भारतातील जातिव्यवस्था

भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे.

casta (es); Caste system in India (en-gb); Варна (bg); بھارت وچ ذات پات (pnb); 瓦爾那 (zh-hk); Varna (sk); Castas en Índia (oc); 瓦爾那 (zh-hant); 瓦尔那 (zh-cn); 인도의 카스트 (ko); hinda kasto (eo); kastovní systém v Indii (cs); ভারতে বর্ণপ্রথা (bn); castes en Inde (fr); Warna (jv); भारतातील जाती व्यवस्था (mr); ଭାରତର ଜାତିପ୍ରଥା (or); kastas Indijā (lv); Sistema de castas na Índia (pt-br); 瓦尔那 (zh-sg); Det indiske kastesystemet (nn); Catur Warna (su); ವರ್ಣಾಶ್ರಮ ಪದ್ಧತಿ (kn); caste system in India (en); النظام الطبقي في الهند (ar); 種姓制度 (yue); indiai kasztrendszer (hu); વર્ણવ્યવસ્થા (gu); Indiako kasta sistema (eu); кастовая система в Индии (ru); Y drefn gastiau yn India (cy); caste system in India (sq); Վարնա (hy); 印度種姓制度 (zh); Indiens kastesystem (da); हिन्दू वर्ण व्यवस्था (ne); ヴァルナ (ja); ארבע הווארנות (he); वर्ण्यव्यवस्था (sa); भारत की जाति व्यवस्था (hi); ᱥᱤᱧᱚᱛ ᱨᱮ ᱡᱟᱹᱛᱤᱵᱟᱫᱽ (sat); Intian kastilaitos (fi); Caste system in India (en-ca); இந்தியாவில் சாதி அமைப்பு (ta); sistema delle caste in India (it); วรรณะ (th); 瓦尔那 (zh-hans); بھارت میں نظام ذاتیات (ur); Varna (et); Varnalar (uz); Варна (mdf); हिन्दू वर्ण व्यवस्था (new); Варны (be); Kastsystemet i Indien (sv); 瓦爾那 (zh-tw); Sistema de castas da Índia (pt); Varna (de); varna (ca); ورن (هندوئیسم) (fa); Varna (lt); kastni sistem v Indiji (sl); Варна (философия) (ky); වර්ණ (si); ვარნა (ka); Warna (id); Warna (pl); ഇന്ത്യയിലെ ജാതി സമ്പ്രദായം (ml); varna (nl); Hint kast sistemi (tr); Варна (sah); ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਵਰਣ ਵਿਵਸਥਾ (pa); caste system in india (te); Castas (gl); индиски систем на касти (mk); Σύστημα καστών της Ινδίας (el); Hệ thống đẳng cấp ở Ấn Độ (vi) stratificazione sociale nella civiltà indiana di carattere rigorosamente ereditario (it); ভারতের বর্ণ ও জাতিগত বৈষম্য (bn); système de hiérarchisation des groupes sociaux en Inde (fr); હિન્દુ સમાજમાં ગર્વ (gu); हिंदू समाजातील वर्गवारीची व्यवस्था (mr); Begriff für Kaste im indischen Kastensystem (de); ହିନ୍ଦୁ ସମାଜରେ ବିଭେଦ (or); caste system in India (sq); 婆羅門至上的一種社會階級制度 (zh); Hindistan'da uygulanan sosyal tabaka sistemi (tr); social skiktning i Indien (sv); חלוקה מעמדית בתקופה הוודית בהודו (he); हिन्दू समाज में वर्ग (hi); కుల వ్యవస్థ (te); ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਜਾਤ-ਪਾਤ (pa); class in Hindu society (en); system dosbarth 'cast' yr India (cy); estratificación social en el hinduismo (es); sosiaalinen luokkajärjestelmä Intiassa (fi) Varna, Varna-áshrama, Varnashram, sistema de castas, castas, sistema de castas de la India, castas de la India, Varna-ashrama (es); Le système de castes en Inde, Castes indiennes, Caste hindoue, Caste indienne, Castes, Castes dans la politique indienne, Les Castes Dans La Politique Indienne, Les castes dans la politique indienne, système de castes en Inde (fr); Casta de l'Índia, Castes de l'Índia (ca); चातुर्वर्ण पद्धत, हिंदू वर्णव्यवस्था, पुराण, चातुर्वर्ण्य (mr); System Cast India, Cast (cy); As castas indianas, Chandala, Sistema de castas na Índia (pt); හින්දු දහම සඳහන් වන වර්ණ (si); indiske kastesystem, Det indiske kastesystem (da); kastna politika v Indiji, indijski kastni sistem, indijska kastna politika, varna (sl); インドのカースト制度, 2016年ウナー鞭打ち事件 (ja); Stany i kasty w Indiach (pl); ระบบวรรณะในศาสนาฮินดู (th); Caturwarna, Warna dalam agama Hindu, Catur Warna (id); Hindukaste, Hinduisk kaste, Hinduistisk kaste (nn); ברהמינים, ויישיה, ברהמין, ארבע הוורנות, קשטרייה, שודרה (he); Savarna, Varna (sv); वर्णाश्रम धर्म, हिन्दू वर्ण व्यवस्था, Varṇa (sa); हिन्दू वर्ण व्यवस्था, जातिवाद (hi); ಚತುರ್ವರ್ಣ ಪದ್ಧತಿ, ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ವರ್ಣ, ವರ್ಣ ಪದ್ಧತಿ (kn); కుల వ్యవస్థ (te); Caste politics in India, Indian caste system (en); Varno, kasto en Barato, kasto en Hindio (eo); Varna (cs); வர்ணாசிரமம் (ta)

प्राचीन भारतात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पूर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. ह्या व्यवस्थेतील मोठी संरचनात्त्मक स्थित्यंतरे मुघल साम्राज्याच्या काळात आणि ब्रिटिश साम्राज्याच्या काळात झाली आहेत असे मानले जाते. ह्या व्यवस्थेला मात देण्यासाठी आजच्या भारतीय समाजामध्ये राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक पातळ्यांवर आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. जाती व्यवस्था दोन भिन्न संकल्पनांपासून बनलेली आहे, वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था वास्तविक पहाता ह्या सामाजिक स्तरीकरणाच्या विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत.

