मधमाशी पालन

मधाच्या मोठ्या प्रमाणावर प्राप्तीसाठी व त्याची विक्री करण्यासाठी मधमाश्या पाळल्या जातात.मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे.मधमाशी ही फुलातील रसाला/परागांना मधात बदलविते व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते.जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा करण्याची फारच प्राचीन परंपरा आहे.

बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग आहे.त्यापासून निघणारे नैसर्गिक मेणही आर्थिक लाभदायक असते.

मधमाशी पालनाचे फायदे

  • फुलांचा रस/पराग यांचा सदुपयोग होतो. आर्थिक प्राप्ती मिळते व रोजगाराचा प्रश्न सुटतो.
  • शुद्ध मधाचे उत्पादन, मेणाचे उत्पादन व इतर आधारीत वस्तुंचे उत्पादन होते.
  • कोणत्याही इतर जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर/शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो. शेतीतील भाजी, फुलांच्या उत्पादनात सव्वा ते दिड पटींनी वाढ होते.कारण मधमाशा ह्या परागीकरणाचे काम उत्तमरित्या करतात.
  • मधाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य उत्तम राहते. ते एका प्राकृतिक औषधाचे काम करते.मधाचे सेवनाने अनेक रोग होत नाहीत.रक्तदाब, लठ्ठपणा आदी रोगांमध्ये फायदा होतो.
  • मधमाशी पालनात फारच कमी खर्च लागतो व तुलनेने कमी वेळपण लागतो.त्यास जागाही फारच कमी लागते.
  • कमी प्रतवारी असणाऱ्या जमिनीच्या शेतात मधमाशी पालनाचे फायदे आहेत.ती जमिन वापरात येते.
  • पर्यावरणावर मधमाशी पालनाचा सकारात्मक प्रभाव पडतो.परागीकरणासाठी मधमाश्या फारच महत्त्वाची भूमिका पार पाडतात.त्यामुळे फळांचे उत्पादनही वाढते.

मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य

पोळे ही एक साधी लांब पेटी असते आणि तिच्या वरील भागावर अनेक पट्ट्या असतात. या पेटीचा अंदाजे आकार १०० सेंमी लांब, ४५ सेंमी रुंद आणि २४ सेंमी उंच असा असावा. ही पेटी २ सेंमी जाड असावी आणि पोळे १ सेंमी रुंदीच्या प्रवेश छिद्रांसहित एकत्र चिटकवलेले आणि स्क्रूने घट्ट केलेले असावे. वरील पट्ट्या पोळ्याच्या रुंदीइतक्याच लांबीच्या असाव्यात जेणेकरून त्या आडव्या बरोबर बसतील आणि त्यांची जाडी १.५ सेंमी असावी म्हणजे एक वजनदार मधाचे पोळे पेलण्यासाठी त्या पुरेशा होतील. प्रत्येक स्वतंत्र वरील पट्टीला एकेक पोळे तयार करण्यासाठी मधमाशांना आवश्यक नैसर्गिक जागा मिळण्याकरता ३.३ सेंमीची रुंदी ठेवणं गरजेचं आहे.

धुराडं हे दुसरं महत्त्वाचं साधन आहे. ते लहान पत्र्याच्या डब्यापासून तयार करता येतं. मधमाशा आपल्याला चावू नयेत आणि त्यांना नियंत्रित करता येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कापड - मधमाशा पालन क्षेत्रात काम करताना माशांच्या दंशापासून आपले डोळे आणि नाकाचा बचाव करण्यासाठी. सुरी वरील पट्ट्या सैल करण्यासाठी आणि मधाची पोळी कापण्यासाठी. पिस मधमाशांना पोळ्यापासून दूर करण्यासाठी. राणीमाशीविलगक Queen Excluder काड्याचीपेटी.

मधुमाशांच्या प्रजाती

दगडी माशी अपीस डोरसाटा या माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन ५०-८० किलो असतं. लहान माशी अपीस फ्लोरिआ या माशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे २००-९०० ग्रॅम मध मिळतो. भारतीय मधमाशी अपीस सेराना इंडीका या मधमाशांद्वारे होणारं मध उत्पादन दर वर्षी प्रति वसाहत ६-८ किलो असतं. युरोपिअन मधमाशी इटालिअन मधमाशी अपीस मेल्लीफेरा यांच दर वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असतं.

डंखरहित मधमाशी त्रिगोना इरीडीपेन्नीस वर उल्लेख केलेल्या प्रजातींच्या शिवाय, केरळमध्ये आणखी एक प्रजाती अस्तित्वात आहे तिला डंखरहित मधमाशी म्हणतात. त्या ख-या अर्थानं डंखरहित नसतात, परंतु त्यांचा डंख पुरेसा विकसित झालेला नसतो. त्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दर वर्षी ३००-४०० ग्रॅम मध उत्पादन मिळतं.

संदर्भ

http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92e92792e93e936940-92a93e932928

Tags:

मधमाशी पालन ाचे फायदेमधमाशी पालन ासाठी लागणारे साहित्यमधमाशी पालन मधुमाशांच्या प्रजातीमधमाशी पालन संदर्भमधमाशी पालनपोळेमधमधमाशीमेणशेतीपूरक व्यवसाय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपाळ गणेश आगरकरक्रिकेटमराठा साम्राज्यगुरू ग्रहरक्तगटसोनिया गांधीमराठा आरक्षणजळगाव लोकसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)सूत्रसंचालननिलेश लंकेपर्यटनपश्चिम दिशाइतिहासरतन टाटामुघल साम्राज्यलिंगभावमहात्मा फुलेलोकसभा सदस्यफुटबॉलपंढरपूरसंस्कृतीदूरदर्शनअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघप्रीतम गोपीनाथ मुंडेअन्नप्राशनमहाराष्ट्राचा इतिहासजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)धर्मो रक्षति रक्षितःवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभाषाकलिना विधानसभा मतदारसंघबच्चू कडूसंत तुकारामधृतराष्ट्रभरती व ओहोटीशिल्पकलानवग्रह स्तोत्रहनुमान जयंतीसंवादलोकसंख्याआईस्क्रीमशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकअशोक चव्हाणउचकीगणपती स्तोत्रेपुणे करारनालंदा विद्यापीठशाहू महाराजद्रौपदी मुर्मूधर्मनिरपेक्षतापोवाडामावळ लोकसभा मतदारसंघआमदारमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसेंद्रिय शेतीहवामानभोपळामिया खलिफाअकबरकन्या रासकिरवंतइंग्लंडगोंडविवाहसम्राट अशोकराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)कुत्रागाडगे महाराजसामाजिक समूहप्रहार जनशक्ती पक्षअमेरिकेची संयुक्त संस्थानेहापूस आंबाभारताच्या पंतप्रधानांची यादीशिवसेनातुळजापूर🡆 More