लढाऊ विमान: बदल माहिती

एक लढाऊ हे प्रामुख्याने इतर विमानाचा विरोधात हवेतल्या हवेत लढण्यासाठी रचना केलेले लष्करी विमान आहे.

या लढाऊ विमानांचा मुख्य उद्देश रणांगणात हवाई प्राबल्य प्रस्थापित करण्यासाठी आहे. हे बाँबफेकी विमाने (bombers) आणि इतर विमाने ज्यांचे मुख्य ध्येय जमीनीवर हल्ला आहे अशा हल्ला विमानांपेक्षा निराळे असते. तरी अनेक विमानांना जमिनीवर हल्ला करता येईल अशी दुय्यम क्षमता असते. काही विमाने अनेक हेतू सैनिक हाताळणी आणि बाँबफेकी विमाने म्हणूनही रचना केलेली आहेत. यामुळे अनेकदा लढाऊ विमान अशी मानक व्याख्या पूर्ण अशी नाही. पहिल्या महायुद्धा पासून हवाई प्राबल्य हे परंपरागत युद्धामध्ये विजयासाठी आवश्यक मानले गेले आहे. हवाई सर्वाधिकार प्राप्त करण्यासाठी यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न हे त्या वैमानिकाच्या कौशल्यावर, विमानाच्या वापरावर, रणनीती विमानांची संख्या आणि कार्यक्षमता या अनेक घटकांवर अवलंबून असते. लढाऊ विमाने हे आधुनिक सशस्त्र दलांच्या संरक्षण खर्चाच्या अंदाजपत्रकात एक मोठा भाग व्यापतात.

लढाऊ विमान:  बदल माहिती
पहिल्या पीढीतले जुने विमान उतरताना.

इतिहास

पहिल्या महायुद्धात या विमानांची सुरुवात झाली. आधी ही विमाने खूप लहान आणि हलकी होती. परंतु ती सशस्त्र होती. विमान एका लाकडी सांगाड्यावर बांधले जात असे. त्यास कापडाने झाकले जात असे. यामुळे कमी वजमाचे विमान तयार होत असे. दुसऱ्या महायुद्धापर्यंत यात सुधारणा होऊन धातूची विमाने बांधली जाऊ लागली यात मशिन गन बसवल्या जात असत. यांना पंख्याची इंजिने असत. काही विमाने ताशी ४00 मैल वेग गाठत होते. यांना एकच इंजिन असत असे. दोन इंजिनांची विमानेही बांधली गेली पण ती तेव्हढी कार्यक्षम नव्हती. इ.स. १९५० नंतर या विमानांना रडार लावण्यात आले त्यामुळे वैमानिक दूरवर पाहू शकत होते. १९६० नंतर मशिन गन्स जाऊन त्यात हवेतल्या हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जाऊ लागली.

लढाऊ विमान:  बदल माहिती 
मिग१७ - क्षेपणास्त्रे दिसत आहे.

स्टेल्थ फायटर

स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे विमाने रडारपासून काही प्रमाणात तरी लपून राहू शकतात. स्टेल्थ फायटर विमानाच्या पृष्ठभागावर खास पदार्थाचे आवरण दिलेले असते. हे आवरण रेडिओ लहरी शोषून घेतात. तसेच सर्वसाधारण विमानाप्रमाणे स्टेल्थ विमानाची इंजिने बाहेर नसतात. ती लपवलेली असतात. स्टेल्थ तंत्रज्ञान रडार विमान ओळखण्याची शक्‍यता कमी करते.

भारत

भारताचेही स्टेल्थ लढाऊ विमान बनवण्याचे प्रकल्प सुरू आहेत. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेड या कंपन्या मिळून नवीन स्टेल्थ विमान बनवत आहेत. याला सुखोई-हाल FGFA - फिफ्थ जनरेशन फायटर एअरक्राफ्ट असे नाव देण्यात आले आहे. या शिवाय ऍडव्हान्स मीडियम काँबॅट एअरक्राफ्ट हे भारत स्वतःच्या बळावर पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान बनवत आहे.

Tags:

पहिले महायुद्धविमानवैमानिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भूततिथीॐ नमः शिवायनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहारआंबेडकर जयंतीविदर्भआकाशवाणीबसवेश्वरजगातील देशांची यादीसमासमहाराष्ट्र दिनभारतातील जागतिक वारसा स्थानेचांदिवली विधानसभा मतदारसंघपोक्सो कायदानवग्रह स्तोत्रमूळव्याधबाटलीमासिक पाळीभारताच्या पंतप्रधानांची यादीहस्तमैथुनभारताचे सर्वोच्च न्यायालयमुंबई उच्च न्यायालयधुळे लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेश्रीया पिळगांवकरभारतातील समाजसुधारकमराठा घराणी व राज्येविश्वजीत कदममराठा साम्राज्यदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघअमरावतीमहिलांसाठीचे कायदेगगनगिरी महाराजपंचशीलविठ्ठल रामजी शिंदेमावळ लोकसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणभारताचा ध्वजतुकडोजी महाराजव्यवस्थापननामदेवशुभं करोतिपृथ्वीसुप्रिया सुळेगुकेश डीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)अमरावती जिल्हानिलेश लंकेशिवाजी महाराजउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्तइतर मागास वर्गग्रंथालयकाळभैरवकान्होजी आंग्रेपरभणी लोकसभा मतदारसंघडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लबाबरघनकचरामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीगणपतीमहाराष्ट्राचा भूगोलशेतीसमर्थ रामदास स्वामीआचारसंहिताकबड्डीहळदतापी नदीमहाड सत्याग्रहभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारतीय रिझर्व बँकश्रीनिवास रामानुजनमराठा आरक्षणभोवळवि.वा. शिरवाडकरचिमणीविरामचिन्हेनागपूर🡆 More