भारतातील जाती व्यवस्था 
हिंदू समाजातील वर्गवारीची व्यवस्था
भारतातील जातिव्यवस्था
माध्यमे अपभारण करा
भारतातील जातिव्यवस्था  विकिपीडिया
उपवर्गcaste classification
ह्याचा भागहिंदू धर्म
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सध्या अस्तित्वात असलेली जाती व्यवस्था ही मुगल काळाच्या अंताकडे आणि ब्रिटिश काळाच्या सुरुवातीला भारतीय समाजामध्ये झालेल्या अनेक स्थित्यंतरातून निर्माण झालेली आहे. मुघल साम्राज्याच्या अंताच्या काळामध्ये अनेक शक्तिशाली व्यक्तीचा आणि गटांचा उदय झाला. त्यांनी स्वतः राजेशाही, धर्ममार्तंड आणि ब्राह्मण यांच्या बरोबरीने उभे राहाण्याची ताकद कमावली होती, ह्या सामाजिक बदलामुळे अनेक जातिबाह्य गटांमध्ये ही जातीय अस्मितांची निर्मिती व्हायला मदत झाली. ब्रिटिश काळात ह्याच सामाजिक स्थित्यंतराचे ब्रिटिशांनी आणलेल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये स्थिर अश्या जाती घडविण्यामध्ये रूपांतरण झाले. १८६० आणि १९२० दरम्यान, ब्रिटीशांनी भारतीय समाजाला जातीय स्तरावर वेगवेगळे मांडायला सुरुवात केली होती, त्यातूनच प्रशासकीय पदे आणि कामे ही फक्त उच्च जातीय लोकांनाच देण्याचा पायंडा त्यांनी पाडला. ज्याचा परिणाम स्वरूप १९२० साली मोठ्या प्रमाणात समाजातून विरोध निर्माण झाला आणि ब्रिटीशांना त्यांच्या ह्या धोरणामध्ये बदल करावा लागला. आणि त्यापुढे ब्रिटीशांनी सरकारी नोकऱ्यांच्या काही पदांवर आणि एकूण पदातील काही टक्के पदांवर खालच्या जातीच्या लोकांनाही घ्यायला सुरुवात केली आणि आरक्षणाची सुरुवात केली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक बदल झाले ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींची एक यादीच भारत सरकारने तयार केली आणि त्यानुसार जाती आधारित आरक्षणे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणाच्या बाबतीत लागू करण्यात आली. १९५० पासून भारत सरकारने अनेक कायदे आणि सामाजिक उपक्रम खालच्या जातीच्या गटांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा आणण्यासाठी निर्माण केले. ही शैक्षणिक, सरकारी पदांमधील आरक्षणे आणि इतर सोयी सुविधा ह्या वंशपरंपरेने विशिष्ट जातीतील लोकांना मिळतील आणि ह्या सेवा-सुविधा लाभार्थ्यांकडून इतर दुसऱ्या कोणाला देता येणार नाहीत अशा स्वरूपाच्या होत्या. जातीय पातळीवर भेदभाव करणे हे भारतीय संविधानाच्या कलम १५ नुसार बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहे इतकेच नव्हे तर भारत सरकारच्या विविध संस्थांद्वारे जातीय हिंसाचारा बाबतच्या घटनांची माहिती एकत्र करून त्यावर लक्ष ठेवले जाते.

व्याख्या आणि संकल्पना

वर्ण, जाती आणि जात

वर्ण

वर्ण ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकार, रंग, वर्ग, प्रत वर्ण हे प्राचीन वैदिक समाजातील भारतातील लोकांचे वेगवेगळ्या गटात विभाजन करणारी व्यवस्था होती. अनेक प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. ब्राह्मण(जे धार्मिक आणि कर्मकांडांचे काम करत होते), क्षत्रिय (ज्यांना राजन असेही म्हणले गेले हे शासक, प्रशासक आणि लढवय्ये होते), वैश्य (जे कारागीर, व्यापारी आणि शेतकरी होते) आणि शुद्र (जे हरकामी कामगार होते). वर्गीकरणाच्या परिणाम स्वरूप असेही लोक होते जे ह्या चार वर्णांमध्ये सहभागी होत नव्हते ते लोक आदिवासी आणि अस्पृश्य ह्या गटांचे होते. ह्यांना जसे वर्गीकरणात स्थान दिलेले नव्हते तसेच हिंदू समाजाच्या विश्वातही कसलेही स्थान नव्हते अगदी समाजाचा घटक म्हणून उल्लेख होण्याचेही स्थान नव्हते.

ज्ञाती

ज्ञाती, म्हणजे जन्म, ज्ञाती ह्या वर्गीकरणाचा खूप कमी उल्लेख प्राचीन भारताच्या ग्रंथांमध्ये आढळतो, परंतु जिथे जिथे हा उल्लेख आला आहे तेथे तो वर्णापेक्षा ज्ञाती वेगळ्या आहेत असा आला आहे. त्या सर्व ग्रंथांमध्ये असाही उल्लेख येतो की, वर्ण फक्त चारच आहेत पण ज्ञाती मात्र हजारो आहेत. ज्ञाती ह्या खूप जटिल सामाजिक समूह आहेत आणि त्यांची वैश्विक पातळीवर व्याख्या करणे किंवा त्याची वैशिष्ट्ये पडताळणे कठीण होते, शिवाय ज्ञाती खूपच लवचिक आणि विभिन्न प्रकारच्या होत्या.

काही समाज शास्त्रज्ञांनी जात ह्या संकल्पनेलाच 'ज्ञाती' ह्या संकल्पनेच्या जागी वापरले आहे, ज्ञातीचे मूळ धर्मात आहे. मानववंश शास्त्रज्ञ लुईस ड्युमों यांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे, ज्ञाती ह्या व्यवस्थेमध्ये कर्मकांडाधारित स्तरीकरण असते आणि त्या स्तरीकरणाचे मूळ शुद्धता आणि प्रदूषण/बाटणे ह्यांसारख्या धार्मिक संकल्पनांमध्ये आहे. म्हणून धार्मिक संकल्पनांना निधर्मी कल्पनांच्या वर गोवलेले आहे. इतर अनेक समाज शास्त्रज्ञांनी ह्या विचारांचा विरोध केला आहे आणि मुळातच धर्मनिरपेक्ष कल्पनाच आर्थिक, राजकीय आणि अनेकदा भौगोलिक गरजांमधून निर्माण होतात असे प्रतिपादन केले. जेनीयेन फोवलर यांनी असे विधान केले आहे की, ज्ञाती ही व्यवस्था जर फक्त व्यावसायिक वर्गीकरणाची व्यवस्था असेल तर ह्या व्यवस्थेमध्ये व्यक्तिंना किंवा गटांना व्यवसायांतरण करणे शक्य असणे आवश्यक आहे. ज्ञातीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्या आंतरविवाही असतात, त्यातील सदस्यांना आपल्याच ज्ञातीत विवाह करण्याची परवानगी असते किंबहुना आपल्याच ज्ञातीत विवाह करतात. ज्ञाती ह्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि अगदी आदिवासी जमातीं मध्येही अस्तित्वात होत्या, शिवाय त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची सर्वसामान्य सरळ सोपान/उतरंडीची व्यवस्था नव्हती.

जाती

हा मूळ भारतीय शब्द नाही, जरी हाच शब्द आता भारतात आणि बाहेरही अगदी इंग्रजी भाषेतही मोठ्याप्रमाणात वापरला जात असला तरीही हा मूळ: भारतीय शब्द नाही. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे caste हा शब्द पोर्तुगीज कास्टा मधून येतो ज्याचा अर्थ 'वंश, वंशपरंपरा, वीण, शुद्ध आणि कश्या चेही मिश्रण नसलेली वीण किंवा वंश' म्हणजेच कास्ट असा आहे. जरी, भारतीय भाषांमध्ये कास्ट या शब्दाचे तंतोतंत भाषांतर केले जाऊ शकत नसले तरीही, वर्ण किंवा ज्ञाती हे त्याच्या जवळ जाणारे संस्कृत शब्द आहे.

घुर्ये १९३२ यांचे मत

समाजशास्त्रज्ञ गो. स. घुर्ये यांच्या मतानुसार, अनेक लोकांच्या जाती वरील संशोधनाव्यतिरीक्तही

आपल्याकडे जातीची सर्वसामान्यीकरण केलेली अशी व्याख्या नाहिये. जातीच्या जटिल प्रक्रियांमुळे जातीची व्याख्या करण्याचे सगळे प्रयत्न विफळ ठरतात. दूसऱ्या बाजूला ह्या विषयावरील बरेचसे संशोधन साहित्य ह्या संकल्पनेच्या वापराच्या अचूकतेवरच भाष्य करण्यामध्ये गुंतलेले आहे.

