्या पश्चिम दक्षिण बाजूस १२० किमी.आणि मुंबई पासून २८५ किमी अंतरावर आहे. हे १५० वर्ग किमी क्षेत्रफळ असणारे विशाल असे पठार आहे आणि त्याच्या सर्व बाजूंनी खोल दऱ्या आहेत. याचे समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाण १४३९मी.आहे जे विल्सन / सनराईज पॉइंट म्हणून ओळखले जाते.मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोलचा भाग, अशा तीन खेडेगावांचे मिळून हे शहर निर्माण झालेले आहे.

कृष्णा नदीचा उगम येथे झालेला आहे की जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. जुन्या महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळील 'गो'मुखातून या नदीचा उगम झाला अशी दंतकथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की. शिवाय हिच्या वेण्णा आणि कोयना या उपनद्या म्हणजे शिव आणि ब्रम्हा आहेत असे म्हटले जाते. कृष्णा नदीशिवाय आणखी ४ नद्या त्याच 'गो'मुखातून उगम पावलेल्या आहेत पण त्या कृष्णा नदीला मिळण्याअगोदर कांही अंतरावरून वाहातात. त्या म्हणजे कोयना, वेण्णा, सावित्री, आणि गायत्री या नद्या आहेत.

महाबळेश्वरचे हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य आहे.त्यामुळे या भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भारत देशाचे एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी ८५% स्ट्रॉबेरी उत्पादन येथे होते. महाबळेश्वर हे अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ आहे.

पर्यटन विषयाचे महत्त्व

हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.येथील महाबळेश्वराचे महादेवाचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.

महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडविक पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्रीगोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे.हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. 'सावित्री' ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळते.

पर्यटकासाठी येथे जुन्या महाबळेश्वर पासून ७ किमी अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत शिवाय ५ मंदिरे आहेत की जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात. येथे नैसर्गिकरित्या तयार झालेली दर्शनीय ठिकाणे आहेत. ब्रिटिश राजवटीत कांही ब्रिटिश येथे विश्रांतीसाठी येत त्यावेळी त्यांनी कांही ठिकाणांना नावे दिलेली आहेत.पाच नदीचे उगम स्थान म्हणून ओळखले जाते.

महाबळेश्वर बाजारपेठ

महाबळेश्वर बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चमड्याचे पट्टे,चमड्याची पाकीटे इ. वस्तु विविध प्रकारात् मिळतात.तसेच येथे चणे फुटाणे प्रसिद्ध आहेत

महाबळेश्वर: भौगोलिक परिस्थिती आणि हवामान, पर्यटन विषयाचे महत्त्व, इतिहास 
mahableshwar hills

पंचगंगा मंदिर

कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती, आणि भागीरथी या ७ नद्यांचे उगमस्थान आहे की जे पाहिलेच पाहिजे. यापैकी पहिल्या पांच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वहात असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक ६० वर्षानी दर्शन देतो. आता तो २०३४ साली दर्शन देईल. भागीरथीचा ओहोळ प्रत्येक १२ वर्षानी दर्शन देतो. हा आता सन २०१६ मध्ये मराठी श्रावण महिन्यात दर्शन देईल. हे मंदिर ४५०० वर्षापूर्वीचे आहे. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहाते. येथे कृष्णाबाई हे स्वतंत्र मंदिर आहे.

कृष्णाबाई मंदिर

पंचगंगा मंदिराचे पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई नावाचे मंदिर आहे की जेथे कृष्णा नदीची पूजा केली जाते. हे सन १८८८ मध्ये कोकणचे राजे 'रत्नगिरीओण' यांनी उंच टेकडीवर बांधले की जेथून पूर्ण कृष्णा दरी पाहता येते. या मंदिरात शिव लिंग आणि कृष्णाची मूर्ती आहे. लहानसा ओहोळ गोमुखातून वाहतो आणि तो पाण्याच्या कुंडात पडतो. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे. या मंदीराजवळ दलदल झालेली आहे आणि नाशवंत स्थितीत आहे. येथे पर्यटक फार कमी येतात त्याने ते एकटे पडलेले आहे. पण या ठिकाणाहून अतिशय सुंदर असा कृष्णा नदीचा देखावा पाहता येतो.

मंकी पॉइंट

या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे त्याला कारण असे की नैसर्गिक रित्या येथे तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते आणि गांधीजींच्या शब्दांची आठवण करून देतात. तेथील खोल दरीत डोकावले की एका मोठ्या पाशानात ३ हुशार मंकी समोरासमोर बसलेले आहेत असे चित्र नजरेला दिसते. आर्थर सीट पॉइंटला जान्याच्या मार्गावर हा पॉइंट आहे.

