अनंत काकबा प्रियोळकर: मराठी लेखक

अनंत काकबा प्रियोळकर (५ सप्टेंबर, इ.स.

१८९७">इ.स. १८९७ - १३ एप्रिल इ.स. १९७३ हे इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व मराठी लेखक होते. त्यांच्या प्रेरणेने मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली.

अनंत काकबा प्रियोळकर
जन्म नाव अनंत काकबा प्रियोळकर
जन्म ५ सप्टेंबर, इ.स. १८९७
प्रियोळ
मृत्यू १३ एप्रिल, इ.स. १९७३
मुंबई
कार्यक्षेत्र इतिहास, साहित्य
भाषा मराठी, इंग्लिश
विषय इतिहास

जीवनपट

शिक्षण

अनंत काकबा प्रियोळकर ह्यांचा जन्म गोव्यातील फोंडे तालुक्यातील प्रियोळ ह्या गावातील कोने ह्या भागात झाला. त्यांचे प्राथमिक मराठी शिक्षण त्यांच्या आजोळी तिसऱ्या इयत्तेपर्यंत झाले. १९१०मध्ये प्रियोळकर पोर्तुगीज सेगुंद ग्राव (पाचवी इयत्ता) ही परीक्षा उत्तीर्ण झाले. फोंडा येथील अल्मैद कॉलेज ह्या संस्थेत त्यांनी हायस्कूल स्तरावरील शिक्षण घेतले. दत्तात्रेय विष्णू आपटे आणि हरी गणेश फाटक हे त्यांचे शिक्षक होते. १८१८मध्ये प्रियोळकर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याआधी १९१६ ते १९१७ ह्या कालावधीत प्रियोळकर ह्यांनी असोळणे (गोवे) येथे शिक्षकाची नोकरी केली.

पुढील शिक्षणासाठी प्रियोळकरांनी धारवाड येथील कर्नाटक कॉलेजात प्रवेश घेतला. १९१९ ते १९२२ ह्या काळात प्रियोळकर तिथे शिकत होते. १९२२ ह्या वर्षी प्रियोळकर सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी रुजू झाले. प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ पां. दा. गुणे ह्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना येथे लाभ झाला.

१९२३ ह्या वर्षी प्रियोळकर मुंबई विद्यापीठाची बी. ए. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवीधर झाले.

चित्रकलेची आवड

प्रियोळकरांना चित्रकलेची आवड असल्याने त्यांना आल्मैद कॉलेजात शिकत असताना चित्रकलेच्या परीक्षांना बसण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. पुढील काळात प्रियोळकर लेखक म्हणून प्रसिद्धीस पावले असले तरी त्यांची चित्रकलेची आवड टिकून राहिली. त्यांनी तयार केलेले सार्वजनिक काका (गणेश वासुदेव जोशी) ह्यांचे चित्र पुण्यातील सार्वजनिक सभेत लावण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या चरित्रकारांनी दिली आहे.

प्रकाशित साहित्य

  • दि गोवा इन्क्विझिशन (मुंबई विद्यापीठ प्रेस, १९६१)
  • ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली
  • दमयंती स्वयंवर (आध्यात्मिक)
  • दि प्रिंटिंग प्रेस इन इंडिया (मराठी संशोधन मंडळ, मुंबई १९५८)
  • प्रिय आणि अप्रिय (माहितीपर)
  • लोकहितवादीकृत निबंध संग्रह (संपादित, ललित प्रकाशन)

गौरव

पुरस्कार

डाॅ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई विद्यापीठात सादर झालेल्या सर्वोत्कृष्ट प्रबंधांना पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार मिळालेले काही विद्वान :

  1. डाॅ. अरुण टिकेकर
  2. डाॅ. अरुणा ढेरे
  3. डाॅ.उषा मा. देशमुख
  4. डाॅ. वि.रा. करंदीकर
  5. डाॅ. वि.भि. कोलते
  6. डॉ. प्रकाश खांडगे

संदर्भ

संदर्भसूची

Tags:

अनंत काकबा प्रियोळकर जीवनपटअनंत काकबा प्रियोळकर प्रकाशित साहित्यअनंत काकबा प्रियोळकर गौरवअनंत काकबा प्रियोळकर पुरस्कारअनंत काकबा प्रियोळकर संदर्भअनंत काकबा प्रियोळकर संदर्भसूचीअनंत काकबा प्रियोळकरइ.स. १८९७इ.स. १९७३एप्रिल १३मराठीमराठी संशोधन मंडळमुंबईसप्टेंबर ५

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोदावरी नदीजलप्रदूषणअर्थसंकल्पकर्करोगसप्तशृंगी देवीअध्यक्षराष्ट्रीय स्वयंसेवक संघराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)शिरूर विधानसभा मतदारसंघकिशोरवयजागतिक बँकजागतिक लोकसंख्याज्योतिबाबाळ ठाकरेनिबंधखासदारमहाराष्ट्रसमाससम्राट अशोकबीड जिल्हाबहावामहाराष्ट्रातील घाट रस्तेअमेरिकेची संयुक्त संस्थाने२०२४ मधील भारतातील निवडणुकापन्हाळानैसर्गिक पर्यावरणनितीन गडकरीसातारा जिल्हाबलुतेदारभारतीय संस्कृतीसत्यनारायण पूजाकलावंजारीराम सातपुतेवर्षा गायकवाडबचत गटकेंद्रशासित प्रदेशमहाभारतज्यां-जाक रूसोरयत शिक्षण संस्थाविले पार्ले विधानसभा मतदारसंघवृषभ रासरॉयल चॅलेंजर्स बंगलोरयकृतआंबातिथीआद्य शंकराचार्यहापूस आंबामहाराष्ट्र विधानसभागायत्री मंत्रवर्णमाला२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाजागतिक दिवसस्वामी समर्थमहाराणा प्रतापभारतीय रिझर्व बँकसमाजशास्त्ररेणुकाशेतकरीभारताची जनगणना २०११गुळवेलबहिणाबाई पाठक (संत)एकनाथ खडसेफकिराओवाशाळारामजी सकपाळहिंगोली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीदशरथबारामती विधानसभा मतदारसंघमराठी भाषायोगमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळशिर्डी लोकसभा मतदारसंघवसंतराव नाईकनक्षत्रअमरावती लोकसभा मतदारसंघ🡆 More