लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी: मराठी लेखक

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.

१९०१">१९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.

शिक्षण व बालपण

जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. लहानवयात मधुकरी मागून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.

संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.वाराणसी येथे जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली.

सामाजिक सुधारणा

अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह, अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केले. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचे वैचारिक योगदान होते.

प्रकाशित साहित्य

  • वैदिक संस्कृतीचा विकास
  • मराठी विश्वकोश (संपादन)
  • धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
  • विचारशिल्प
  • आधुनिक मराठी साहित्य
  • समीक्षा आणि रससिद्धांत
  • हिंदू धर्मसमीक्षा
  • श्रीदासबोध
  • राजवाडे लेख संग्रह (संपादन)
  • उपनिषदांचे भाषांतर
  • संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)

समाजकार्य

  • महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरुवात

पुरस्कार

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन दिल्ली १९५४
  • प्रथम अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ १९६० - १९८०
  • मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक

इतर

  • प्रा. रा.ग. जाधवांनी शास्त्रीजी हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे.

बाह्य दुवे



संदर्भ

Tags:

लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी शिक्षण व बालपणलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी सामाजिक सुधारणालक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी प्रकाशित साहित्यलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी समाजकार्यलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी पुरस्कारलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी गौरवलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी इतरलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी बाह्य दुवेलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी संदर्भलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशीइ.स. १९०१इ.स. १९९४कोशजानेवारी २७मराठीमे २७

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दुसरे महायुद्धभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीआद्य शंकराचार्यप्रकल्प अहवालमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीजीवनसत्त्वयवतमाळ जिल्हाक्रियापदसंवादखडकओमराजे निंबाळकरपश्चिम महाराष्ट्रआणीबाणी (भारत)विमामहाराष्ट्र गीतजागतिक दिवसऊसराज्यसभाजागरण गोंधळनवनीत राणामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमृत्युंजय (कादंबरी)ताराबाईतेजस ठाकरेजॉन स्टुअर्ट मिलजलप्रदूषणभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीवसंतराव नाईकवस्तू व सेवा कर (भारत)राशीविले पार्ले विधानसभा मतदारसंघमुखपृष्ठशेतीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)लोकमान्य टिळकमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीरक्तगटसमासभाषाद्रौपदी मुर्मूभारताचे राष्ट्रपतीजैवविविधताधनगरसोनिया गांधीजळगाव जिल्हानितंबनदीरमाबाई आंबेडकरशरद पवारपारू (मालिका)उत्तर दिशापर्यटनवंजारीप्रेमानंद गज्वीजागतिक कामगार दिनब्रिक्सभारतातील सण व उत्सवकालभैरवाष्टकसुषमा अंधारेपोवाडात्रिरत्न वंदनाशेतकरीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकतणावभारताच्या पंतप्रधानांची यादीजया किशोरीमहेंद्र सिंह धोनीघोरपडकापूसकुपोषणगावस्वरमहानुभाव पंथआचारसंहिताहनुमानबाराखडीमहाविकास आघाडीआर्य समाज🡆 More