घुर्ये यांच्या मतानुसार केलेली व्याख्या ब्रिटीशकालीन भारतासाठी लागू करणे शक्य होते. परंतु घुर्ये यांनी हे सुद्धा मान्य केले होते की, जातीची सार्वत्रिक व्याख्या करणे शक्य नाही आणि जातीच्या संकल्पनेमध्ये भारतीय उपखंडामध्ये प्रादेशिक वैविध्य आहेच. तरीही जातीची निम्नोक्त सहा वैशिष्ट्ये त्यांनी मांडली होती.

  • जात ही अशी स्तरीकरणाची व्यवस्था आहे, ज्याच्या सदस्यत्वासाठी त्या स्तरित गटातच जन्म घेणे आवश्यक आहे. म्हणजेच जात ही त्या विशिष्ट जातींतच जन्माला आल्याने मिळते.
  • ह्या स्तरित व्यवस्थेच्या सर्वात वरच्या भागावर नेहमीच ब्राह्मण होते, परंतु काही परिस्थितींमध्ये हा मुद्दा वेगळा असू शकतो. वेगवेगळ्या भाषिक भागांमध्ये, शेकडो जातींची स्तरित व्यवस्था सर्वांनीच स्वीकारलेली दिसते.
  • रोटी-बेटी व्यवहारांवर मर्यादा असणे, शिवाय निम्न जातींकडून नक्की कुठल्या प्रकारचे अन्न आणि पेये उच्च जातीय लोक स्वीकारू शकत होते यावरही अगदी बारकाईने उभे केलेले नियम होते. नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य होते, आणि निम्न जातीच्या लोकांना उच्च जातीय लोकांकडून अन्न स्वीकारायची परवानगी होती.
  • जातीचे भौगोलिक अवकाशावर ही विभाजन केल्याची दिसते, म्हणजे एका जातीचे सर्व लोक एकाच ठिकाणी एकत्र रहात होते, वर्चस्व असणाऱ्या जाती सर्वसाधारणपणे मध्यभागी आणि त्यांच्या भोवती इतर सर्व जातींच्या वस्त्या असत ज्यामध्ये सर्वात निम्न जातीच्या वस्त्या गावाच्या सीमेवर/परिघावर असत. उच्च जातींद्वारे वापरले जाणारे मुख्य रस्ते आणि पाण्याचे साठे/ विहिरींच्या वापरावर निम्न जातीच्या लोकांना बंदी होती; शिवाय उच्च जातीय ब्राह्मण निम्न जातीने वापरलेल्या रस्त्यांचा आणि विहिरींचा वापर करू शकत नव्हते.
  • सर्वसाधारणपणे सर्व लोकांचे व्यवसाय हे वंशपरंपरागत होते. कुठलाही व्यवसाय निवडण्याचे स्वतंत्र जाती व्यवस्थेमध्ये नाहियेत, प्रत्येक जातीसाठी इतर जातींचे व्यवसाय करणे अपवित्र मानले जात होते. घुर्ये यांच्या मते जातीचे हे वैशिष्ट्य भारताच्या अनेक भागांमध्ये जसेच्या तसे अस्तित्वात नव्हते, आणि भारताच्या अनेक भागांमध्ये चारही जातीच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) या सर्वांच्याकडून शेती केली जात होती आणि युद्धाच्या वेळी सर्वच लोक हातात शस्त्रे घेऊन लढायला ही बरोबर जात होते.
  • प्रत्येक जातीतील व्यक्तीने आपल्याच जातीतील जोडीदार विवाहासाठी निवडणे बंधनकारक होते, परंतु काही परिस्थितींमध्ये उच्च जातीय पुरुष आणि निम्न जातीय स्त्री यांचा विवाह ग्राह्य मानला जात होता.

ब्रिटिशांनी गोळा केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारावर मांडलेल्या सहा वैशिष्ट्यांच्या घुर्ये यांच्या ह्या सिद्धांतावर इतर अनेक संशोधकांनी टीका केली. जे रिसले यांच्या उच्च-उच्चनीचतेच्या वंशवादी संकल्पनांनी प्रभारीत आहे, आणि अशा प्रकारचा ब्रिटिशांचा दृष्टिकोन वापरून स्वतःचे सिद्धान्त तत्कालीन वासाहतिक पौर्वात्य वादाच्या चर्चा विश्वाला पुरवणी ठरणारे सिद्धान्त उभे केले. १९३२ साली, घुर्ये यांनी असे प्रतिपादन केले की, ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे जास्त फायद्यासाठी भारतीयांनी केलेल्या गटबाजीमुळे आणि भेद भावांच्या निर्मितीमुळे भारतातील आर्थिक संधींमध्ये जातीय विभाजने होण्यास मदत झाली, जातीय विभाजने आर्थिक संधींची जोडल्याने जाती व्यवस्थेला आणखीन वेगळे जटिल वळण मिळाले. ग्राहम चापमन आणि इतर संशोधकांनी ही जाती व्यवस्थेच्या जटीलतेबद्दल हेच मत व्यक्त केले आहे आणि सिद्धान्त आणि वास्तविक तथ्ये यांमध्ये फरक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

जातीच्या व्याख्येबद्दल आधुनिक परिप्रेक्ष्ये

रोनाल्ड इंडन ह्या पौर्वात्यवादाच्या अभ्यासकाने असे प्रतिपादन केले आहे की, जातीची सर्वंकष आणि वैश्विक पातळीवर लागू करता येईल अशी व्याख्या करता येत नाही. उदाहरणार्थ जातीची व्याख्या सुरुवातीच्या काळातील युरोपीय दस्ताऐवजांमध्ये "वर्ण" या नावाचे आंतरविवाही समूह जे युरोपातील इस्टेटशी मिळते-जुळते आहेत अशा स्वरूपाची होती. ब्रिटिश राज्य भारतात प्रस्थापित झाल्यानंतरच्या काळातील वर्णनांमध्ये युरोपीयन लोकांच्या दस्ताऐवजांमध्ये २०व्या शतकाच्या अंताला वासाहतिक प्रशासकांनी २३७८ जातींचे विभाजन नोंदवले होते, आणि ह्यावेळी मात्र वर्ण ह्या संकल्पनेऐवजी त्यांनी "जाती" ही संकल्पना वापरलेली दिसत होती.