आर्थर सीट पॉइंट

समुद्र सपाटीपासून १,३४० मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले. अतिशय नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे.हे एक सुंदर ठिकाण आहे.खाली खूप खोल दरी आहे.

वेण्णा लेक (वेण्णा तलाव)

महाबळेश्वर हे विश्रांतीचे ठिकाण व सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वेन्ना लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे. हे लेक सर्व बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे. तेथून तुम्ही लेकचा देखावा नजरेत सामाऊ शकता किंवा प्रसिद्ध बाजारपेठेत राहूनही आनंद घेऊ शकता.वेण्णा लेक हे महाबळेश्वर - पाचगणी रोड वरती आहे. महाबळेश्वर पासून २.५ कि.मी अंतरावरती आहे. वेण्णा नदीचे पाणी साठा निर्माण केल्या मुळे हा वेण्णा तलाव आहे. येथे पर्यटकांना जलसफर करता येते. येथे हॉर्स वरून रपेटहि करता येते. या धरणाचा मागे घनदाट झाडी आहे. तर शेजारी रोड ला प्रतापसिंह महाराजांचे उद्यान आहे. येथे शोभिवंत फुलझाडे आहेत. हा क्लब महाबळेश्वर नगरपरिषद च्या नियंत्रणात येतो. या ठिकाणी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी जलसफर साठी ७०० रुपये लागतात. ते पण अर्ध्या तासाला. त्या साठी ७ लोकांची गरज असते. आणि १००० रुपये त्याच्या कडे ठेव स्वरुपात ठेवावे लागतात जलसफर केल्यानंतर ते पैसे परत केले जातात.

| १८४२ साली या वेण्णा लेक ची निर्मिती ही सातारचे राजे छत्रपती अप्पासाहेब महाराज यांनी केली. सरासरी एकूण क्षेत्र हे २८ एकर मध्ये आहे. आणि खोली ही १० फुट आहे.

केटस् पॉईंट (नाकेखिंड)

महाबळेश्वरचे पूर्व बाजूस हा पॉइंट आहे. येथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता. या पॉइंटची ऊंची साधारण १२८० मीटर आहे.

नीडल होल पॉइंट / एलीफंट हेड पॉइंट

काटे पॉइंट जवळच हा निडल पॉइंट आहे. नैसर्गिक रित्या खडकाला सुईसारखे भोक आहे ते सहजतेने दिसते म्हनून त्याला नीडल होल नाव दिलेले आहे. हा पॉइंट हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून त्याची डेक्कन ट्रप म्हणून ही प्रसिद्धी आहे.

विल्सन पॉइंट

सर लेस्ली विल्सन हे सन १९२३ ते १९२६ मध्ये मुंबईचे राज्यपाल होते तेव्हा या पॉइंटला त्यांचे नाव दिले आहे. महाबळेश्वर मधील हा १४३९ मी.ऊंचीचा सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉइंट आहे. महाबळेश्वर मधील हा एकच पॉइंट असा आहे की, येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता. महाबळेश्वरचे सर्व दिस्यांची आकर्षकता तुम्ही येथून न्याहाळू शकता. महाबळेश्वर मेढा मार्गाच्या पाठीमागील बाजूस हा विल्सन पॉइंट महाबळेश्वर शहरापासून १.५ किमी अंतरावर आहे.

प्रतापगड

महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २१ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. छ.शिवाजी महाराजांनी’ तुळजा-भवानी’ मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले होते. या किल्ल्यावरून कोंकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते

लिंगमळा धबधबा

महाबळेश्वर जवळ हा धबधबा आहे. साधारण पणे ६०० फुट उंचीवरून हे पाणी वेण्णा तलावात पडते. खडकाचे योजनापूर्वक विभाजन करून हा धबधबा बनलेला आहे.

इतिहास

महाबळेश्वरचा पाठीमागील इतिहास पाहीला तर साधारण १२१५ मध्ये देवगिरीचे राजे ऋग्वेद यांनी जुने महाबळेश्वरला भेट दिली तेव्हा त्यांनी कृष्णा नदीचे काठावर झऱ्याचे ठिकाणी एक लहानसे मंदिर आणि एक जलाशय बांधले. १६ व्या शतकात चंद्रराव मोरे या मराठी कुटुंबाने पूर्वीच्या राजकुळाचा पराभव केला आणि जावळी व महाबळेश्वरचे राजे झाले.त्या काळात या मंदिराची पुनर्बांधणी केल

