त्सुनामी

त्सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते.

त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात.

त्सुनामी
त्सुनामी किनाऱ्याला धडकताना
त्सुनामी
त्सुनामी किनाऱ्याला धडकताना तयार होणारी मोठी लाट

त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले.

किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये सुनामीची तरंगलांबी २०० कि.मी. व तरंगउंची १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो. त्सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते.

इतिहास

त्सुनामी 
२००४ हिंद महासागरातील सुनामी- थायलंड

पहिली सुनामीची नोंद ग्रीसमध्ये इ.स.पू. ४२६ साली झाली.

आधुनिक काळातील त्सुनाम्या

इ.स. २००४ सालातील पश्चिम सुमात्रा (इंडोनेशिया) सुनामी

इ.स. २००४ मध्ये आग्नेय् आशियात हिंदी महासागरात सुनामी आली होती. डिसेंबर २६, इ.स. २००४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये ९.१ रिश्टर भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या लाटांमुळे सुनामी निर्माण झाली. या सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वांत भयानक नुकसानकारक सुनामी ठरली. त्यात अंदाजे २,२७.९८८ लोकांचा बळी गेला.

देश↓ नक्की मृत्यू↓ अंदाजित↓ जखमी↓ हरवलेले↓ स्थलांतरित↓
इंडोनेशिया १,३०,७३६ १,६७,७३६ . ३७०६३ ५०००००+
श्रीलंका ३५,३२२ ३५,३२२ २१,४११ . ५,१६,१५०
भारत १२,४०५ १८,०४५ . ५,६४० .
थायलंड ५,३९३ ८,२१२ ८,४५७ २,८१७ ७,०००
सोमालिया ७८ २८९ . . ५,०००
म्यानमार ६१ ४००-६०० ४५ २०० ३,२००
मलेशिया ६८ ७५ २९९ .

इ.स. २०११ सालातील जपान सुनामी

मार्च ११, इ.स. २०११ रोजी जपानाच्या किनारपट्ट्यांना सुनामीचा तडाखा बसला. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी २.४६ वाजता जपानाच्या किनाऱ्यापासून १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ८.९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ही सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक कि.मी. अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर आपल्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले.

नैसर्गिक संरक्षण

खारफुटीची वने व प्रवाळ बेटे तसेच कांदळवन नैसर्गिकरित्या सुनामीच्या तडाख्यांपासून भूपृष्ठाचे संरक्षण करतात.

त्सुनामी 
२००४ हिंद महासागरातील सुनामी

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

त्सुनामी इतिहासत्सुनामी नैसर्गिक संरक्षणत्सुनामी संदर्भ आणि नोंदीत्सुनामी बाह्य दुवेत्सुनामीउल्काजपानी भाषाज्वालामुखीभूकंपरोमन लिपीसमुद्रसरोवर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संजीवकेविराट कोहलीअहमदनगर लोकसभा मतदारसंघभगवद्‌गीताविद्या माळवदेसमुपदेशनप्रज्ञा विवर्धन स्तोत्रआंबेडकर कुटुंबपानिपतची तिसरी लढाईहिमालयशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीहिवरे बाजारसंयुक्त महाराष्ट्र समितीआचारसंहिताआईस्क्रीमभारतीय रिपब्लिकन पक्षआरोग्यबुलढाणा लोकसभा मतदारसंघपोलीस महासंचालकबलुतेदारबचत गटछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससकाळ (वृत्तपत्र)रावणगुणसूत्रपेशवेवस्तू व सेवा कर (भारत)ताम्हणबलवंत बसवंत वानखेडेपरभणी लोकसभा मतदारसंघमण्यारबहिणाबाई पाठक (संत)मराठा साम्राज्यकोरफडशेकरूमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीप्रल्हाद केशव अत्रेखडकवासला विधानसभा मतदारसंघदौंड विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मीधनु रासप्रणिती शिंदेप्राथमिक आरोग्य केंद्रभारताचे राष्ट्रचिन्हविक्रम गोखलेमहाराष्ट्र पोलीसरायगड (किल्ला)भाषालंकारइतिहासाच्या अभ्यासाची साधनेबीड लोकसभा मतदारसंघप्राजक्ता माळीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशआईसाडेतीन शुभ मुहूर्तसंवादविधानसभाभूगोलसायबर गुन्हावसाहतवादबाळभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितादक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनानंदुरबार लोकसभा मतदारसंघनिबंधदिवाळीमावळ लोकसभा मतदारसंघसोयाबीनबंगालची फाळणी (१९०५)तानाजी मालुसरेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीपंकजा मुंडे२०२४ लोकसभा निवडणुकासंभाजी भोसलेविले पार्ले विधानसभा मतदारसंघसह्याद्रीकृष्णा नदीॐ नमः शिवायमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी🡆 More