गाय छाप जर्दा

गाय छाप जर्दा हा संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख उत्पादन आहे. हा जर्दा (तंबाखूचा एक प्रकार) भारतातील जनतेमध्ये सुपरिचित आहे.

गाय छाप जर्दा
गाय छाप जर्दा पुडीच्या एका बाजूचे छायाचित्र
गाय छाप जर्दा
गाय छाप जर्दा पुडीच्या दुसऱ्या बाजूचे छायाचित्र

इतिहास

'गाय छाप जर्दा' या उत्पादनाची सुरुवात या मालपाणी उद्योग समूहाने ९ जुलै इ.स.१८९४ रोजी केली.दामोदर जगन्नाथ मालपाणी यांनी हा जर्दा भारतीय बाजारपेठेत प्रस्तुत केला. ते जर्दा या प्रकाराचे पहिले उत्पादक होते.

साहित्यिक मूल्य

'गाय छाप जर्दा'या तंबाखूस मराठी, हिंदी अन्य भारतीय भाषेतील साहित्यात एक साहित्यिक संदर्भ आणि मूल्य आहे.

      "अरं ये नवन्या एक गाय छाप घे बर संपत आलीया पुडी... जाता जाता नवनाथच्या टपरीवरून गायछाप घेऊन खिशात कोंबत रानात जायला तो सज्ज झाला होता.
      "(काय ढेकूण चावले हो त्या अर्ध्या तासात! आणि तो गोण्या ज्योतिषी , त्याला त्याचे काही नाही, आपला मजेत गाय छाप मळत होता)"
      "गजा शिपणे करून परतेस्तवर मनातल्या मनात बापाबरोबरच्या मीटिंगची तयारी करत आंगण्यातल्या मांडवाखालच्या माचल्यावर शवासन सुरू केले होते. "झोपू देस हो बिचाऱ्यास, दमला असेल बिचारा", गजा हळूच बायकोला म्हणाला. "मी कशास जात्ये उठवायास त्यास? तुम्हीच काहीतरी खेकटे काढून झोपमोड कराल त्याची. स्वस्थ म्हणून बसवलांय कधी तुम्हांला?" असे सणसणीत प्रत्युत्तर मिळाल्यावर मात्र तो मुकाट गाय छाप जर्दा चोळत झोपाळ्यावर झोके काढत बसला."
      "आता मात्र एक आणि एकच आबा आहेत. हो, तेच ते, "गाय छाप'चे माजी brand ambassador आबा तासगावकर. त्यांच्याकडे एवढे मोठे सांस्कृतिक पद आहे, याचा महाराष्ट्राला पत्ताच नव्हता."
      " प्रिन्स गुटखा होता तेंव्हा, तो नसेल तोंडात तर विल्स, दोन्हीचा कंटाळा आला असेल तर गाय छाप,"

वाक्यात असा उपयोग करून लेखन गेले आहे आणि केले जाते.

संवादाचे माध्यम

"जरा पुडी बघू" म्हणून कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संवाद सुरू होतो, तेंव्हा ती पुडी 'गाय छाप जर्दा'ची असणे, हे बहुतेकदा निश्चित असते.[ संदर्भ हवा ] या संवादाचे वर्णन केल्याखेरीज भारतीय ग्रामीण साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. याचे प्रत्यंतर सर्व प्रादेशिक भाषेतील साहित्यात, लेखनात आढळते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, कविता, यात तर ते आढळतेच. लेखकास त्याचे वर्णन करण्यासाठी खूपच निरीक्षण करणे आवश्यक असते. खास करून नाटकात 'जर्दा' खाण्याचा अभिनय करणे, ही अभिनयाची कसोटी असू शकते.

एवढेच नव्हे तर मारामारी, 'बा' 'चा 'बा'ची ऊर्फ शिव्यागाळीतही जर्दाच्या आदरपूर्वक उल्लेखाची परंपरा आढळते. 'गाय छाप जर्दा' हे मराठी माणसाचे महाराष्ट्रातील उत्पादन असल्याने मराठी साहित्यात त्याचे साहित्यिक प्रतिबिंब प्राथम्याने आढळते. इतर प्रादेशिक भाषांमध्ये – कन्नड, तेलगू, तमिळ या दक्षिणी भाषेतही ते आढळते.[ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ]

टीका

'गाय छाप' ही तंबाखू असल्याने तिच्यामुळे कर्करोग होतो. तसा वैधानिक इशाराही देण्यात येतो.

आरोग्यविद्या या वेबसाईटवरील तंबाखूबद्दलचा लेख

संदर्भ

Tags:

गाय छाप जर्दा इतिहासगाय छाप जर्दा साहित्यिक मूल्यगाय छाप जर्दा संवादाचे माध्यमगाय छाप जर्दा टीकागाय छाप जर्दा आरोग्यविद्या या वेबसाईटवरील तंबाखूबद्दलचा लेखगाय छाप जर्दा संदर्भगाय छाप जर्दा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारमहाराष्ट्रातील खासदारांची यादीजय श्री रामनगर परिषदमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागकर्ण (महाभारत)महाराष्ट्रातील पर्यटनस्वतंत्र मजूर पक्षमूलद्रव्यमराठी संतहिरडानिबंधपुरंदर किल्लागर्भाशयविदर्भवासुदेव बळवंत फडकेलोकसंख्याकोल्हापूररयत शिक्षण संस्थाकन्या रासग्रामीण वसाहतीलीळाचरित्रभारताची अर्थव्यवस्थापृथ्वीचे वातावरणप्रादेशिक राजकीय पक्षभारत छोडो आंदोलनजालियनवाला बाग हत्याकांडमहाराष्ट्र केसरीसूर्यनमस्कारसम्राट हर्षवर्धनविनोबा भावेगणपतीमहाराष्ट्राची हास्यजत्राताराबाईभारतातील मूलभूत हक्कज्ञानेश्वरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीगूगलयशवंतराव चव्हाण२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतप्राजक्ता माळीनरसोबाची वाडीकादंबरीसमीक्षाहिंदू धर्मातील अंतिम विधीविधानसभाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९केदारनाथ मंदिरशेतकरी कामगार पक्षमहाराष्ट्राचा भूगोलमुंबई रोखे बाजारसामाजिक समूहपहिले महायुद्धबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरलोहगडविदर्भातील जिल्हेमधमाशीपाणीग्रामगीतावर्तुळपुरस्कारलोकमान्य टिळकविलासराव देशमुखज्वालामुखीहळदजास्वंदवंदे भारत एक्सप्रेसशिवआनंद शिंदेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसंयुक्त राष्ट्रेलोणार सरोवरबल्लाळेश्वर (पाली)नर्मदा नदीवाळवी (चित्रपट)आंबेडकर कुटुंबमानवी विकास निर्देशांकसुजात आंबेडकरभारतीय रुपया🡆 More