तुलनात्मक धर्म ह्या विषयाचे प्राध्यापक अरविंद शर्मा यांनी असे नोंदवले आहे की, जरी "जात" ही संकल्पना सर्वसामान्यपणे वर्ण आणि जात ह्या संकल्पनांसाठी बदली म्हणून वापरली जात होती पण, गंभीर पौर्वात्यवादी जात ही संकल्पना विशिष्ट अर्थाची वाहक आहे याची जाण असलेले आहेत, ते मात्र जात ही संकल्पना एका विशिष्ट अर्थानेच वापरतात. या ठिकाणी आर्थर बाशम यांचे इतर प्राच्यविद्या शास्त्रज्ञांशी एकमत होते जे असे नोंदवतात की, पोर्तुगिज वसाहतवाद्यांनी भारतातील जमाती, कुटुंबे आणि गोत्रांचे वर्णन करण्यासाठी जो कास्टा नावाचा शब्द वापरला होता तोच शब्द जातीसाठी वापरणे जास्त योग्य आहे. हाच शब्द पोर्तुगीजांच्या पुढील सर्व वसाहतीक अभ्यासकांनीही वापरणे रूढ झाले आणि म्हणून त्यापुढील सर्व वासाहतिक लिखाणांमध्ये हिंदू सामाजिक गटांना कास्टा हाच शब्द/संकल्पना वापरली गेली. अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकांमध्ये आधुनिक भारतातात अस्तित्वात असणाऱ्या सर्वच ३००० आणि इतरही सामाजिक गटांना जे चार अर्वाचीन वर्गांमधून(वर्णांमधून) आणि ज्ञातींमधून तयार झालेले होते, त्या सर्वांनाच कास्ट ह्या एकाच संकल्पनेत बांधण्याचा प्रयत्न केला गेला. तत्कालिन भारतीय समाजाला एकाच संकल्पनेत बांधून त्याचे आकलन करण्याचा हा वसाहतकारांचा प्रयत्न होता. त्यामुळे जात/कास्ट ही‌ एक छद्म संकल्पना आहे. कारण, जाती सतत नव्याने सामाजिक पातळीवर उदयाला येतात, जुन्या नष्ट होतात आणि नव्या जाती निर्माण होतात. परंतू‌ चार वर्णांची व्यवस्था कायम रहाते. चातुर्वर्ण व्यवस्था ही चार वर्णांच्या सहाय्याने तशीच उभी आहे अगदी गेली 2000 वर्षे त्या वर्णांमध्ये कसलाही खास फरक ह्या काळात पडलेला नाही. आंद्रे बेटेईली यांनी नोंदवले आहे, की, "जी भूमिका "वर्णांनी" प्राचीन हिंदू साहित्यामध्ये वटवली होती तीच भूमिका "जाती" ही संकल्पना आधुनिक काळात वटवत आहे. 'वर्ण' हा जसा सामाजिक उतरंडीचा बंद गट आहे. तसेच, 'जाती' हा संपूर्णपणे बंद गट आहे, अगदी जातींना एकाच प्रकारचा घटक असलेल्या नैसर्गिक गटांसारखेच समजले जाते." तरीही, कोणत्याही संख्येने नवीन जातींची भरमार समाजात केली जाऊ शकते, आणि त्यासाठी जमाती, पंथ, संप्रदाय, धर्म किंवा भाषिक अल्पसंख्यांक आणि नागरिकत्व या कश्याचेही मिश्रण वापरले जाऊ शकते. म्हणूनच 'कास्ट' ही संकल्पना इंग्रजी भाषेमध्ये 'जाती' ह्या संकल्पनेचे योग्य प्रतिनिधीत्व करित नाही. त्यासाठी जातीच्या जवळची संकल्पना म्हणजे वांशिकता होय, वांशिक अस्मिता आणि वांशिक गट ह्या भारतीय जात ह्या संकल्पनेच्या जवळच्या संकल्पना आहेत.

लवचिकता

आन वालड्रोप ह्या समाजशास्त्रज्ञांच्या मते, बाहेरचे लोक जाती ह्या संकल्पनेला भारताच्या पारंपारिक समाजव्यवस्थेची एकसंध आणि स्थिर अशी संकल्पना म्हणून पहात असले तरीही वास्तवात संशोधनामधुन समोर आलेली तथ्ये असे सांगतात की, जाती व्यवस्था अमुलाग्र बदलत आहे. जात ही संकल्पना वेगवेगळ्या भारतीयांना वेगवेगळ्या अर्थाने माहिती असलेली दिसते. सध्याच्या आधुनिक भारताच्या सक्रिय राजकारणामध्ये, जिथे नोकरी आणि शिक्षणाच्या संधीमध्ये निम्न जातींच्या सामाजिक-आर्थिक उत्थानासाठी आरक्षणे देण्यात आलेली आहेत, त्याच ठिकाणी जात ही संकल्पना अतिशय संवेदनशिल आणि वादग्रस्त मुद्दा बनत चालली आहे. श्रीनिवास आणि दामले सारख्या समाजशास्त्रज्ञांनी जाती व्यवस्थेमध्ये स्थिरत्व असल्याचे नाकारून प्रत्यक्षात जाती व्यवस्था ही अतिशय गतिशिल आणि बदलत जाणारी व्यवस्था आहे असे प्रतिपादन केले आहे, म्हणूनच जातीच्या उतरंडीमध्येही फेरफार होऊ शकण्याची शक्यता निर्माण होते.

जाती व्यवस्थेचा उगम

परिप्रेक्ष्ये

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात जाती व्यवस्थेच्या उदयाबद्दलचे निदान दोन मुख्य सिद्धान्त आहेत, ह्या दोनही सिद्धान्तांचा पाया समाजातील विचारप्रणालीच्या घटकांवर किंवा सामाजिक-आर्थिक घटकांवरच आधारित आहे.

  • सिद्धान्ताचा पहिला प्रवाह हा विचारप्रणालीच्या घटकांना जाती व्यवस्था निर्माण करण्यात आणि ती पुढे तशीच ठेवण्यास कारणीभूत असल्याचे तसेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेची मूळे असल्याचे मानतो. हे परिप्रेक्ष्य डुंमों यांनी उभे केले असून, वासाहतीक काळातील अनेक ब्रिटिश विद्वानांमध्ये हे परिप्रेक्ष्य प्रचलीत होते. ह्या प्रवाहानूसार जाती व्यवस्थेचा उगम आणि पुढे तशीच चालू ठेवण्यामध्ये धर्म आणि त्यातीलही मनुस्मॄती सारख्या कायदे पुस्तकांना कारणीभूत मानले जाते, ह्या प्रवाहासाठी आर्थिक, राजकीय किंवा ऐतिहासिक पुरावे आणि घटक गौण आहेत.
  • दुसरा मत प्रवाह सामाजिक-आर्थिक घटकांना जाती व्यवस्थेच्या केंद्रस्थानी मानतो आणि त्यांच्या मते हेच ते घटक आहेत ज्यांच्यामूळे जाती व्यवस्था निर्माण झाली आणि ती पुढे तशीच चालू ठेवणे शक्य झाले. त्यांच्या मते जाती व्यवस्था ही भारताच्या आर्थिक, राजकीय आणि भौतिक इतिहासात घडवली जाते. ह्या प्रवाहामध्ये गेराल्ड बर्मन, मारिओट आणि डर्क्स ह्या उत्तर-वसाहतवादी अभ्यासकांचा सहभाग आहे, हा प्रवाह जाती व्यवस्थेचे वर्णन कायम उत्त्क्रांत होत जाणारे सामाजिक वास्तव असे करतात. शिवाय या प्रवाहाच्या मते जर भारतातील जाती व्यवस्थेचे पूर्ण आकलन करावयाचे असल्यास सर्वप्रथम भारताच्या भौतिक, आर्थिक, राजकीय इतिहासांमधील सामाजिक प्रक्रियां, व्यवहार यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. ह्या प्रवाहातील सिद्धांकन मोठ्याप्रमाणावर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासातून आलेल्या पुराव्यांमधून उभे राहिले आहे, हे पुरावे मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी भारतीय उपखंडावर आपले राज्य निर्माण करताना उभ्या केलेल्या ध्येय-धोरणांचा आणि नंतर वासाहतीक ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या ध्येय-धोरणांच्या अभ्यासातून समोर आलेले आहेत.

पहिल्या प्रवाहाने धार्मिक मानववंशशास्त्रावर भर देऊन इतर ऐतिहासिक तथ्यांना परंपरांमधून निर्माण झालेले आणि म्हणूनच दुय्यम मानले. दुसऱ्या प्रवाहाने समाजशास्त्रीय तथ्यांवर भर देऊन ऐतिहासिक संदर्भांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दुसऱ्या प्रवाहाने पहिल्या प्रवाहावर जातीच्या उत्पत्तीच्या सिद्धान्ताबद्दल टीका केली आहे, दुसऱ्या प्रवाहाच्या मतांनुसार पहिल्या प्रवाहाने धर्माच्या आणि परंपरांच्या नावावर भारतीय समाजाच्या संदर्भांचे आणि इतिहासाचे वास्तवच नाकारले आहे.

