नैराश्य: डिप्रेशन

नैराश्य किंवा उदासीनता (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे.

या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.

नैराश्य: कारणे, लक्षणे, उपाय
तीव्र आत्मघाती प्रवृत्ती असलेल्या नैराश्याने ग्रासलेल्या माणसाचे चित्र (इ.स. १८९२)

जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.

कारणे

मानसिक आघात, अकारण केलेले आरोप, जीवलगांशी झालेले वादविवाद, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, पार्किन्सन्स - हायपोथायरॉइड यासारखे किंवा अन्य शारीरिक आजार, ब्लड प्रेशर -स्टेरॉइडस व काही पित्तशामक औषधे, लहानपणी घडलेला एखाद्या दुर्दैवी प्रसंग, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.

नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, एचआयव्ही, इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे (मुख्यत्वे SerotoninNorepihephrine) किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते.

लक्षणे

  • सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे.
  • सतत उदास किंवा निराश वाटते आणि चीडचीड होणे.
  • थकवा जाणवणे व शक्ती नसल्यासारखे वाटते.
  • मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी होते.
  • भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे
  • कोणतेही काम करावेसे न वाटणे.
  • भूक कमी लाणे, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. (काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात.)
  • दुःखी असणे, सतत काळजी करणे.
  • सतत रडू येणे
  • (शांत व पुरेशी) झोप न लागण. (काहीजणांना मात्र खूप झोप लागते)
  • सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे
  • निर्णयक्षमता कमी होणे, कामावरती लक्ष न लागणे, इच्छा कमी होणे
  • स्वतः बद्दल न्यूनगंड निर्माण होणे. स्वतःला दोषी समजणे. जसे, आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते.
  • शरीरसंबंधाची इच्छा न होणे
  • दैनंदिन कामात अजिबात रस नसणे
  • आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.

वरील लक्षणे १५ दिवसांच्यावर असल्यास हा आजार असण्याची शक्यता असते.

नैराश्यात वरील लक्षणे कमी-जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते. आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे शैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे.

वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहान गोष्टींमुळेही बरेच व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकर बाहेर पडतात, तर काही व्यक्ती त्याच गोष्टीमध्ये गुरफटून राहतात.

उपाय

  • जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक किंवा मित्र) यांच्याशी बोलणे. नातेवाइकांचा भावनिक आधार.
  • गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घेणे.
  • नैराश्यात समुपदेशनाचाही खास उपयोग होतो.
  • आराम करत तणावाचे नियोजन करणे.
  • स्वतःसाठी वेळ देणे व छंद जोपासणे.
  • आपल्या विचारांतले निराशा निर्माण करणारे विचार शिधून त्यावर काम करणे
  • नियमित व्यायाम करणे

भारतातील स्थिती

भारतात १५ कोटी लोक कोणत्याना कोणत्या मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत त्यापैकी सुमारे ७ कोटी नैराश्यग्रस्त लोक आहेत. भारतात नैराश्याला बहुतांश वेळा दुर्लक्षित केले जाते. अनेक नैराश्यग्रस्त रुग्ण विशेषतः निम्न स्तरातील व्यक्ती आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे ते मानसशास्त्रज्ञांकडे जात नाहीत किंवा लक्षणे दर्शवत नाहीत. पुरेसे मनोविकारतज्ज्ञ आणि सर्वसामान्यांना परवडतील असे उपचार उपलब्ध होत नाहीत. नैराश्य बरेचदा शारीरिक लक्षणात वर्णन केले जाते विशेषतः महिलांकडून. महिलांच्या मध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे.पण त्यांना मिळणारे उपचारांवरचा खर्च मात्र पुरुषांच्या मानाने कमीच असतो.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

नैराश्य कारणेनैराश्य लक्षणेनैराश्य उपायनैराश्य भारतातील स्थितीनैराश्य हे सुद्धा पहानैराश्य संदर्भनैराश्य बाह्य दुवेनैराश्यइंग्रजीमन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्ञानेश्वरीमांजरभाषाभीमाशंकरहवामान बदलआर्थिक विकासऊसभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीआमदारश्रीया पिळगांवकरधर्मो रक्षति रक्षितःउच्च रक्तदाबआद्य शंकराचार्यबीड विधानसभा मतदारसंघलक्ष्मीगाडगे महाराजज्ञानेश्वरआर्य समाजभारताचे उपराष्ट्रपतीरोजगार हमी योजनाराजाराम भोसलेफणसपंढरपूरफकिरासाडेतीन शुभ मुहूर्तएकनाथलातूर लोकसभा मतदारसंघहोमरुल चळवळप्रीतम गोपीनाथ मुंडेभारतीय संविधानाचे कलम ३७०सूर्यओशोबाळ ठाकरेराजकारणसुप्रिया सुळेरक्तगटकुटुंबशिखर शिंगणापूरविशेषणक्रियाविशेषणतेजस ठाकरेभारताचा स्वातंत्र्यलढाहिंदू कोड बिलअजिंठा-वेरुळची लेणीराज्यशास्त्रकोकणसावित्रीबाई फुलेविजयसिंह मोहिते-पाटीलभारताचे पंतप्रधानसंवादशाश्वत विकासकांजिण्याजागतिकीकरणलोकसभा सदस्यआचारसंहितातिथीपृथ्वीचे वातावरणशुद्धलेखनाचे नियमवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरातरत्‍नागिरी जिल्हाअमरावती लोकसभा मतदारसंघधनु रासवर्षा गायकवाडपुन्हा कर्तव्य आहेअकोला लोकसभा मतदारसंघमहादेव जानकरवडहळदअर्थ (भाषा)मराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४जनहित याचिकासंगणक विज्ञानउत्पादन (अर्थशास्त्र)संदीप खरेधाराशिव जिल्हाइतर मागास वर्ग🡆 More