वालेंतिना तेरेश्कोव्हा

वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा (रशियन: Валенти́на Влади́мировна Терешко́ва; ६ मार्च १९३७) ही रशियन व्यक्ती अंतराळात पोचलेली जगातील पहिली महिला आहे.

वोस्तोक ६ हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४००हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी आधी सोव्हिएत वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.

वालेंतिना तेरेश्कोव्हा
वालेंतिना तेरेश्कोव्हा
जन्म ६ मार्च, १९३७ (1937-03-06) (वय: ८७)
बोल्शोये मास्लेनिकोवो, यारोस्लाव ओब्लास्त, सोव्हिएत संघ
राष्ट्रीयत्व सोव्हिएत
रशियन
पेशा अंतराळयात्री, वैमानिक
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४९-इ.स. १९७९
प्रसिद्ध कामे अंतराळात गेलेली जगातील पहिली महिला
स्वाक्षरी
वालेंतिना तेरेश्कोव्हा
वालेंतिना तेरेश्कोव्हा
तेरेश्कोवा व नील आर्मस्ट्राँग १९७० साली

तेरेश्कोवाला सोव्हिएत संघामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली व १९६९ साली तिने सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व घेतले. तेरेश्कोवाला सोव्हिएत संघाचा वीर हा देशामधील सर्वोच्च पुरस्कार तसेच बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तेरेश्कोवा राजकारणामध्ये कार्यरत राहिली व तिने सोव्हिएतमध्ये व जगात अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. तेरेश्कोवा सोत्शी येथील २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ऑलिंपिक ध्वजरोहक होती.

सामाजिक क्रियाकलाप

2011 मध्ये, ती यारोस्लाव्हल प्रादेशिक यादीतील युनायटेड रशिया पक्षाकडून रशियाच्या स्टेट ड्यूमासाठी निवडली गेली. तेरेश्कोवा, एलेना मिझुलिना, इरिना यारोवाया आणि आंद्रे स्कोच सोबत, ख्रिश्चन मूल्यांच्या संरक्षणासाठी आंतर-पक्षीय उप गटाचे सदस्य आहेत; या क्षमतेमध्ये, तिने रशियन राज्यघटनेतील दुरुस्त्या सादर करण्यास समर्थन दिले, त्यानुसार, "ऑर्थोडॉक्सी हा रशियाच्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळखीचा आधार आहे." 21 डिसेंबर 2011 पासून फेडरल स्ट्रक्चर आणि स्थानिक स्व-शासनावरील राज्य ड्यूमा समितीचे उपाध्यक्ष.

बाह्य दुवे

वालेंतिना तेरेश्कोव्हा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अंतराळरशियन भाषारशियासोव्हिएत संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दौलताबादशिवसेनाटोमॅटोसिंधुताई सपकाळगर्भाशयनदीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीप्रकाश आंबेडकरसाडेतीन शुभ मुहूर्तकोकणइंदुरीकर महाराजसर्पगंधाबायोगॅसनियतकालिकराज्यपालइतर मागास वर्गखडकवंदे भारत एक्सप्रेसशहाजीराजे भोसलेरामायणबिबट्याविनयभंगदहशतवाद विरोधी पथकभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीजागतिक महिला दिनभारतीय तंत्रज्ञान संस्थासर्वनाममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नवग्रह स्तोत्रयशवंतराव चव्हाणदादासाहेब फाळके पुरस्कारशाहू महाराजअतिसारकोरोनाव्हायरस रोग २०१९बेकारीगृह विभाग, महाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीभारतातील शेती पद्धतीसेंद्रिय शेतीराजगडध्वनिप्रदूषणराष्ट्रपती राजवटरायगड (किल्ला)रेबीजसचिन तेंडुलकरवर्णमालाअंदमान आणि निकोबारटॉम हँक्ससुषमा अंधारेनातीकोल्डप्लेविदर्भमराठी व्याकरणद्राक्षतलाठीकळसूबाई शिखरकादंबरीदक्षिण भारततुरटीज्ञानपीठ पुरस्कारभोपळाॐ नमः शिवायरामनवमीकार्ले लेणीवीणामहाराष्ट्रातील किल्लेनाचणीधान्यशिवाजी महाराजश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीआग्नेय दिशाहिमालयक्लिओपात्राबावीस प्रतिज्ञागणेश चतुर्थी🡆 More