कर्मकांडात्मक राजेशाही

सॅम्युयल हे जोर्ज एल. हार्ट यांचा संदर्भ देऊन असे प्रतिपादन करतात की, भारतीय जातिव्यवस्थेच्या केंद्रस्थानी कर्मकांडात्त्मक राजेशाही (रिच्युयल किंगशिप) होती, आणि त्या प्रकारच्या राजेशाहीमधूनच ब्राह्मणवाद, बौद्ध धर्म आणि जैन धर्माच्या आगमनापूर्वीच भारतात जाती व्यवस्था निर्माण झाल्याचे दिसते. या प्रकारची सामाजिक व्यवस्थेच्या सविस्तर नोंदी दक्षिण भारताच्या तमिळ साहित्यातील ख्रिस्तपूर्व तिसऱ्या ते सहाव्या शतकातील काव्यांमध्ये सापडते. ह्या सिद्धान्तामुळे सिंधू-आर्यांच्या "वर्ण" सिद्धान्ताला छेद दिला जातो, कारण कर्मकांडात्मक राजेशाही पद्धतीमध्ये जातीचे मूळ वर्ण व्यवस्था नसून, राजाला कर्मकांडातून मिळालेली सत्ता आहे, त्या राजाला काळी जादू आणि कर्मकांड करणाऱ्या गटांने पाठिंबा दिलेला असे, शिवाय त्या जादू आणि कर्मकांडात सहभागी झाल्याने त्या गटातील लोकांचे समाजातील स्थान मात्र खालच्या दर्जाचे होते, कारण जादू आणि कर्मकांडामध्ये भाग घेणे दूषित करणारे मानले जात होते. हर्ट यांच्यामते, हेच ते आदर्श प्रारूप आहे, ज्याच्यावर पुढे जाती व्यवस्था आकाराला आली, कारण निम्न दर्जाच्या गटातील लोकांकडून अपवित्र होण्याची/बाटण्याची भिती या प्रारूपात मांडलेली आहे, ह्या जाती व्यवस्थेच्या हर्ट प्रारूपामधून प्राचीन भारतीय समाजाची कल्पना मोठ्याप्रमाणावर अंतर्गत विभाजने नसलेले गट आणि काही लहान गटांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे "अपवित्र" मानले जात असलेला गटांचे मिश्रण असलेला समाज अशी करता येते.

वैदिक वर्ण

वैदिक समाजामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व १५०० ते इसवी सन ५०० दरम्यान वर्ण व्यवस्थेचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. पहिले तीन गट ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य या गटांसाठी युरोपामधील समाजांमध्ये समांतर सामाजिक दर्जाचे गट अस्तित्वात असल्याचे आपल्याला पहाता येते. परंतु शूद्र असा जो खास गट भारतीय समाजात अस्तित्वात होता आणि आहे तो मात्र उत्तर भारतातील ब्राह्मणी व्यवस्थेचे उत्पादित असल्याचे आपल्याला ऐतिहासिक दॄष्ट्या पहाता येतेह्या वर्ण व्यवस्थेच्या चार स्तरां व्यतिरिक्त म्हणजेच व्यवस्थे बाहेर, खाली आणि समांतर सामाजिक दर्जा असलेले अनेक गट कायमच अस्तित्वात असलेले आढळतात, जसेकी अस्पॄश्य, आदिवासी आणि इतर अनेक की, ज्यांना निश्चित असे स्थान/दर्जा वर्ण व्यवस्थेमध्ये दिला गेलेला नव्हता.

हिंदू धार्मिक साहित्यामध्ये वर्ण व्यवस्था अनेक ठिकाणी नोंदवलेली आहे, मानवी समाजाच्या रचनेची ती एक आदर्श व्यवस्था म्हणूनच तिचे वर्णन येथे. वर्ण व्यवस्थेचे हिंदू धर्माच्या अभ्यासकांकडून प्रस्थापित मानले गेलेले उल्लेख हे ॠग्वेदातील पुरुषसूक्त आणि मनुस्मॄतीमध्ये येतात. या विरुद्ध असे अनेक हिंदू ग्रंथ आहेत ज्यांमध्ये जाती व्यवस्थेवर टीका केली गेली आहे, वर्ण व्यवस्थेला नाकारलेले आहे. परंतु ते ग्रंथ समोर आणले जात नाहीत.

अभ्यासकांनी ॠग्वेदातील वर्ण ह्या संकल्पनेला आव्हान दिले आहे कारण, ॠग्वेदात वर्ण हा उल्लेख फ़क्त एकदाच येतो. पुरुषसूक्त हे ॠग्वेदात नंतर घुसवले गेले असल्याचे मानले जात आहे. स्टेफनी जेम्सन आणि जोइल ब्रेरेटोन ह्या संस्कॄत आणि धर्म अभ्यासाच्या प्राध्यापकांनी हे सिद्ध केले आहे की, "ॠग्वेदामध्ये विस्तॄत आणि विभाग-उपविभागलेल्या सर्वांना प्रभावित करणाऱ्या जाती व्यवस्थेचे कसलेही उल्लेख नाहीत." शिवाय ॠग्वेदात वर्णन केलेली वर्णाश्रम व्यवस्था ही, तत्कालीन समाजाचे वर्णन नसून आदर्श व्यवस्था कशी असू शकेल याचे वर्णन म्हणून केलेला "प्राथमिक पातळीवरील विचार" आहे". जसे ॠग्वेदातील वर्णनात वर्ण व्यवस्थेबद्दल माहितीचा अभाव आहे, त्या विरुद्ध मनुस्मॄतीमध्ये विस्तॄत असे वर्णन केले गेले आहे, तरीही ते वर्णनही अस्तित्वावात असलेल्या सामाजिक व्यवस्थेचे वर्णन नसून व्यवस्था कशी असू शकेल याचे प्रारूप मांडण्याचा प्रयत्न आहे. सुजान बयले यांनी असे प्रतिपादन केले आहे की, मनुस्मॄती आणि इतर तत्सम ग्रंथामधुन ब्राह्मणांचे सामाजिक स्थान उंचावण्यास मदत झाली आणि त्यांमधूनच वर्ण व्यवस्थेच्या कथानाचा उदय झाला, परंतु इतर प्राचीन भारतीय ग्रंथामधून जाती व्यवस्थेची निर्मिती झाली नाही.

जाती

जेनेआने फ़ाऊलेर, या धर्म अभ्यास आणि तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी जातीचा उदय कसा झाला हे शोधणे अशक्य आहे असे प्रतिपादन केले आहे. सुजान बायले यांनी‌ दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्था ही पारतंत्र्याच्या काळात अस्तित्वात असलेल्या गरिबी, संस्थात्मक मानवी हक्कांचा अभाव, अस्थिर राजकीय वातावरण आणि आर्थिक असुरक्षितता यांच्याशी लढा देण्यासाठी संधीचा स्रोत म्हणून अस्तित्वात आली. (ह्या वाक्याचा अर्थ असा होतो की, जातींचा उदय ही आधुनिक काळातील घटना आहे.)