सन १८१९ मध्ये ब्रिटीशांनी सर्व डोंगरी भाग साताऱ्याच्या राज्यांच्या छत्राखाली आणला. कर्नल लॉडविक हे सातारचे स्थानिक अधिकारी होते त्यांनी एप्रिल १८२४ मध्ये विभागातील सर्व सैनिक आणि वाटाड्याना तसेच भारतीय मदतनीस घेऊन या पॉइंट पर्यन्त पोहचले तो आता लॉडविक पॉइंट म्हणून ओळखला जातो. सन १८२८ पासून सर ऋग्वेद, माऊंट स्टुअर्ट एल्फिंस्टन, आर्थर मॅलेट, करणक, फ्रेरे आणि कितीतरी येथे भेटी देणारे होते. महाबळेश्वरची ओळख १९२९-३० मध्ये झाली. त्यापूर्वी ते माल्कम पेठ या नावाने ओळखले जात होते. पण आता ते महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर येथे “राज भवन” हे उन्हाळ्यात महाराष्ट्राचे राज्यपालांचेसाठी निवासस्थान आहे ते दी. टेरेस नावाच्या जुन्या इमारतीत आहे तिची खरेदी १८८४ मध्ये केलेली आहे.

वाहतूक

बसमार्ग

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याच्या मेढा शहरापासुन 29 कि.मी आहे व वाई या तालुक्याच्या गावापासुन महाबळेश्वर 33 किमी अंतरावर आहे. सातारा शहर ४५ किमी अंतरावर आहे. महाबळेश्वर येथून सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महाबळेश्वर केळघर घाटमार्गे मेढा व पुढे सातारा असा मार्ग आहे तसेच महाबळेश्वर पाचगणी वाई व पुढे सातारा असा एक मार्ग आहे महाबळेश्वर आगाराच्या बसेस दोन्ही मार्गे सातारा ह्या नेहमी चालू असतात महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्ग ४ला जोडलेले आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून महाबळेश्वरला येण्यासाठी MSRTCच्या बस, खाजगी बस, खाजगी वाहने सतत उपलब्ध असतात.तसेच उडतारे(AH-47, NH-4) तालुका वाई येथुन सरळ कुडाळ मार्गे जाता येते आपल्या खाजगी वाहनाने 43कि.मी

रेल्वे मार्ग

जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे सातारा 50 कि.मी.अंतरावर आहे.पुणे 220 कि.मी., मुंबई 370 कि.मी.आहे.याशिवाय कोकण रेल्वेचे खेडं स्टेशन हे 90 कि.मी. अंतरावर आहे.

विमान सेवा

पुणे आणि मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ अनुक्रमे 180 कि.मी आणि 200 कि.मी.अंतरावर आहेत.

संदर्भ

https://www.satara.gov.in/

Tags:

महाबळेश्वर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानमहाबळेश्वर पर्यटन विषयाचे महत्त्वमहाबळेश्वर इतिहासमहाबळेश्वर वाहतूकमहाबळेश्वर संदर्भमहाबळेश्वरपश्चिम घाटमहाराष्ट्रसमुद्रसपाटीसातारा जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्राथमिक आरोग्य केंद्रजवसधनंजय चंद्रचूडदहशतवादधाराशिव जिल्हातलाठीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमिरज विधानसभा मतदारसंघसॅम पित्रोदाशीत युद्धगोपीनाथ मुंडेकाळभैरवभारूडशरद पवारकुर्ला विधानसभा मतदारसंघस्त्रीवादमराठी संतमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीअतिसारबंगालची फाळणी (१९०५)भाषा विकासभारतीय निवडणूक आयोगरामदास आठवलेसैराटसुप्रिया सुळेजिजाबाई शहाजी भोसलेनाशिकराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)नामसंयुक्त महाराष्ट्र समितीसुधा मूर्तीमधुमेहनवग्रह स्तोत्रपोक्सो कायदाज्योतिबाबावीस प्रतिज्ञातोरणाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमबुलढाणा लोकसभा मतदारसंघडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्ललोकमतश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकाहातकणंगले विधानसभा मतदारसंघसाम्राज्यवादवर्तुळआमदारमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघक्षय रोगहत्तीभारतातील राजकीय पक्षछावा (कादंबरी)अर्थशास्त्रराज्यसभानवनीत राणागावआंब्यांच्या जातींची यादीदूरदर्शनरायगड (किल्ला)उचकीमहाड सत्याग्रहमानवी विकास निर्देशांकवाशिम जिल्हानागपूररयत शिक्षण संस्थाज्ञानेश्वरएकपात्री नाटकभारतीय प्रजासत्ताक दिनभारतातील शासकीय योजनांची यादीकोटक महिंद्रा बँकमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)रावेर लोकसभा मतदारसंघअमित शाहआणीबाणी (भारत)महाविकास आघाडीदेवनागरीश्रीया पिळगांवकर🡆 More