कर्क रास

कर्क ही मेेष राशीपासून आरंभ होणाऱ्या राशीचक्रातील १२ राशींपैकी चौथी रास आहे.

पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही रास बनते. सूर्य १५ जुलैच्या आसपास कर्क राशीत प्रवेश करतो आणि १५ ऑगस्टच्या आसपास ही रास सोडून सिंह राशीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करतो. आकाशात दिसणाऱ्या कर्क राशीत चार प्रमुख तारे आहेत, आणि त्यांपैकी फक्त दोन ठळक. कर्क राशीच्या पूर्वेला सिंह व पश्चिमेला मिथुन या राशी आणि उत्तरेला काकुली, ईशान्येला लघुसिंह व नैर्ऋत्येला लघुलुब्धक नावाचे तारकापुंज येतात.

कर्क रास
कर्क राशीचे चिन्ह


कर्क (♋︎) ( इंग्रजी: Cancer ,ग्रीक: Καρκίνος, रोमनीकृत: Karkínos, "क्रॅब" साठी लॅटिन) हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे. हे ९०° ते १२०° आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे. उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत, सूर्य अंदाजे २२ जून ते २२ जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो. ज्योतिषशास्त्रात, कर्क हे जल त्रिकोणाचे मुख्य चिन्ह आहे, जे कर्क, मीन आणि वृश्चिक राशीपासून बनलेले आहे. हे सहा नकारात्मक चिन्हांपैकी एक आहे आणि त्याचा शासक ग्रह चंद्र आहे. जरी कर्कच्या काही चित्रणांमध्ये लॉबस्टर किंवा क्रेफिशचा समावेश आहे, चिन्ह बहुतेक वेळा कार्किनोसवर आधारित खेकड्याद्वारे दर्शविले जाते. कर्क राशीचे विरुद्ध चिन्ह मकर आहे.

हिंदू फलज्योतिषानुसार

कर्क राशीवर चंद्र ग्रहाची मालकी आहे. ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते.

साधारणपणे कर्क रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.

कर्क राशी घेऊन जन्मलेल्या मुलाच्या नावाचे आद्याक्षर ही, हू, हे, दा, दि, दे किंवा दो असावे असा संकेत आहे.

संदर्भ यादि

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोलापूर जिल्हापश्चिम महाराष्ट्रलोकमतसम्राट अशोकफणससंगीत नाटकआकाशवाणीमाढा लोकसभा मतदारसंघकुष्ठरोगविठ्ठलराव विखे पाटीलरत्‍नागिरी जिल्हानेतृत्वगणपतीनाशिक लोकसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेरायगड जिल्हासंजीवकेतापी नदीसंदिपान भुमरेउंबरस्थानिक स्वराज्य संस्था२०१९ लोकसभा निवडणुकाकुपोषणजवसरोजगार हमी योजनाबँकसायबर गुन्हागहूसमासगालफुगीभारताचा ध्वजवेदतिरुपती बालाजी२०२४ मधील भारतातील निवडणुकारावणवाशिम जिल्हाकन्या रासनामदेवशास्त्री सानपभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळज्योतिबा मंदिरमातीपुणे लोकसभा मतदारसंघसोलापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळघोरपडहृदयसम्राट हर्षवर्धनकावीळतूळ रासविष्णुसहस्रनामनगदी पिकेविले पार्ले विधानसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीबुद्धिबळवसंतराव नाईकभारतीय संसदजायकवाडी धरणमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनपानिपतची पहिली लढाईफिरोज गांधीफुटबॉलभारत सरकार कायदा १९१९वर्षा गायकवाडभारतीय रिझर्व बँकहस्तमैथुनसंयुक्त महाराष्ट्र समितीहिंदू लग्नमुघल साम्राज्यकर्ण (महाभारत)पोलीस महासंचालकबुलढाणा विधानसभा मतदारसंघपाऊसॐ नमः शिवायरविकांत तुपकरराजकीय पक्षमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाराष्ट्र केसरीहळद🡆 More