दिपांकर गुप्ता या सामाजिक मानव वंश शास्त्रज्ञांनूसार मौर्य काळात गटांची निर्मिती झाली आणि त्या पुढे सामंतशाही निर्माण झाली आणि सामंतशाहीमधून सुमारे ७ ते १२ शतकात जाती प्रत्यक्षात आल्या. जरी बाकीच्या अभ्यासकांचे भारतीय जाती व्यवस्थेच्या उदयाबद्दल वाद असले तरीही, बार्बरा मेटकाफ़ आणि थॉमस मेटकाफ़ ह्या इतिहासाच्या प्राध्यापकांनी असे प्रतिपादन केले आहे की, अगदी अलीकडच्या काही शतकांपर्यंत भारतीय उपखंडातील सामाजिक संघटन हे वर्णाश्रम व्यवस्थेने भारलेले होते आणि जाती व्यवस्था समाजाचा पाया नव्हती. असे अलिकडील अनेक संशोधनात आणि समोर आलेल्या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये सिद्ध झाले आहे. बेशम यांच्या मते, प्राचिन भारतीय साहित्यामध्ये वर्णांबद्दल नेहमीच संदर्भ येतो, पण जातींबद्दल काहीही संदर्भ येत नाही आणि जर उल्लेख आलाच तर तो वर्ण व्यवस्थेतील एक उप व्यवस्था म्हणुन येतो. यावरून असे दिसते की, जर वर्ग व्यवस्थेमध्ये व्याख्यीत केलेल्या जाती व्यवस्थेला, म्हणजेच अंतरविवाही, व्यवसाया आधारित विभाजनाचे अगदी अलीकडच्या काळापर्यंत कसलेही ऐतिहासिक अस्तित्व सापडत नाही.

अस्पॄश्य जाती बहिष्कॄत आणि वर्ण व्यवस्था

वैदिक साहित्य/ग्रंथ अस्पृश्यतेच्या व्यवहाराबद्दलही बोलत नाहीत किंवा अस्पृश्यतेची संकल्पनाही मांडत नाहीत तसेच अस्पृश्य व्यक्तिंचाही उल्लेख करित नाहीत. जरी वेदातील काही कर्मकांडांमध्ये राजांना आणि समाजातील उच्चभ्रू व्यक्तिंना सर्वसामान्यं व्यक्तिंबरोबर भोजन करण्यास मनाई असली. आणि नंतरच्या काही वैदिक ग्रंथांमध्ये काही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची निंदा-नालस्ती करित असली तरीही त्या ग्रंथांमध्ये अस्पृश्यतेसारखी कोणतीही संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसत नाही.

वैदिकोत्तर काळातील मनूस्मृतीसारख्या काही ग्रंथांमध्ये जाती बहिष्कृत केल्याची काही उदाहरणे आहेत आणि मनूस्मृतीनूसार अश्या लोकांना वाळीत टाकले गेले पाहिजे. सध्याच्या अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे कि, वैदिकोत्तर काळातील ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या सामाजिक व्यवस्थांमध्ये आणि वासाहातीक काळात भारतीय जाती व्यवस्थेविषयी झालेल्या चर्चांमध्ये मोठा फ़रक आहे, शिवाय ड्युमों यांची भारतातील समाजातील जाती व्यवस्थेच्या सिद्धांकनानेही हेच प्रतिपादित केले आहे. ज्यांनी वैदिक ग्रंथांचे जसे की, धर्मसूत्रे आणि धर्मशास्त्रे यांची भाषांतरे केली आहेत त्या पेट्रिक ओलीवेले ह्या संस्कृतच्या प्राध्यापकाने हे प्रकर्षाने सांगितले आहे की, प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील कोणत्याच भारतीय ग्रंथांमध्ये कर्मकांडात्मक प्रदूषण/बाटले जाणे, शौच-अशौच अश्या प्रकारचे उल्लेख नाहीत. ओलीवेले यांच्यामते शौच-अशौच ह्यांचे उल्लेख धर्म शास्त्रांमध्ये येतात पण ते उल्लेख वैयक्तिक व्यवहारांबद्दलच मर्यादित आहेत, जसे की, नैतिकता, कर्मकांडे, जैविक बाटले जाणे (कोणते अन्न खावे आणि शौच्यास जातेवेळी काय काळजी घ्यावी वगैरे). ओलीवेले आपल्या वैदिकोत्तर काळातील ग्रंथांच्या परीक्षणांमधे स्पष्टपणे लिहितात की, "शुद्ध/अशुद्धतेच्या/शौच/अशौचाच्या कोणत्याही कल्पनांना समाजातील कोणत्याही वर्गाला/गटाला/वर्णाला जोडले गेलेले नाही." पहिल्या सहस्रकाच्या सुरुवातीला लिहिल्या गेलेल्या एकाच शास्त्रग्रंथामध्ये फ़क्त एकदाच असा उल्लेख येतो की, "ज्या व्यक्तीं अतिशय निंदनीय कर्म करतात त्यांना त्यांच्या वर्णातून हाकालले जाते". अशा व्यक्तींना (ज्यांनी निंदनीय कर्म केले आहे) त्यांना पापी म्हणून वाळीत टाकले जावे असा आदेशही ते धर्म ग्रंथ देतात. ओलीवेले यांनी त्यापुढे जाऊन असेही प्रतिपादन केले आहे की, धर्मशास्त्रांमध्ये व्यक्तींच्या वैयक्तिक बाबींनुसार जसे की, चारित्र्य, नैतिक कारणे, कृती, निरागसता किंवा अज्ञान(बालकांद्वारे केलेल्या कृतींसाठी), नियमने आणि कर्मकांडांशी संबंधित वर्तने यांच्याशी संबंधित मुद्यांपुरतेच मर्यादित शुद्ध/अशुद्धचे वर्णन येते शिवाय त्याचा ती व्यक्ती कोणत्या वर्णाची आहे त्याच्याशी काहीही संबंध नाही, चारही वर्णातील व्यक्ती शुद्धआणि अशुद्धबाटू शकतात. ड्युमों या संधोधकाने त्याच्या नंतरच्या प्रकाशनांमध्ये, हे स्पष्ट केले आहे की, प्राचिन वर्ण उतरंड ही शुद्धता/अशुद्ध सारख्या तत्त्वांवर आधारित नव्हती शिवाय वैदिक ग्रंथांमध्येही अस्पृश्यतेची संकल्पना कुठेही आढळत नाही.

इतिहास

वैदिक कालखंड (१५०० ते १००० ख्रिस्तपुर्व)

ऋग्वेदाच्या काळामध्ये फ़क्त दोनच वर्ण होते, आर्य वर्ण आणि दास वर्ण. ह्या दोन वर्णांमधील फ़रक त्यांच्या जमातींमध्ये असलेल्या फ़रकाने समोर आला होता. वैदिक संस्कृतीचे पालन करणाऱ्या जमातींनी स्वतःला आर्य म्हणवून घेतले, आर्य म्हणजे सुसंस्कृत असा होतो. त्या विरुद्ध आर्यांच्या विरोधी जमातींना "दास, दस्यू आणि पनी" म्हणले गेले. दास लोक हे आर्य जमातींसाठी बऱ्याच काळासाठी बरोबरीने वाढणारी जमात होते आणि पुढे त्यांना आर्य समाजाचा भागही करून घेण्यात आले. त्यांना सहभागी करून घेण्यामध्येच आर्य समाजाच्या स्तरीकरणास सुरुवात झाली. अनेक "दास" जमाती खरोखरच सेवकांच्या भूमिकेची कामे करित होत्या, आणि त्यामधुनच दास ह्या शब्दाचा अर्थ सेवक किंवा गुलाम म्हणूस प्रचलीत झाला. ऋग्वेदिक काळातील समाज हा त्यांच्या व्यवसायानूसार वर्गीकरण केलेला नव्हता. अनेक शेतकरी आणि कारागीर वेगवेगळे व्यवसाय आणि कौशल्ये अवगत असणारे असत. "रथकार"(रथ बनवणारे) आणि "कर्मार"(धातूकाम करणारे) यांना खूप मानाचे स्थान होते आणि त्यांना कसल्याही प्रकारचे कलंक जोडलेले नव्हते. अश्याच प्रकारचे सामान्य स्थान होते. अथर्ववेदाच्या शेवटाच्या काळामध्ये नव्या वर्गाचा उदय झाला होता. त्याचकाळात या आधिच्या काळात ज्यांना दास म्हणले जात होते त्यांनाच शुद्र म्हणले जाऊ लागले होते. कदाचित हे मुद्दामच दास ह्या शब्दाला मिळालेल्या गुलामीच्या अर्थाला लपविण्यासाठी केले गेले असावे. "आर्यांचे" वैश्य (जमातीचे सदस्य) असे नामकरण झाले, नवे उच्चभ्रू वर्ग ब्राह्मण (पुरोहित्य करणारे) आणि क्षत्रिय (लढवय्ये) यांना नव्या दोन वर्णांची ओळख दिली गेली. शुद्र नुसतेच आधिचे "दास" नव्हतेच तर त्यात स्थानिक इतरही जमातींचा समावेश करण्यात आला होता. ही प्रक्रिया आर्यांच्या गंगेच्या खोऱ्यात झालेल्या विस्ताराला समांतरच चालू होती. ह्या सर्व जमातींमध्ये आणि वर्णांमध्ये अन्न आणि विवाहाबद्दलच्या कसल्याही बंधनांचे उल्लेख वैदिक काळातील साहित्यामध्ये ग्रंथांमध्ये येत नाहीत.

वैदिकोत्तर काळ (१००० ते ६०० ख्रिस्तपूर्व)

उपनिषदांच्या प्रारंभिक उल्लेखामध्ये, क्षुद्रांचा उल्लेख पुषनं किंवा पोषण करणारा असा आहे, यातूनच हे सुचित होते की, क्षुद्र हे जमिन कसणारे(शेतकरी) होते. परंतू, त्यानंतर त्याचवेळी, क्षुद्रांना करदाते म्हणून लक्षात घेतले जात नव्हते, शिवाय त्यांना बक्षिस म्हणून मिळालेली जमिन त्यांनी इतरांना देऊन टाकून टाकणे अपेक्षित होते. अनेक कारागीर गटांनाही क्षुद्र म्हणून गणले जाऊ लागले होते, परंतु त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या गटाला कसल्याही प्रकारचा कलंक लागलेला नव्हता. ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना धार्मिक कर्मकांडामध्ये विशेष स्थान दिले गेले होते आणि त्यातूनच त्यांना वैश्य आणि क्षुद्रांपासून वेगळेही केले गेले. वैश्यांना "इच्छेवर दमन" आणि क्षुद्रांना "इच्छेवर फ़टके" या फ़रकाने वर्णन केले गेले.

दुसरे शहरीकरण (५०० ते २०० ख्रिस्तपूर्व)

ह्या काळाबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा मोठा स्रोत म्हणजे त्या काळात निर्माण झालेले पाली भाषेतील बौद्ध साहित्य आहे. एकाबाजूला ब्राह्मणी हिंदू धर्मातील ग्रंथ चातुर्वण्य व्यवस्थेविषयी भाष्य करतात, बौद्ध ग्रंथांमधून तत्कालीन समाजव्यवस्थेचे दुसरेच चित्र समोर येते, त्यांमध्ये हिंदू समाजाला "जाती" आणि "कुळांमध्ये" व्यवसायानुसार विभागलेला समाज म्हणले गेले आहे. त्यावरूनच हा आडाखा बांधता येतो की, वर्णव्यवस्था जी ब्राह्मणी हिंदू धर्माच्या विचारसरणीचा भाग होती, ती प्रत्यक्षात कधीच अस्तित्वावात नव्हती. बौद्ध ग्रंथांमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियांना "वर्णांपेक्षा" "जाती" म्हणून उल्लेखले आहे. त्यांना उच्च स्तरातल्या जाती म्हणूनच नोंदवले आहे. शिवाय खालच्या स्तरातील जातींना "चांडाळ" म्हणून उल्लेखले आहे आणि त्यांमध्ये बांबूचे विणकाम करणारे, शिकारी, रथकार आणि सफाई काम करणारे हे सर्वही चांडाळमध्येच सहभागी होते. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या वर्गाला "गहपती" म्हणले जात होते, ज्याचा शब्दशः अर्थ घराचे मालक असा होतो, म्हणजेच संपत्तिधारक वर्ग. ही सर्व उच्च कुळे होती, आणि कुळांची संकल्पना ह्या काळातच रूढ झाल्याचेही दिसून येते. उच्च कुळातील गट शेती, व्यापार, गोपालन, हिशेब ठेवणे, लिखाण काम यांमध्ये होते तर खालच्या दर्जाची कुळे टोपल्या विणणे आणि सफाई करीत. गहपती हे शेत-जमीन धारक होते आणि ते शेतकीच्या कामासाठी दास कर्मचाऱ्यांना कामाला ठेवीत असत, ह्या दासांमध्ये गुलाम आणि पगारी कामगार असत. गहपती हे त्यावेळच्या शासनासाठी प्राथमिक आणि मोठे करदाते होते, सर्वात महत्त्वाचे म्हणजे गहपती हा गट जन्माने नव्हे तर वैयक्तिक आर्थिक प्रगतीवर ठरविला जाई. वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये "कुळे" आणि त्यांचे व्यवसाय हे निदान उच्च आणि खालच्या पातळीवर समांतर असले तरीही, त्या सामाजिक गटांचा वर्ग, जात आणि व्यवसाय यांमध्ये रूढ संबंध नव्हता, खासकरून मधल्या जातींमधे तर उच्च किंवा खालचा असा कसलाच जात आणि व्यवसायांचा संबंध प्रस्थापीत झालेला नव्हता. हिशेब ठेवणे आणि लिखाण करणे/नोंदी ठेवणे यासारखे व्यवसाय कोणत्याच जातीशी जोडलेले नव्हते. भारतातील जातींचा आढावा घेताना पिटर मासेफ़िल्ड यांनी असे प्रतिपादन केले आहे की, प्रत्यक्षात कोणत्याही जातीचा मनूष्य कोणताही व्यवसाय करु शकत होता. तत्कालीन ग्रंथ असे सुचवतात की, ब्राह्मण जातीतील लोक कोणत्याही जातीकडून अन्नग्रहण करत होते, त्यावरूनच असे सूचित होते की सहभोजनाविषयीचे नियम या काळा पर्यंत तरी प्रत्यक्षात आलेले नव्हते. निकाय ग्रंथांनूसार सुद्धा जातीं ह्या आंतरविवाही समूह नव्हत्या, किंबहुना कोणतेच आंतरविवाही समूह अस्तित्वात नव्हते. मेसेफ़िल्ड यांनी पुढे असेही‌ प्रतिपादन केले आहे कि, "निकाय काळामध्ये जर जाती व्यवस्थेचे कुठले स्वरूप प्रत्यक्षात अस्तित्वात होते कि नाही ह्या बद्दल साशंकता आहे - जर असेलही तर ते काही अ-आर्य गटांमध्ये अस्तित्वात असेल.". काही ग्रंथांमध्ये बुद्ध आणि ब्राह्मण यांमध्ये झालेल्या एका वादाच्या प्रसंगाच्या वर्णनावरून हे स्पष्ट दिसते की, ब्राह्मण स्वतःची इतरांवरची सत्ता पवित्रतेच्या वेष्टनाने टिकवून ठेवतात आणि ते पवित्रतेच वलयच त्यांना इतरांकडून सेवा घेण्यास. बुद्धाने ह्या प्रश्नाला उत्तर देताना ह्या वास्तवावर भर दिला आहे कि, सर्व मानवांचा जैविक जन्म समान मार्गाने होतो आणि त्यामूळे इतरांकडून सेवा घेण्याचा हक्क दैवी किंवा पवित्रतेच्या माध्यमातून नव्हे तर आर्थिक तत्त्वांवर मिळवला जातो. या साठी त्यांनी पश्चिम-पूर्वेकडील उपखंडांचे उदाहरण दिले आहे, आणि आर्य हेही दास बनू शकतात आणि दास हेही आर्य बनू शकतात, याप्रकारच्या सामाजिक गतिशिलतेचा पुरस्कार बुद्धाने केलेला आहे.

सुरुवातीचा काळ (320–650)

महाभारत ह्या काव्याच्या निर्मितीचा टप्पा चौथ्या शतकाच्या शेवटाकडे पूर्ण झाला असे मानले जाते, त्या महाकाव्यांमध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेख 12.181 ह्या श्लोकांमध्ये येतो आणि त्यात दोन प्रारुपे दाखवली आहे. त्यातील पहिल्या प्रारूपामध्ये वर्ण ही रंगावर आधारित व्यवस्था आहे, भृगू नावाच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून "ब्राह्मण"  वर्णाचे लोक हे गोरे, क्षत्रिय वर्णाचे लाल, वैश्य वर्णाचे पिवळे आणि शुद्र हे काळे होते असे वर्णन आले आहे. ह्या वर्णनाला भरद्वाज मुनिंनी प्रश्न विचारला आणि म्हणले आहे, ''सर्व रंग सर्व वर्णाच्या लोकांमध्ये दिसतात, इच्छा, भिती, मोह, मत्सर, भुक इत्यादी गुणही सर्वच मानवांमध्ये असतात, सर्व मानवांमध्ये वाहणारे रक्त एकच असते, असे असताना आपण मानवांना एकमेकांपासून वेगळे कसे करू शकतो?". त्यावर महाभारतामध्ये अशी घोषणा आहे की, या विश्वामध्ये असले काहीही‌ वर्ण नाहीत, हे विश्व ब्रह्माने रचलेले असून सर्व विश्व ब्राह्मण आहे. आणि आता त्यांच्या कर्मानूसार त्यांचे वर्गीकरण केले जात आ." त्यानंतर महाभारतामध्ये प्रत्येक वर्णाच्या वर्तनाची प्रारुपे वर्णिली गेली आहेत, जे क्षत्रिय असतात ते रागिट, सुखलोलूप आणि उघडपणे विचार मांडणारे असतात, जनावरे पाळून आणि शेती नांगरून पोटे भरण्याची वृत्ती वैश्यांमध्ये असते, शुद्रांना हिंसा, गुप्त कारस्थाने आणि अशुद्धता यांची ओढ असते, सत्य, निर्लोभ आणि शुद्ध चारित्र्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ब्राह्मण वर्ण होय. हिल्टबेटील यांच्या मते महाभारत आणि त्यासारख्या पुर्व-मध्यमयुगीन काळातील हिंदू ग्रंथांमध्ये, "वर्ण हे वंशपरंपरेने पाळली जाणारी बाब नसून. ते सामाजिक वर्गीकरणाचा भाग होता".

आठव्या शतकात जिनसेना यांनी लिहिलेल्या आदी पुराणामधे जैन ग्रंथामधला पहिला जाती व्यवस्थेचा आणि वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आढळतो. जिनसेनानी जाती व्यवस्थेचा उगम हा ऋगवेदातील सुक्तांमधे किंवा पुरुषामधे न शोधता तो सरळ सरळ जडभारताच्या कथानकात शोधलेला आहे. ह्या कथेनुसार भारताने अहिंसेची चाचणी घेतली आणि त्या दरम्यान जे सर्व लोक कोणत्याही जिवावर कोणत्याही प्रकारची हिंसा करणे नाकारतील अशा लोकांना द्वीज म्हणले जाईल असे घोषीत केले. जिनसेनानी पुढे असेही म्हणले आहे की, जे लोक अहिंसेचे तत्त्व पाळतात आणि सर्व जिवांवर कोणत्याही प्रकारची हिंसा न करता जीवन जगतात त्यांना देव ब्राह्मण म्हणले पाहिजे. आदीपुराणाच्या मजकूरात देखील वर्ण आणि ज्ञाती यांच्या परस्पर संबंधाचा उल्लेख आढळतो. पद्मनाभ जैनी ह्या प्राच्यविद्या शास्त्राच्या प्राध्यापकांचे असे मत आहे की, आदी पुराणातील उल्लेखाप्रमाणे बुद्ध आणि जैन धर्मामध्ये फक्त एकच ज्ञाती आहे ती म्हणजे मनुष्यज्ञाती किंवा मनुष्य जात, परंतु त्यांच्या व्यवसायाच्या किंवा कामाच्या स्वरूपानूसार त्यांमध्ये विभाजने झाली आहेत. जैन धार्मिक ग्रंथाप्रमाणे जेव्हा रीषभ देवांनी हातात शस्त्र उचलून समाजाच्या रक्षणाचे कार्य आणि राजाची सत्ता प्रस्थापित केली तेव्हा क्षत्रिय धर्माचा उदय झाला, तसेच वैश्य आणि शुद्र जातींचा उदय त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांमुळे आणि त्यात त्यांनी कौशल्य मिळवल्यामुळे झाला.

मध्ययुगाच्या सुरुवातीचा काळ (६५०-१४००)

संदर्भ


तळटीप


Tags:

भारतातील जातिव्यवस्था व्याख्या आणि संकल्पनाभारतातील जातिव्यवस्था जाती व्यवस्थेचा उगमभारतातील जातिव्यवस्था इतिहासभारतातील जातिव्यवस्था संदर्भभारतातील जातिव्यवस्था तळटीपभारतातील जातिव्यवस्थाआधुनिकीकरण.आरक्षणचातुर्वर्ण्यजातप्राचीन भारताची रूपरेषाब्रिटिश साम्राज्यभारतीयमध्य युगमुघल साम्राज्यराजकीय संस्कृती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाभारतरायगड लोकसभा मतदारसंघबलवंत बसवंत वानखेडेविश्वजीत कदमजयंत पाटीलमिलाननंदुरबार लोकसभा मतदारसंघपंचायत समितीकोकण रेल्वेजिल्हाधिकारीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनवनीत राणाअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)शुभेच्छाकाळभैरवभारतीय रेल्वेपाणीसंभाजी भोसले२०१४ लोकसभा निवडणुकानाथ संप्रदायसुजात आंबेडकरसम्राट अशोकफकिराइतर मागास वर्गयोगजैन धर्मबहिणाबाई चौधरीपानिपतची तिसरी लढाईराम गणेश गडकरीभारतातील जागतिक वारसा स्थानेमहासागररक्तगटभाषा विकासशिवसेनाए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीअश्वगंधागाडगे महाराजनगर परिषदयूट्यूबप्रहार जनशक्ती पक्षसत्यनारायण पूजाहिवरे बाजारपारू (मालिका)राजरत्न आंबेडकरसंस्कृतीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेकुंभ रासजन गण मनकोल्हापूर लोकसभा मतदारसंघब्राझीलची राज्येसंत जनाबाईभारतमहालक्ष्मीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीक्षय रोगशिखर शिंगणापूरमहाराष्ट्राचा इतिहासविमाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताचे राष्ट्रपतीसंस्‍कृत भाषाडाळिंबतरसअष्टविनायकभारतीय संविधानाचे कलम ३७०राज्य निवडणूक आयोगमानवी शरीरयेसूबाई भोसलेभारतातील शेती पद्धतीधुळे लोकसभा मतदारसंघपृथ्वीभीमराव यशवंत आंबेडकरमहाविकास आघाडीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीबीड विधानसभा मतदारसंघजनहित याचिकाभारतीय जनता पक्ष🡆 More